Showing posts with label डोकेदुखी. Show all posts
Showing posts with label डोकेदुखी. Show all posts

Wednesday, October 13, 2010

सांभाळा डोके

डॉ. श्री बालाजी तांबे
डोके दुखणे माहीत नाही, अशी व्यक्‍ती सापडणे अवघडच असावे. वेदना वा दुखणे नकोसे वाटणे अगदी साहजिक असते; पण डोकेदुखी खरोखर खूप त्रासदायक असते.

युर्वेदात डोक्‍याला उत्तमांग म्हटले आहे; कारण डोके हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा मेंदू डोक्‍यात असतो, सर्व संप्रेरकांना चालना देणारी पिच्युटरी ग्रंथी डोक्‍यात असते, कान-नाक-डोळे वगैरे इंद्रियांचे अधिष्ठानही डोक्‍यात असते. मेंदूची जास्तीत जास्ती काळजी घ्यायला हवी, यात कोणत्याही शास्त्राचे दुमत नसावे. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. डोकेदुखीची तीव्रता, कालावधीसुद्धा व्यक्‍तीनुरूप व कालानुरूप बदलू शकते. म्हणूनच डोकेदुखीवर उपचार करताना अनेक मुद्‌द्‌यांवर विचार करावा लागतो. मुख्य म्हणजे अचूक निदान करणे खूपच गरजेचे असते.

डोकेदुखीची कारणे आयुर्वेदात याप्रमाणे दिलेली आहेत-
* मल, मूत्र, शिंक वगैरे नैसर्गिक प्रवृत्तींना अडवून ठेवणे.
* दिवसा झोपणे.
* रात्री जागरण करणे.
* अति मद्यपान किंवा अंमल चढणाऱ्या वस्तूंच्या आहारी जाणे.
* डोक्‍यावर जोराचा वारा लागणे.
* अति मैथुन करणे.
* न आवडणारा वास घेणे.
* धूळ, धूर, अतिशय थंडी किंवा उन्हाच्या संपर्कात येणे.
* पचण्यास जड, आंबट, गोष्टींचे तसेच पुदिना, मिरची वगैरे हरितवर्गातील गोष्टींचे अतिसेवन.
* अतिशय थंड पाणी पिणे.
* डोक्‍याला मार लागणे.
* अश्रूंना अडवून ठेवणे किंवा खूप रडणे.
* शरीरात आमदोष वाढणे.
* आकाशात मेघ दाटून येणे.
* अतिशय मानसिक कष्ट होणे.
* जनपदोध्वंसातील देश आणि काळ बिघडणे.

यातील एक किंवा अनेक कारणांनी वातादी दोष असंतुलित होतात आणि डोक्‍यात जाऊन तेथील रक्तधातूला दूषित करतात. यातून अनेक प्रकारचे शिरोरोग उत्पन्न होतात. या शिरोरोगांचे मुख्य लक्षण असते शिरःशूळ अर्थात डोकेदुखी.
शिरःशूळाचे एकूण 11 प्रकार सांगितलेले आहेत.

