Wednesday, October 22, 2008

पाठदुखीने पाठ सोडावी म्हणून...

पाठदुखीने पाठ सोडावी म्हणून...


(डॉ. आरती साठे)
पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नये, हे महत्त्वाचे. कारण, मज्जारज्जूला संरक्षण, अनेक स्नायूंचा आधार पाठीच्या कण्यामुळेच मिळतो. आपल्या हातापायाची, डोक्‍याची सुलभ हालचाल होण्यासाठी पाठीचा कणा मदत करतो. .......
पाठदुखीचा त्रास कधीच झाला नाही असा माणूस विरळाच! छोट्या मंडळींपासून वृद्धापर्यंत, बायकांना, पुरुषांना कोणत्याही कारणामुळे पाठदुखीचा त्रास होतो. मग ते कारण मामुली असो वा गंभीर! मात्र, पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नये, हेही तितकेच खरे आहे. कारण पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा व आपल्यासाठी अतिशय उपयोगी असा भाग आहे. मज्जारज्जूला संरक्षण, अनेक स्नायूंचा आधार व आपल्या हातापायाची व डोक्‍याची सुलभ हालचाल होण्यासाठी पाठीचा कणा आधार देत असतो.

पाठीचा कणा हा एकावर एक कौशल्यपूर्ण रचलेल्या छोट्या छोट्या अशा ३३ मणक्‍यांनी बनवलेला असतो. दोन मणक्‍यांमध्ये आपल्या हालचाली सुलभ होण्यासाठी, गोल चपटी, चिवट व मऊ चकती असते, तसेच मजबूत स्नायू, स्नायूबंध, अस्तिबंध कण्याला आधार देऊन स्थिर ठेवतात. पाठीच्या कण्याचे पाच भागांत विभाजन केलेले असून, मानेचे, छातीचे, पोट व कटीभाग, त्रिकास्थी भाग व माकडहाड असे मणके मानले गेले आहेत. हातापायाची हालचालसुद्धा अप्रत्यक्षपणे पाठीच्या कण्यांवर परिणाम करतात. पाठीच्या कण्याला मागून, पुढून व दोन्ही बाजूंनी आधार देणारे व त्याची हालचाल संतुलित ठेवणारे असे काही स्नायू आहेत. सध्या प्रसिद्धीस आलेले डळु झरलज्ञ - रल म्हणजे तो एक स्नायूच होय. कण्याचे व नितंबाचे स्नायू एकमेकांना पूरक अशा रीतीने काम करतात!

स्नायूंमध्ये आकुंचन व प्रसरण पावण्याची क्षमता असते. योग्य रीतीने व नेहमी वापरल्याने स्नायू मजबूत होतात, तर न वापरल्याने अथवा फाजील ताणाने स्नायू अशक्त बनतात. कोणत्याही कारणाने जर स्नायू कमजोर झाले, तर त्यांच्याशी संबंधित सांधा अथवा कण्यावर ताण पडू शकतो व कार्यात बिघाड होऊ शकतो. हे कार्य सुधारावे म्हणून इतर स्नायूंना जास्त काम करावे लागते. जेव्हा असा ताण इतर स्नायूंवर अतिरिक्त व सतत पडतो, तेव्हा असमतोल कामामुळे वेदना निर्माण होऊ लागते. तेव्हा रुग्ण "माझी पाठ हल्लीच दुखायला लागली हो! कारण काय तेच समजत नाही' अशी तक्रार घेऊन येतो.

पाठदुखीच्या इतर कारणांमध्ये वयपरत्वे, वापरपरत्वे व पोषणपरत्वे कण्यांची जी झीज होते, हेही कारण असते. अपघात, कुवतीपेक्षा जड सामान वर उचलणे, व्यवसायाच्या निमित्ताने संगणकासमोर अनेक तास बसावे लागणे, जड बॅग उचलून फिरावे लागणे (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज्‌, टी.व्ही. दुरुस्त करणारे इ.) बसण्याची व चालण्याची सतत चुकीची पद्धत (र्झीीींेश), मऊ अंथरुणाचा वापर करणे, अति थंड वातावरणात काम करणे, हीसुद्धा कारणे असू शकतात. काही गंभीर स्वरूपाची कारणे म्हणजे तेथे क्षयरोग, ट्यूमर अथवा कॅन्सर असणे, मणके जुळणे इ. असू शकतात.

