Saturday, July 25, 2009

स्वास्थ्यकारक मध


कामाच्या ठिकाणी तासन् तास कॉम्प्युटरवर बसावे लागल्यामुळे डोळ्यांची चुरचुर होणे तसेच ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अ‍ॅसिडिटी, अस्थमा यांसारखे आजार झालेले आजकाल कुठल्याही वयोगटात सर्रास दिसतात. या आजारांपासून आपला बचाव करावयाचा असेल तर यासाठी एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे मध.
तुम्ही रोज व्यायामशाळेत जाऊन तुमच्या शरीराचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करीत असाल, शरीराला विविध पोषक द्रव्ये मिळण्यासाठी त्या अनुरूप आपल्या आहाराचे नियोजनदेखील करीत असाल, तसेच गरजेनुसार आपल्या त्वचेच्या व केसांच्या आरोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्लादेखील घेत असाल; परंतु शरीराचा एक नाजूक भाग म्हणजे आपले डोळे, त्यांच्यावर तासन् तास कॉम्प्युटरवर काम केल्यामुळे जो ताण येतो त्यासाठी आपण काय करतो? डोळ्यांवरील ताणतणाव कमी

करून त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने एक अत्यंत गुणकारी व पारंपरिक उपाय म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये मधाचा समावेश करणे.
मधाचा उपयोग हा आरोग्याच्या दृष्टीने खूप हितकारक असून डॉक्टरांपासून म्हाताऱ्या आजीपर्यंत सर्वच मधाची महती जाणतात व त्यामुळेच ते सर्वाना मध प्राशन करण्याचा सल्लादेखील देताना दिसतात. घरेलू उपचारांसाठी मधाचा औषधांमध्ये मोठय़ा प्रमाणात उपयोग केला जात असतो, त्यापैकीच हे काही उपचार :
ऋ गाजराच्या रसामध्ये दोन लहान चमचे मध घालून ते नियमित प्राशन केल्यास दृष्टी क्षमता वाढते तसेच डोळ्यांना पाणी येणे यांसारखे आजार बरे होण्यास मदत होते.
जर तुम्हाला सर्दी, पडसे किंवा छातीत कफ झाला असेल तर दोन लहान चमचे मध तेवढय़ाच मात्रेच्या आल्याच्या रसाबरोबर नियमित घेणे तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरेल. हा एक पिढय़ान् पिढय़ा चालत आलेला अत्यंत जुना उपाय असून असंख्य भारतीय त्याचा आजदेखील उपयोग करतात.
याचप्रमाणे मलावरोध, हायपर अ‍ॅसिडिटी आणि स्थूलपणा घालवण्यासाठी एक चमचा मध हलक्या गरम पाण्यातील अध्र्या लिंबाच्या रसामध्ये घेणे अत्यंत उपयुक्त ठरते.
आयुर्वेदामध्ये उच्च रक्तदाबासाठी मधाचा उपयोग करणे अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. दोन लहान चमचे मध एक चमचा लसणाच्या रसामध्ये नियमित घेतल्याने रक्तदाब संतुलित राहतो.
जगातील दम्याच्या रुग्णांसाठी मध हे एक वरदानच ठरू शकेल. कारण मध, आले आणि काळी मिरी पावडर यांच्या समप्रमाणातील मिश्रणाच्या नियमित सेवनाने दम्याच्या आजारामध्ये खात्रीलायक फरक पडतो.
मधाचा उपयोग अ‍ॅण्टिसेप्टिक म्हणून जखम भरून येण्यासाठीदेखील केला जातो.
मधाचा उपयोग फक्त रोग बरे करण्यासाठीच केला जात नसून त्याचा उपयोग रोग होऊच नये यासाठीदेखील केला जातो.
जर तुम्ही स्वत:ला फिट आणि सडपातळ ठेवू इच्छित असाल तर रोजच्या आहारात साखरेऐवजी मध घेणे तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल.
सर्दी-पडश्यामुळे हैराण झाले असाल तर चहामध्ये किंवा हलक्या गरम पाण्यामध्ये मध टाकून प्यायल्याने खूप फरक पडेल.
मध हे एक अ‍ॅन्टी ऑक्सिडंट असल्यामुळे त्याच्या सेवनामुळे त्वचा ताजीतवानी व चमकदार राहण्यास मदत होते.
बाजारामध्ये विप्रो संजीवनी हनीसारखे प्रसिद्ध मधाचे ब्रॅण्ड उपलब्ध असल्यामुळे लोक गुणकारी मधाचे सेवन आपल्या रोजच्या आयुष्यात करू शकतील व पूर्वीपासून चालत आलेल्या आरोग्यदायी परंपरेचा वारसा पुढे नेऊ शकतील.

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

ad