1. वातदोषा ः यामुळे होणाऱ्या डोकेदुखीमध्ये एकाएकी, क्षुल्लक कारणानेसुद्धा डोके खूप दुखू लागते. डोकेदुखी रात्री अधिक वाढते. डोक्‍यावर गरम वस्त्र आवळून बांधल्याने, तसेच डोक्‍याला शेक करण्याने या प्रकारचे दुखणे कमी होते.
2. पित्तदोष ः यामुळे डोके दुखते तेव्हा डोके व डोळ्यांची आग होते, श्‍वास गरम भासतो, दिवसा वेदना वाढतात तसेच गरम गोष्टी नकोशा वाटतात. डोक्‍याला थंड स्पर्शाने बरे वाटते. रात्री वेदना कमी होतात.
3. कफदोष ः यामुळे डोके दुखते तेव्हा बरोबरीने डोके जड, जखडल्यासारखे वाटते; चेहऱ्यावर, डोळ्यांखाली सूज दुपारनंतर सूर्य खाली जातो तसतशा वेदना कमी होत जातात आणि सूर्यास्तानंतर थांबतात.
9. अनन्तवात ः वातादी तिन्ही दोष प्रकोपित होऊन मानेत तीव्र वेदना करतात. ही वेदना भुवया, डोळे व शंखप्रदेशापर्यंत पोचते, मान जखडू शकते, हनुवटी जखडू शकते. अनंतवातामुळे विविध प्रकारचे नेत्ररोगसुद्धा होऊ शकतात.
10. अर्धावभेदक ः याला सामान्य भाषेत अर्धशिशी असे म्हणतात. यात डोक्‍याच्या डाव्या वा उजव्या बाजूला अतिशय तीव्र वेदना होतात. या वेदना इतक्‍या तीव्र असतात, की जणू डोक्‍यात शस्त्राने प्रहार होत आहेत असे वाटते किंवा ऐरणीतून आग निघत असल्यासारखे वाटते. अर्धावभेदक खूप तीव्र झाला, तर त्याचा कान किंवा डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.
11. शंखक ः रक्‍त, पित्त व वात हे तिन्ही प्रकोपित झाल्याने ही डोकेदुखी होते. ती इतकी भयंकर असते, की तीन दिवसांच्या आत योग्य उपचार न मिळाल्यास व्यक्‍ती मृत्युमुखी पडू शकते. डोकेदुखीवर उपचार करण्यापूर्वी नेमके कारण शोधून काढणे सर्वांत महत्त्वाचे असते. बहुतांशी वेळेला डोके दुखायला लागले, की केवळ वेदनाशामक उपचार करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे तात्पुरते बरे वाटले, तरी पुन्हा पुन्हा डोके दुखू शकते.

वात ः वातामुळे डोके दुखत असल्यास कानात तेल टाकता येते, नाकात तूप घालता येते, डोक्‍याला वातशामक तेल लावण्याचाही उपयोग होतो.
पित्त ः पित्तामुळे डोके दुखत असल्यास दुधात भिजविलेली आवळकाठी बारीक करून त्याचा डोक्‍यावर लेप लावल्यास बरे वाटते. दुधात तूप-साखर व थोडे केशर घालून पिण्याचाही फायदा होतो. ऊन लागून पित्त वाढत असल्यास कोकमाचे तेल व नारळाचे तेल गरम करून एकत्र करून थंड झाले, की डोक्‍याला लावण्याने बरे वाटते. गुलाबपाण्यात चंदन उगाळून त्याचा डोक्‍यावर लेप लावण्यानेही बरे वाटते.
कफ ः कफामुळे डोके दुखत असल्यास आल्याच्या रसात थोडीशी पिंपळी उगाळून त्यात थोडे सैंधव व गूळ मिसळून सेवन करण्याने बरे वाटते. सर्दीमुळे डोके दुखत असल्यास दुधात किंवा पाण्यात दालचिनी उगाळून लेप लावल्यास बरे वाटते. निर्गुडी, कडुनिंब, आघाडा यांचा पाला पाण्यात घालून त्याचा वाफारा घेतल्यानेही कफदोषाशी संबंधित डोकेदुखी दूर व्हायला मदत मिळते.
रक्त ः रक्तातील दोषामुळे डोके दुखते, त्यावर पित्तशामक उपचार करण्याचा उपयोग होतो. शतधौत तूप (म्हणजे 100 वेळा थंड पाण्याने धुतलेले तूप) डोक्‍यावर चोळण्याचा फायदा होतो. शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन आणि रक्तमोक्षण करून घेण्याचाही फायदा होतो.

सूर्यावर्त ः यासाठी सूर्योदयापूर्वी उठून शौच-मुखमार्जन झाले, की जिलबी किंवा पेढ्यासारखा गोड पदार्थ खाऊन वर पाणी पिण्याचा उपयोग होतो, असा वृद्धवैद्याधार आहे.
अर्धावभेदक ः अर्धे डोके दुखत असल्यास केशराचा संस्कार केलेले तूप नाकात टाकण्याचा उपयोग होतो. सुपारीच्या झाडाला कधीकधी निसर्गतःच अर्धी सुपारी येते, अशी अर्धी सुपारी पाण्यासह उगाळून तयार केलेला लेप दुखत असणाऱ्या बाजूवर लावण्यानेही अर्धशिशी दूर होते, असा वृद्धवैद्याधार आहे. इतर शिरःशूळ म्हणजे क्षयामुळे, कृमींमुळे होणारा शिरःशूळ, अनंतवात, शंखक वगैरेंवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार करणेच आवश्‍यक असते. कधी कधी मलावरोधामुळे किंवा अपचनामुळेसुद्धा डोके दुखू शकते. तापामुळे, रक्तदाब वाढल्यामुळेही डोके दुखू शकते. स्त्रियांच्या बाबतीत डोकेदुखीचा संबंध मासिक पाळीशी निगडित असू शकतो. अंगात उष्णता, कडकी अधिक असणाऱ्यांनाही वारंवार डोकेदुखी होण्याची शक्‍यता असू शकते. सध्याच्या काळात संगणकावर दीर्घ काळ काम करणाऱ्यांमध्ये, रात्रपाळी करावी लागणाऱ्यांमध्ये, प्रखर प्रकाशात, अति गोंगाटाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांमध्येही डोकेदुखीची प्रवृत्ती वाढते आहे असे दिसते.