आधुनिक तपासण्या, रुग्णाची इतर लक्षणे, त्याला पाठीत नेमके कोठे दुखते, वेदना केव्हा वाढतात इ. गोष्टी निदान करण्यास व उपचार करण्यास मदत करतात. गंभीर स्वरूपाची कारणे वगळता निसर्गोपचार, ऍक्‍युपंक्‍चर व योग्य ती योगासने व व्यायाम हे उपचार चालू करता येतात. खास तयार केलेले तेल वापरून मसाजचा उपचार काही रुग्णांना उपयुक्त ठरतो. काहींना गरम शेक उपयोगी ठरतो. स्नायूंना आलेला ताठरपणा, सूज, वेदना कमी करण्यासाठी ऍक्‍युपंक्‍चरचा उपयोग होतो. जीवनऊर्जेचा प्रवाह ज्या वाहिन्यांतून जात असतो, तेथील अडथळे दूर होऊन रक्ताभिसरण सुधारते, हा फायदा फक्त ऍक्‍युपंक्‍चरमुळेच मिळतो. निर्जंतुक केलेल्या सुया योग्य ती काळजी घेऊन रुग्णाला लावल्या जातात व त्यातून हलका विद्युतप्रवाह (सेलर चालणाऱ्या मशिनद्वारे) सोडला जातो. रुग्णाला अतिशय आराम वाटतो. स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी योग्य ती योगासने व ताणाचे व्यायाम रुग्णाकडून करून घेतले जातात. हे जर नियमितपणे केले (नंतरही) तर पाठदुखी अथवा मानदुखी वा कंबरदुखी सहसा होत नाही. निसर्गोपचारामध्ये योग्य त्या आहाराचे महत्त्व आहे व स्नायू व हाडांच्या योग्य स्थितीसाठी आहाराचा सल्लाही रुग्णास दिला जातो.

चालण्याची, बसण्याची योग्य ती पद्धत जाणून घ्यावी. वजन उचलण्याची योग्य पद्धत वापरल्यास सहसा दुखीचा त्रास होत नाही. हातात सामानाच्या पिशव्या घेताना दोन्ही हातांमध्ये साधारण समान वजन येईल, ही काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी, मोठ्या माणसांनी आपल्या बॅगा (दोन्ही खांद्यावर पट्टे येतील) योग्य निवडाव्यात. संगणकावर काम करावे लागणाऱ्यांनी मानेवर सतत ताण येणार नाही अशा ठिकाणी संगणक ठेवावा व बसताना गुडघे योग्य स्थितीत ठेवावेत. पाय लोंबते सोडून बसू नये. गाडी चालवताना चालकाच्या सीटचा फोम कमी झालेला असू नये. तो योग्य त्या प्रमाणात बदलून घ्यावा. कमरेमागे आधार देणारी छोटी उशी ठेवून गाडी चालवावी. आपल्या उंचीप्रमाणे गाडीचे मॉडेल निवडावे, हेही महत्त्वाचे आहे. कारण गाडी बदलल्यानंतर पाठदुखी जाणवू लागली, हे रुग्णाची चौकशी करताना आढळून आले आहे. जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांनी पहिल्याच दिवसापासून भरपूर व्यायामास सुरवात करू नये. हळूहळू व्यायामाचे प्रकार व रिपिटिशन्स वाढवत न्यावी. नव्याने जिम जॉइन केलेल्या तीन मैत्रिणी लागोपाठ पंधरा दिवसांतच अशा दुखींची तक्रार घेऊन आल्या होत्या.

मैत्रिणींनो, पाठदुखी पाठी लागू नये म्हणून निसर्गोपचार आहेतच; पण जर गरज लागलीच तर ऍक्‍युपंक्‍चरची भीती न बाळगता त्याचा जरूर फायदा घ्या.

- डॉ. आरती साठे
ऍक्‍युपंक्‍चर तज्ज्ञ, मुंबई।

Find your life partner online at Shaadi.com Matrimony

7 comments:

  1. Very informative. Having suffered slipped disc, I have experienced worst back pain of my life. We need more awareness about this subject, your post goes along way towards it.
    Thanks,
    Vivek

    ReplyDelete
  2. Good post. I tried accupuncture for my herniated disc and felt OK after around 2/3 months of treatment around twice a week. The problem comes back and I want if there are more precautions that I need to avoid this pain coming back. I avoid hevy lifting etc but being around a 1yr old it does come back. Would appreciate any further help.

    --A

    ReplyDelete
  3. plz drop your email address or any contact info so that I will help you whatever much i know..thanks for comments and watching this blog.

    ReplyDelete
  4. One more samadukkhi here!
    I have suffered and suffering from lower backache. Doctor has recommended a few mild stretching exercises to me, but whenever I do them, backache starts again. Why so?

    ReplyDelete
  5. Maze way 27 year.mazya makad had bhagatil mankyat sut aahe tyamule path khup dukte. va manechya,chatichya bhagatil mankyat sudha wedana hotat.pl. mala upay sanga email-jayantgarud@yahoo.in /jaywant999Mumbai@gmail.com

    ReplyDelete
  6. Good post. Thank you for sharing. I am into software industry and recently i had severe lower back pain and doctor advised me to take some medications and also advised me not to sit in front of PC for long time and take break every 30 minutes. I started doing physical exercise and i felt much better. I drove continuously 5 hours and there was very little pain in my back. Exercise made my back stronger and now i can sit for hours in front of PC. So, my advise is start exercising (stretching) and eat proper food.

    ReplyDelete

ad