वारंवार डोके दुखण्याची सवय असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा काही गोष्टी
1. आठवड्यातून किमान दोन वेळा पादाभ्यंग करणे.
2. रात्री झोपताना नाकात साजूक तूप किवा अधिक गुण यावा म्हणून नस्यसॅन घृतासारखे औषधी तूप घालणे.
3. संगणकावर काम करणाऱ्यांनी डोळ्यांत सॅन अंजनासारखे उष्णता कमी करण्यास मदत करणारे अंजन घालणे.
4. स्त्रियांनी स्त्री संतुलनाकडे, विशेषतः पाळी नियमित आणि व्यवस्थित येण्याकडे लक्ष ठेवणे.
5. उन्हात किंवा वाऱ्यात जावे लागल्यास डोक्‍याला पुरेसे संरक्षण द्यावे.
6. डोक्‍याला नियमित, कमीत कमी दोन वेळा तरी वातशामक व केसांना हितकर औषधी द्रव्यांनी संस्कारित तेल लावणे.
7. रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Thursday, February 4, 2010

डोकेदुखी

आयुष्यामध्ये माणसाला डोकेदुखी ही केव्हा ना केव्हा तरी सतावते. कधीतरी डोकेदुखी नाही असा माणूस शोधून सापडणे कठीणच! अशा या डोकेदुखीची कारणे व तीव्रता प्रत्येक माणसागणिक वेगवेगळी असू शकतात. ढोबळ मानाने डोकेदुखी ही दोन प्रकारात विभागता येते. १) तीव्र डोकेदुखी, २) सौम्य किंवा क्रॉनिक डोकेदुखी. तीव्र डोकेदुखीमध्ये डोके काही काळापुरते जास्त प्रमाणात दुखते. सौम्य डोकेदुखी ही खूप दिवस बऱ्याच दिवसांपासून असते. आंतरराष्ट्रीय डोकेदुखी संस्थेने डोकेदुखी १४ गटांमध्ये विभागली आहे. डोकेदुखीच्या निदानानुसार पहिले चार गट हे प्राथमिक डोकेदुखीचे, नंतर ४ ते १२ गट हे माध्यमिक डोकेदुखीचे व शेवटचे दोन गट मज्जातंतू व चेहऱ्याच्या दुखण्याचे समजले जातात.
डोकेदुखीच्या व्याधीचा अभ्यास फार पुरातन काळापासून सुरू आहे. १९६२ मध्ये थॉमस विलीस या शास्त्रज्ञाने डोकेदुखीचे पहिले वर्गीकरण केले. १७८७ मध्ये क्रिस्टियनबार या शास्त्रज्ञाने डोकेदुखीचे प्राथमिक व माध्यमिक असे गट करून त्यात ८४ प्रकार अंतर्भूत केले.
डोकेदुखी ही अनेक कारणांमुळे होऊ शकते. काही प्रकारांमध्ये डोकेदुखीबरोबर मान ताठ होणे, ताप येणे, आकडी किंवा फिट येणे, बेशुद्धी होणे, कान व डोळे दुखणे अशी काही लक्षणे असतील तर त्यासाठी ताबडतोब वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी लक्ष द्यावे लागते. कधीही डोके न दुखणाऱ्याचे सतत डोके दुखणे व लहान मुलांच्या डोके दुखण्याकडे ताबडतोब लक्ष देऊन वैद्यकीय तपासणी करावी लागते.
डोकेदुखीच्या कारणांचे तीन प्रकार आढळतात. १) स्थानिक, २) सार्वदेहिक, (शरीराशी संबंधित),
३) प्रतिक्षेपित (शरीराच्या एका भागातील आवेगामुळे इतरत्र झालेल्या प्रतिक्रियेमुळे).
स्थानिक कारणांमध्ये सर्दी, नासा केटरातील शोथ (चेहऱ्याच्या हाडामधील नाकाशी जोडलेल्या हवा असलेल्या पोकळीच्या अंतत्र्वचेची दाहयुक्त सूज), डोळ्यातील काचबिंदू मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या मज्जेच्या शाखेस सूज येणे, मस्तिष्क शोथ (मेंदूची दाहयुक्त सूज) परिमस्तिष्क शोथ (मेंदूच्या आवरणाची सूज) व मस्तिष्कातील अर्बुदे (गाठी) यांचा अंतर्भाव होतो.
सार्वदेहिक कारणांमध्ये कोणत्याही कारणाने आलेला ज्वर, मूत्रपिंडाचा विकार, रक्तदाबाधिक्य, मद्यपान वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. प्रतिक्षेपित कारणांमध्ये यकृताचे विकार अपस्मार(फेफरे), हिस्टेरिया, अतिविचार, मानसिक क्षोभ, जागरण, अतिवाचन, दृष्टिदोष, अतिशय झगझगित प्रकाश यांचा अंतर्भाव होतो.
सर्दी झाल्यावर प्रथम डोके दुखते. सर्दी ही गारठा, जंतुदोष व अ‍ॅलर्जीमुळे होते. थंड हवा किंवा गारठा असल्यास शरीराचे उष्णतामान खाली येते. ज्यामुळे सर्दी होऊ शकते. काही जणांना धूर, धूळ, परागकण यांची अ‍ॅलर्जी असते. अशा व्यक्ती वरील कारणांच्या संपर्कात आल्यावर त्यांना सर्दी होते. अतिसूक्ष्म अशा विषाणूंचा संसर्ग हा श्वासमार्ग, घसा व नाक यांना झाल्यास डोके जड होते. व आतील भागाला सूज येते. सर्दीचा संसर्ग नाकाजवळील वातपोकळीत पोहचून त्याचा दाह सुरू होतो व त्यामुळे डोके दुखते. उध्र्वश्वसनसंस्थेच्या जंतुसंसर्गामुळे सायनस नावाचे दुखणे संभवते. यामध्ये डोक्याच्या व चेहऱ्याच्या हाडांमधील पोकळ जागांमध्ये चिकट द्रवपदार्थ साठतो व डोके दुखते.
अंगात ताप असताना डोके दुखते. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये डोकेदुखी तीव्र किंवा सौम्य असते. टायफॉईड, मलेरिया, पोलीओ, कांजण्या, मेंदूज्वर, गोवर, इनफ्ल्यूइन्झा यामध्ये तापाचे व डोकेदुखीचे प्रमाण तीव्र असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे बऱ्याचजणांची डोकेदुखी ही चिंतेमुळे असते. श्रीमंत पैसे लपविण्याची चिंता करतात. गरीब दोनवेळच्या जेवणाची चिंता करतात. मध्यमवर्गीय संसाराविषयी, मुलाबाळांचे आरोग्य व शिक्षणाविषयी चिंता करतात. अशी माणसे सतत बेचैन राहतात. व डोकेदुखीला सामोरे जातात.
काही जणांना मानसिक विकृती असतात. या मानसिक ताणांमुळे डोकेदुखी होऊ शकते. डोकेदुखी बरोबर चक्कर येत असेल तर रुग्णाला मधुमेह, उच्चरक्तदाब औषधांची अ‍ॅलर्जी, दारू-तंबाखूचे व्यसन, मेंदूचा विकार, लॅबरिनथाईन व्हरटिगो यापैकी एक कारण असू शकते.मेनिंनजायटिस म्हणजे मेंदूच्या आवरणाला सूज येणाऱ्या आजारात प्रचंड डोकेदुखी असते व ताप येतो. काही वेळेस बेशुध्दी असते. हाडांच्या कवटीमधल्या मेंदूभोवती ३ आवरणे असतात. त्यांना मेनिनजेस म्हणतात. या तीन आवरणातील बाहेरच्या दोन आवरणांमध्ये सेरेब्रोस्पाइनल किंवा मज्जाद्रव असते. या द्रवाला बुरशी, विषाणू क्षयाचे जंतू, जिवाणू यांचा जंतुसंसर्ग झाल्यास वरील प्रकारचा आजार उद्भवतो. मेंदूच्या आतमध्ये असणाऱ्या पोकळीमध्ये द्रव असते. या पाण्यासारख्या द्रवाचा योग्य निचरा न झाल्यास त्याचा दाब मेंदूवर पडून डोकेदुखी सुरू होते. मेंदूच्या आवरणांना सूज येऊन जर रक्तस्राव झाला तर डोके फुटल्याप्रमाणे वेदना होऊन बेशुद्धी होते व रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवावे लागते.
चेहरा व डोक्यामागील भागातील मज्जातंतूंची वेदना असेल तर डोके प्रचंड दुखते. काही वेळेस डोके हे विशिष्ट ठिकाणी दुखत असेल तर मेंदूमध्ये गाठ असण्याची शक्यता असते. मानेच्या व डोक्याच्या मागच्या बाजूस डोकेदुखी असेल तर ती रक्तदाब वाढल्यामुळे होते. काही औषधे जसे सॉरबिट्रेट जे रक्तवाहिनी रुंदावण्याचे काम करते. यामुळे डोकेदुखी होऊ शकते. मलावरोध होऊन शौचाला साफ होत नसेल तर काही वेळेस डोकेदुखी होते. शौचाला न झाल्यामुळे आतडय़ातून विषारी व अनावश्यक द्रव्ये परत रक्तात शोषली जातात त्यामुळे डोकेदुखी वाढते. स्थूलता, वारंवार दिली जाणारी काही औषधे, बाळंतपण व म्हातारपण यामध्ये कमेरेचे व पोटाचे स्नायू अशक्त होतात. तसेच घामावाटे शरीरातील पाणी बाहेर जास्त प्रमाणात टाकले गेले तर वरील सर्व शक्यतांमध्ये मलाविरोध होऊ शकतो. मूत्रपिंडाचे कार्य बिघडल्यावर रक्तातील अनावश्यक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जात नाहीत. यामुळे डोकेदुखी होऊन रक्तदाब वाढतो व हातापायांवर सूज येते. काही वेळेस इतर अवयव जसे जठर, यकृत, प्लीहा गर्भाशय यात जर काही बिघाड असेल तर तेथील वेदना मज्जातंतूद्वारे डोक्यात परावर्तीत होऊन डोके दुखते. मायग्रेन किंवा अर्धशीशीचा त्रास असेल तर डोके अर्धे दुखते. हे दुखणे बरेच दिवस चिवटपणे राहते. डोळ्यावर ताण पडल्यावर डोके दुखते. सतत शिवणकाम, वाचन करणे, टी.व्ही. बघणे यामुळे डोळ्यांवर ताण पडतो व डोकेदुखी सुरू होते.
साध्या वैद्यकीय तपासण्या व उपचारांनी डोकेदुखी थांबत नसेल तर मज्जातंतूच्या विकारासाठी किंवा सूज व दाह असण्याची शक्यता पडताळण्यासाठी हेड सिटीस्कॅन नावाची तपासणी केली जाते. ज्यामध्ये मेंदूच्या सर्व कोनातून फोटो घेतले जातात. ज्यामुळे दाह किंवा सूज कोणत्या भागात आहे हे समजते. त्यामुळे पुढील उपचार करणे सोपे जाते. अशा या विविध प्रकारच्या डोकेदुखींवर वेगवेगळे उपचार केले जातात. जीवाणू, विषाणूंमुळे होणाऱ्या सर्दी व तापातील डोकेदुखीवर गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. क्रोसिन किंवा मेटॅसिनच्या १-२ गोळ्या घ्याव्यात. नाकामध्ये ऑट्रीव्हीनसारखे ड्रॉप्स टाकावेत. प्रतिजैविके (अ‍ॅन्टीबायोटिक्स) योग्य प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. सायनसचा त्रास होत असेल तर वरील सर्व उपायांबरोबर सायनसच्या भागावर शेक द्यावा. जंतुसंसर्गात ताप जास्त असेल तर डोक्यावर बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्टय़ा ठेवाव्यात.
मेंदूच्या आवरणाचा दाह किंवा सूज असेल तर मेंदूवर वाढलेला दाब कमी करण्याकरता मज्जाद्रव पाठीच्या कण्यातून काढावा लागतो. त्यासाठी रुग्णाला रुग्णालयात नेऊन प्राणवायू देऊन डॉक्टरांच्या देखरेखेखाली ही प्रक्रिया करावी लागते, तसेच सल्फा किंश टेट्रासायक्लिन क्लॉरॅमफेनिकॉल अशी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावी लागतात. टी. बी. मेनिंनजायटिस असेल तर स्ट्रेप्टोमायसिन आयसोनायझाईड वगैरे औषधे योग्य प्रमाणात घ्यावी लागतात. डोकेदुखी ही चिंतेमुळे होत असेल तर डॉक्टर कॉम्पोज ही एक गोळी किंवा इतर काही औषधे देतात. ज्यामुळे मन शांत होऊन झोप लागते. मलावरोधाने डोके दुखत असेल तर सौम्य रेचक देता येते. जास्त पाणी पिण्याने व पालेभाज्या खाल्ल्याने ही सवय कमी होऊ शकते. पोटाचे व्यायाम केल्याने व गरम पाणी पिण्याने शौचास साफ होऊ शकते. रक्तदाब वाढल्याने डोके दुखू लागले तर भरपूर विश्रांती घ्यावी. खारवलेले पदार्थ टाळावेत, धूम्रपान, मद्यपान, टाळावे. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. योगासने करावीत.  आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये डोकेदुखीसाठी खालीलप्रमाणे उपाय केले जातात. रक्तधातूतील दुष्टीमुळे होणाऱ्या शिर:शूलमध्ये शिंग, जळू, तुंबडी वापरून रक्त काढावे लागते. वानज शिर:शूळ असेल तर महावात विध्वंस व महायोगराज गुग्गुळ आल्याच्या रसाबरोबर दिले जाते. अगुतेल व नारायणतेल गरम करून नाकात घालावे. पित्तज शिर:शूळ असेल तर प्रवाळ सुवर्णमाक्षिक मौक्तिकभस्म मोरावळ्याच्या रसात किंवा डाळिंबाच्या पाकात चाटवावे. कफज शिर:शूळ असेल तर वातज शिर:शुळातील औषधे गरम पाण्याबरोबर किंवा दशमूलारिष्टाबरोबर द्यावीत. एवढय़ा उपायांनी जर डोकेदुखी नाही थांबली तर वातजावर शिरोबस्ती, पित्तजावर रेचक व कफजावर वमनचिकित्सा आयुर्वेदात केली जाते.
अशी ही डोकेदुखी होऊच नये म्हणून खालील काळजी घ्यावी. जीवाणू व विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून शरीराची प्रतिकारशक्ती वाढवावी, त्यासाठी समतोल सकस आहार घेणे जरुरी आहे. धूर, धूळ यापासून स्वत:चे संरक्षण करून स्वच्छतेवर भर द्यावा. अ व ड जीवनसत्वयुक्त आहाराने प्रतिकारशक्ती वाढते. दूषित हिरडय़ा, टॉन्सिल्सचा त्रास, फुटलेला कान यावर ताबडतोब उपचार करावेत. अन्यथा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. अर्धशीशीचा त्रास असेल तर कडक उन्हात फिरणे टाळावे. थंड हवेपासून स्वत:चा बचाव करावा. डोळ्यांमुळे होणाऱ्या डोकेदुखीसाठी नेत्रतज्ज्ञांकडून आवश्यक ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जागरणे, मानसिक तणाव, उपोषण निर्जली उपाय टाळल्यास डोकेदुखीला आमंत्रण मिळत नाही. औषधांची गरज असल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. योगामधील शवासन केल्यास मानसिक थकवा व ताण कमी होऊ शकतो. अ‍ॅक्युपंक्चरच्या उपायाने सततची डोकेदुखी काही प्रमाणात कमी होऊ शकते. मार्च २००७ मध्ये काही संशोधकांनी असे प्रसिद्ध केले आहे की मेंदूला इलेक्ट्रोड जोडून मेंदूला उत्तेजित करून डोकेदुखी कमी होऊ शकते. नामस्मरण व अध्यात्मानेसुद्धा मनाचा ताण कमी होऊन डोकेदुखीसारख्या व्याधी आपल्यापासून दूर राहू शकतात. अशा या डोकेदुखीसाठी वेळेवर उपचार, पथ्य झाल्यास आपण आपले दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालवू शकतो.Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad