रामनवमीला पंजिरी खाण्याने नुसतेच उन्हाळ्यापासून संरक्षण मिळते असे नव्हे, तर त्यात वीर्यवर्धक, पौष्टिक व बाहेरचा उष्मा सहन होऊन स्वस्थ झोप मिळेल अशा घटकांचीही व्यवस्था केलेली असते. पंजिरी केवळ रामनवमीलाच खावी असे नव्हे, तर रामजन्मापासून पुढे महिनाभर, अगदी ज्येष्ठ महिन्यापर्यंत खायला हरकत नाही. याने खूप फायदा होऊ शकेल. शरीराला ताकद मिळण्यासाठी, स्नायूंना बळकटी आणण्यासाठी लहान मुलांना चमचाभर भिजविलेली चण्याची डाळ देण्याची पद्धत लक्षात घेतली तर हनुमान जयंतीला गूळ-चणे खाण्यामागचा अर्थ लक्षात येईल.
भा रतीय संस्कृती ही संपूर्णपणे केवळ मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करते. त्या निमित्ताने सण-वार, देव-धर्म, पूजा-अर्चा, यज्ञ-कर्म अशा अनेक गोष्टी परंपरेत आणून मनुष्यमात्राला समृद्धीबरोबर आरोग्य मिळेल याचाच विचार केलेला असतो. तसे पाहता खरे म्हणजे देवाला प्रेमाशिवाय काहीही नको असते. मनुष्याला पण हवे असते प्रेम. तेव्हा चंदनाची उटी, केशराची फुले, सुवर्णालंकार व मोदकमेवा हे सर्व देवाला आवश्यक नसते. प्रसाद देवाला दाखवला तरी शेवटी तो खाल्ला जातो दाखवणाऱ्याकडूनच. म्हणूनच सुदाम्याच्या मूठभर पोह्यांनी श्रीकृष्ण जेवढे प्रसन्न झाले तेवढे अन्नाचे 56 भोग लावूनही झाले नसतील. देवाला अर्पण केलेल्या प्रसादात वातावरणातील श्रद्धेमुळे देवाचा आशीर्वाद ओढला जातो व गूळ-दाण्यांचे रूपांतर प्रसादात होते. शिरा कितीही चांगला झालेला असला व तो कितीही खाल्ला तरी समाधान होत नाही, पण तोच शिरा प्रसाद म्हणून ग्रहण केला की होणारे समाधान अनोखे असते. पूजेत विज्ञान आहेच, ते कळले नसले तरी पूजा केल्यावर व प्रसाद खाल्ल्यानंतर माणसाला मिळणारी आत्मतृप्ती व समाधान लॉटरीचे मोठे बक्षीस लागले तरी होत नाही. हाच प्रसादाचा फायदा.
भारतीय सणांची योजना करताना त्या त्या वेळचे ऋतुमान, त्या ठिकाणचा काळ लक्षात घेऊन काय खावे काय न खावे, कुठले पक्वान्न असावे असे अलिखित नियम तयार झालेले दिसतात. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची चटणी व नंतर तोंड गोड करणारे श्रीखंड, त्यानंतर येणाऱ्या रामनवमीला मिळणारी पंजिरी आणि हनुमान जयंतीला मिळणारे चणे-गूळ आरोग्याला लाभदायक असतात. श्रीखंड पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे. असे श्रीखंड शरीरात सहज सात्म्य व्हावे व शरीराला पुष्टी मिळावी, वीर्य व आरोग्य मिळावे या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे. यात जवळचा रस्ता शोधण्यासाठी व स्वस्तात साधन शोधण्यासाठी बदल केला आणि त्यामुळे श्रीखंड बाधले तर त्याची जबाबदारी गुढीपाडव्यावर नसते. ही जबाबदारी, अन्न नेहमी चांगल्या गुणवत्तेचे व सात्त्विक असावे हा सर्वसाधारण नियम डावलून पैसे वाचविण्यासाठी खाल्लेल्या अन्नावर वा तसा विचार करणाऱ्यावर असते. आयुर्वेदिक श्रीखंड करताना दही ज्या मातीच्या भांड्यात लावायचे ते कापराने धुपवलेले असते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो, श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप टाकलेले असते.
चैत्र-वैशाख हा वसंत ऋतू. या वेळी उन्हाळ्याची नुकतीच सुरवात झालेली असते. या दिवसाचे वर्णन "चैत्रमास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती? दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला, राम जन्मला गं सखी राम जन्माला, ' या शब्दांत गीतरामायणात केलेले आहे. या दिवसात जिवाची काहिली झाली नाही, जिवाची तगमग वाढली नाही तरच नवल. म्हणून रामनवमीच्या प्रसादासाठी "पंजिरी'ची योजना केलेली असते. मूत्रविसर्जन व्यवस्थित व्हावे, मूत्राघात होऊ नये, जळजळ होऊ नये, शरीरात उष्णता वाढू नये, डोळ्यांची आग होऊ नये, अन्नपचन व्यवस्थित व्हावे आणि शरीरातील अग्नी संतुलित राहावा म्हणजेच शरीरातील हार्मोन्सची व्यवस्था नीट चालावी या दृष्टीने पंजिरीत ओवा, सुंठ, धणे यांचा समावेश केलेला असावा. मधुर रसाशिवाय प्रसाद नसतो, पक्वान्न नसते, त्यामुळे या प्रसादात साखर असतेच. ज्यांच्याजवळ सोय असेल त्यांना चारोळी, बदाम, पिस्ता, केशर हे पदार्थही यात टाकता येतात. अशा रीतीने बनविलेली चमचाभर पंजिरी खाऊन भांडेभर पाणी प्यायल्यावर राम अंतर्यामी दर्शन देऊन जातो. वसंत ऋतूत वितळणारा कफ त्रास देऊ शकतो तेव्हा कफदोष कमी करण्याचीही या प्रसादात व्यवस्था केलेली असते. सर्वसामान्यांच्या घरी पंजिरी फार कष्ट न घेता व फार पैसे खर्च न करताही बनवलेली असू शकते किंवा एखाद्या स्वयंभू मंदिरात वा हृदयस्थ रामाच्या दर्शनासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी विशेष पंजिरीची योजना केलेली असते. आयुर्वेद ही कुठलीही मागणी पूर्ण करणारी व आरोग्य देणारी कामधेनू आहे. साध्या पंजिरीमध्ये धणे, बडीशेप, थोडीशी सुंठ, जिरे वगैरे टाकलेले असते; तर विशेष पंजिरीमध्ये धणे, बडीशेप, डिंकाची लाही, मिरी, सुंठ, वेलची, जायफळ, जायपत्री वगैरेंची योजना केलेली असते. पंजिरी खाण्याने नुसतेच उन्हाळ्यापासून संरक्षण मिळते असे नव्हे तर त्यात वीर्यवर्धक, पौष्टिक व बाहेरचा उष्मा सहन होऊन स्वस्थ झोप मिळेल अशा घटकांचीही व्यवस्था केलेली असते. पंजिरी केवळ गुढीपाडव्याला वा रामनवमीलाच खावी असे नव्हे तर रामजन्मापासून पुढे महिनाभर, अगदी ज्येष्ठ महिन्यापर्यंत खायला हरकत नाही. याने खूप फायदा होऊ शकेल. शरीराला ताकद मिळण्यासाठी, स्नायूंना बळकटी आणण्यासाठी लहान मुलांना चमचाभर भिजविलेली चण्याची डाळ देण्याची पद्धत लक्षात घेतली तर हनुमान जयंतीला गूळ-चणे खाण्यामागचा अर्थ लक्षात येईल व हनुमान देवता ताकदीची व बलदंड का आहे हेही लक्षात येईल.
हे सगळे पहिले की एकूण आयुर्वेद अनेक प्रकारे मनुष्यमात्राची कशा प्रकारे काळजी घेतो हे लक्षात येईल आणि चरक, सुश्रुत या आचार्यांना मनोमन नमस्कार केल्याशिवाय राहता येणार नाही.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love
Abstract India : A blog where you will find many Health, Ayurveda articles, thanks to Shree Balaji Tambe and Esakal.
Showing posts with label ऋतू. Show all posts

Friday, April 4, 2014
उन्हाळ्याचे औषध पंजिरी
- डॉ. श्री बालाजी तांबे
| |
रामनवमीची पंजिरी आणि हनुमानजयंतीचे गूळ-चणे यांची चव आपण सर्वांनी कधी ना कधी घेतलेली असेल. या दोन्ही दिवशी विशेष प्रसादाची योजना आपल्या संस्कृतीमध्ये केलेली आहे. यासाठी लागणारी घटकद्रव्ये तशी पाहता साधीच असतात, प्रत्येकाच्या घरात असतात. मात्र त्यांची प्रसादरूपाने योजना करण्याने अंततः आपलेच आरोग्य सुरक्षित राहत असते. संस्कृतीतील गोष्टींकडे जरा डोळसपणे पाहिले तर लक्षात येते की, नैवेद्य, प्रसाद, निरनिराळी फुले, पाने वापरून केली जाणारी पूजा, धूप, आरती अशा सर्व गोष्टी करण्यामागे आरोग्यरक्षण हा मुख्य उद्देश असतो.
आयुर्वेद, भारतीय संस्कृती आणि आरोग्यरक्षण या तिन्ही गोष्टींची सांगड अशी काही पक्की घातलेली आहे की तिचा पदोपदी अनुभव घेता येतो. चैत्राची सुरवात म्हणजेच वसंत ऋतूचे आगमन. वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाला गुढीमध्ये दिलेले अढळ स्थान, जेवणाच्या सुरुवातीला सेवन केली जाणारी कडुनिंबाची चटणी याचीच उदाहरणे होत. पाडव्याच्या पाठोपाठ येतात ते रामनवमी व हनुमान जयंती हे दोन उत्सव. याही दिवशी विशेष प्रसादाची योजना आपल्या संस्कृतीमध्ये केलेली आहे. यासाठी लागणारी घटकद्रव्ये तशी पाहता साधीच असतात, प्रत्येकाच्या घरात असतात मात्र त्यांची प्रसादरूपाने योजना करण्याने अंततः आपलेच आरोग्य सुरक्षित राहत असते.
रामनवमीची पंजिरी आणि हनुमान जयंतीचे गूळ-चणे यांची चव आपण सर्वांनी कधी ना कधी घेतलेली असेल. आजआपण त्याचे आरोग्यदायी गुणधर्म काय असतात, हे पाहणार आहोत. रामनवमीला केल्या जाणाऱ्या पंजिरीमध्ये मुख्य घटकद्रव्य असतात, धणे, बडीशेप, सुंठ, जिरे, डिंकाची लाही, थोड्या प्रमाणात ओवा, मिरी, खसखस, वेलची, जायफळ, जायपत्री, केशर आणि अर्थातच खडीसाखर. कोणत्याही स्वयंपाकघरात मिळू शकतील अशा या गोष्टी औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहेत, हे आयुर्वेदातील पुढील माहितीवरून लक्षात येईल.
धणे - कोथिंबिरीची फळे म्हणजे धणे. धणे त्रिदोषशामक असतात. वसंत म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात. वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराचा दाह होऊ नये यासाठी धण्यासारखे उत्तम औषध नाही. उष्णता वाढली की शरीरात साठलेला कफदोष वितळण्यास सुरवात होते, परिणामतः सर्दी, शिंका, ताप, खोकला वगैरे कफाचे त्रास होऊ शकतात. कफदोषाचा हा प्रकोप शांत करण्याचे कामही धणे उत्तम प्रकारे करतात. तापामध्ये शरीराचा दाह होतो, कितीही पाणी प्यायले तरी तहान शमत नाही अशा वेळी धण्याचे पाणी किंवा धण्याचा काढा घेणे उत्तम असते. उष्णता वाढली की "उन्हाळी' लागण्याचा त्रासही अनेकांच्या अनुभवाचा असतो. धणे मूत्रल म्हणजे लघवीचे प्रमाण वाढवून मूत्राशय साफ होण्यास मदत करणारे असल्याने लघवी कमी होणे, दाहयुक्त होणे, अडखळत होणे वगैरे त्रासांवर धण्याचे पाणी साखरेसह घेणे उपयुक्त असते. धणे पचनक्रियेस मदत करणारे व आमदोषाला पचविणारे असल्याने पोट जड होणे, भूक न लागणे, वायू न सरणे वगैरे त्रासातही धणे उपयोगी ठरतात.
बडीशेप - सर्वसाधारणतः मुखशुद्धीसाठी प्रसिद्ध असणारी बडीशेप अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते. मुख्यत्वे वातदोष व कफदोष कमी करणारी बडीशेप पचनसंस्थेसाठी हितावह असते. वसंतऋतूत कफ वितळला की, त्यामुळे अग्नी मंदावणे स्वाभाविक असते. या मंद अग्नीला पुन्हा प्रदीप्त करण्याचे काम बडीशेप करू शकते. पोटात वायू धरणे, त्यामुळे पोट दुखणे, जड वाटणे वगैरे सर्व तक्रारींवर बडीशेप भाजून घेऊन खाण्याचा उपयोग होतो. अगदी लहान बालकांनाही बडीशेप पाण्यात उकळून तयार केलेला काढा थोडा थोडा देण्याने वात सरायला मदत मिळते. लहान मुलांची कफ प्रवृत्ती असतेच, त्यामुळे अग्नी मंद झाला की, त्यातून वारंवार खोकला, ताप, जुलाब, भूक न लागणे वगैरे त्रासांना आमंत्रण मिळते. यावरही बडीशेपेचे पाणी किंवा काढा पिण्याचा उपयोग होतो. पोटात आव होऊन जुलाब होत असतील, पोटात मुरडा येऊन शौचाला जावे लागत असेल तर त्यावरही बडीशेप उपयोगी पडते.
सुंठ - "विश्वभेषज' म्हणजे विश्वातील सर्व रोगांवर औषध म्हणून उपयोगी पडणारी सुंठ चवीला तिखट असली तरी विपाकाने म्हणजे पचनानंतर मधुर होते. म्हणूनच मुख्यत्वे वात व कफदोष कमी करणारी सुंठ पित्त वाढवत नाही. सुंठीची विशेषतः अशी, की ती जिभेवर ठेवल्या ठेवल्याच तिचे काम करू लागते. सुंठीचे चूर्ण तोंडाचा बेचवपणा दूर करते, मुख व कंठामधील कफदोष दूर करून स्वर सुधारण्यासही मदत करते. सुंठ ही पचनसंस्थेसाठी वरदानच होय. वसंतातील कफप्रकोपामुळे मंदावलेला अग्नी पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी, शरीरातील आमदोष पचविण्यासाठी, जुलाब, ताप, आमवात वगैरे विकार बरे करण्यासाठी सुंठ हे एक उत्कृष्ट औषध समजले जाते. तापामध्ये सुंठ व पित्तपापडा यांचा काढा थोडा थोडा घेण्याचा उपयोग होतो. आमवातामध्ये सुंठ-गूळ-तुपाची गोळी घेणे चांगले असते.
जिरे - जिरे स्वयंपाकघरात जेवढे वापरले जाते तेवढेच ते आयुर्वेदिक औषधांमध्येही महत्त्वाचे असते. अग्निदीपन, अन्नपचनासाठी जिरे हे एक उत्तम औषध आहे. अग्नीची कार्यक्षमता वाढवणे, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणे, तोंडाचा बेचवपणा दूर करणे अशी किती तरी कामे जिरे करत असते. ताकाबरोबर घेतलेले जिरे पोटातील वायू सरून जाण्यास मदत करते, ग्रहणीरोगात हितकर असते. साखरेबरोबर घेतलेले जिरे पित्तामुळे होत असलेल्या उलट्या थांबविण्यास मदत करते. लोण्याबरोबर घेतलेले जिरे शुक्रासाठी पोषक असते. लघवी कमी, अडखळत किंवा दाह होऊन होत असल्यास धण्या-जिऱ्याचे पाणी पिण्याने लगेच बरे वाटते. याशिवाय डोळे, बुद्धी यांसाठीही जिरे उपयोगी असतात. बाळंतिणीसाठी जिरे फारच उपयुक्त असते. गर्भाशयशुद्धी, स्तन्यवृद्धी, स्तन्यशुद्धी अशी अनेक कार्ये जिरे करत असते. अशा प्रकारे वसंतातील मंदावलेले पचन पुन्हा सुरळीत होण्यासाठी जिऱ्याचे योगदान महत्त्वाचे होय.
ओवा - प्रकुपित कफाचे शमन करण्यासाठी ओव्यासारखे उत्तम औषध नाही. कफ वाढला की परिणामतः अग्नी मंदावतो, तोंडाची चव जाते अशा वेळी ओवा खाणे उत्तम होय. मिठाबरोबर भाजलेला ओवा जेवणानंतर खाण्याने वायू सरण्यास मदत मिळते, पोटदुखी कमी होते, जंत होण्याच्या प्रवृत्तीलाही आळा बसतो.
वेलची - ही त्रिदोषशामक असते. अतिशय सुगंधी व चविष्ट असणारी वेलची पदार्थाचा स्वाद तर वाढवतेच; पण तोंडालाही रुची आणते. वसंतातील उष्णतेमुळे वाढणारा कफदोष कमी करण्यासाठी व मंदावलेल्या पचनाला ताकद देण्यासाठी वेलची उत्तम होय. लघवीला जळजळ होणे, अडखळत होणे, वाढत्या उष्णतेमुळे डोके दुखणे अशा अनेक तक्रारींवर वेलची औषध म्हणून वापरली जाते.
केशर - अतिशय सुगंधी व रसायन गुणांनी युक्त केशर त्रिदोषशामक असते. केशर रक्तधातूला वाढवते, रक्तशुद्धीसुद्धा करते, त्यामुळे कांतिवर्धनासाठी उत्तम असते. वाढलेला कफदोष कमी करणे, रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवणे, अग्नीची कार्यक्षमता वाढवणे यासाठी केशर उत्तम असते, अगदी कमी मात्रेतही केशर उत्तम गुणकारी ठरू शकते.
जायफळ, जायपत्री - कफशामक, कृमिनाशक असे जायफळ अतिशय सुगंधी असते. केशराप्रमाणे जायफळ व जायपत्री अगदी थोड्या प्रमाणात वापरायची असते. पचनसंस्थेत वाढलेला कफदोष शोषून घेण्याची क्षमता यात असते. त्यामुळे अग्नी प्रदीप्त होतो, पचन सुधारते, जंत कमी होतात, मुखदुर्गंधी नष्ट होते, खोकला, दमा वगैरे विकारातही आराम मिळतो.
डिंक - उत्तम प्रतीचा बाभळीचा डिंक हा नैसर्गिक कॅल्शिमयचा उत्तम स्रोत असतो, हाडांना ताकद मिळावी व एकंदर शक्ती टिकून राहावी यासाठी साजूक तुपात तळून घेतलेला डिंक (डिंकाची लाही) अतिशय पौष्टिक असतो.
खसखस - हीसुद्धा अतिशय पौष्टिक व रसायन गुणांनी युक्त असते, हाडांसाठी पोषक असते.
अशा प्रकारे पंजिरीतील प्रत्येक घटकद्रव्य या ऋतूत आपले आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करणारे आहे. रामनवमीच्या निमित्ताने पंजिरी करून ठेवली व उन्हाळा संपेपर्यंत रोज खाल्ली तर उन्हाळ्यासारखा अवघड ऋतू कधी सुरू झाला व कधी संपला, हे कळणारही नाही.
हनुमान जयंतीला चणे-गूळ एकत्र करून देण्याची पद्धत असते. हरभरे भाजून त्याचे चणे तयार केले जातात. यालाच फुटाणे असेही म्हणतात. चांगल्या प्रतीच्या हरभऱ्यापासून बनविलेले फुटाणे किंवा फुटाणे सोलून तयार केलेले डाळे हे रुचकर तर असतातच; पण पौष्टिकही असतात. अतिप्रमाणात घाम येणे, अनुत्साह वाटणे, कफदोष वाढल्यामुळे अंगाला जडपणा येणे, अकारण थकवा जाणवणे वगैरे तक्रारींवर चणे उपयोगी असतात. नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी चणे धातुपुष्टीस उत्तम होत. चण्याबरोबर गुळाची योजना केलेली असते कारण गुळातील उष्णता चणे पचवण्यास मदत करते. गुळाचा खडा तोंडात ठेवला रे ठेवला की त्यातून लगेच शरीराला शक्ती मिळते म्हणून उन्हातान्हातून आल्यावर गूळ-पाणी देण्याची पद्धत असते. गूळ हा रक्तवर्धकही असतो. अशा प्रकारे हनुमानजयंतीला दिला जाणारा चणे-गुळाचा प्रसादही आरोग्याच्या दृष्टीनेच योजलेला आहे.
थोडक्यात, नैवेद्य, प्रसाद, निरनिराळी फुले, पाने वापरून केली जाणारी पूजा, धूप, आरती अशा सर्व गोष्टी करण्यामागे आरोग्यरक्षण हा मुख्य उद्देश असतो. संस्कृती महत्त्वाची समजणाऱ्यांना, परंपरेचा सन्मान करणाऱ्यांना हा फायदा आपसूकच मिळत असतो.

Saturday, December 31, 2011
हिवाळ्यातील ऊब - आहार 2
डॉ. श्री बालाजी तांबे

ऋतुनुसार आहारात बदल केले तर तो आरोग्यरक्षणास हातभार लावणारा असतो. हिवाळ्यातल्या थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शरीर उबदार राहणे आवश्यक असते. याला मदत करण्यासाठी, तसेच वर्षभरासाठी शरीरशक्ती कमवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात आहारात विशेष पदार्थ समाविष्ट करता येतात.
आहार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ऋतूनुसार आहारात बदल केले तर तो आरोग्यरक्षणास हातभार लावणारा असतो. हिवाळ्यातल्या थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शरीर उबदार राहणे आवश्यक असते. याला मदत करण्यासाठी, तसेच वर्षभरासाठी शरीरशक्ती कमवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात आहारात विशेष पदार्थ समाविष्ट करता येतात. मागच्या अंकात या पदार्थांचा उल्लेख केला होताच. आज आपण त्यांच्यापासून बनवलेल्या काही पाककृतींची माहिती घेणार आहोत.

हळद उष्ण वीर्याची असते, कफदोष, वातदोष कमी करणारी, रक्त शुद्ध करणारी असते. आंबेहळद गुणाने हळदीसारखीच असते. ओली हळद, ओली आंबेहळद आणि आले यांचे मीठ व लिंबाच्या रसाबरोबर लोणचे करून ठेवता येते. हिवाळ्यात हे लोणचे खाल्ले असता पचन नीट राहते, शरीराला आवश्यक ती ऊबही मिळते.
आलेपाक
रक्ताभिसरण वाढवून शरीर उबदार राहण्यास मदत करणारे घरगुती औषध म्हणजे आले. आले पचनास मदत करते, अग्नीस प्रदीप्त करते, खोकला, सर्दी, दमा वगैरे त्रासात उपयोगी असते. आल्यापासून आलेपाक बनवून ठेवता येतो. हिवाळ्यात रोज सकाळी किंवा जेवणाअगोदर आलेपाक खाल्ला तर त्याने पचन सुधारण्यास आणि ऊब मिळण्यास चांगली मदत मिळते.
आल्याचा रस काढावा, त्यात दोन किंवा तीन पट साखर घालावी, थोडे पाणी मिसळून पाक करावा. पाक तयार झाला की त्यात वरून केशर, वेलची, जायफळ, जायपत्री, लवंग यांचे चूर्ण घालावा. ताटात तापून त्याच्या वड्या पाडाव्यात व भरून ठेवाव्यात.
अहळीव लाडू
अहळीव वीर्याने उष्ण व शरीरपोषक असतात. वातदोषाचे संतुलन व्हावे आणि कंबरेत ताकद यावी म्हणून हिवाळ्यात अहळिवाचे लाडू किंवा खीर खाणे चांगले असते. यातील इतर घटकद्रव्येही शक्तिवर्धक असतात.
घटकद्रव्ये
- अहळीव 25 ग्रॅम
- गूळ 300 ग्रॅम
- बदाम 50 ग्रॅम
- काजू 50 ग्रॅम
- पिस्ते 50 ग्रॅम
- जायफळ पूड छोटा सपाट चमचा
- नारळाचा चव 100 ग्रॅम
- नारळाचे पाणी/दूध आवश्यकतेप्रमाणे
2. बदाम, पिस्ते, काजू यांची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.
3. फुगलेले अहळीव, नारळाचा चव व किसलेला गूळ जाड बुडाच्या पातेल्यात एकत्र करून मंद आचेवर ठेवून शिजवावे.
4. शिजत आल्यावर सुक्या मेव्याची भरड व जायफळ चूर्ण टाकून एकत्र करून, थोडे गार झाल्यावर लाडू वळावेत.
डिंकाचे लाडू
उत्तम प्रतीच्या डिंकाची तुपात तळून तयार केलेली लाही हाडे, पर्यायाने सांधे व पाठीची मजबुती वाढवणारी आहे. खारीकसुद्धा वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांना संतुलित करणारी तसेच स्नायू व हाडांचे पोषण करणारी आहे. यातील बाकीच्या बदाम, काजू, पिस्ते वगैरे गोष्टीही वीर्य-शक्तिवर्धक व जीवनशक्तिपोषक आहेत. या सगळ्या गोष्टी शरीरात सहज पचण्यासाठी व शरीराकडून स्वीकारल्या जाण्यासाठी सुंठ, पिंपळी, केशरासारखी द्रव्येही यात घातलेली आहेत.
कॅल्शियम व लोह पुरेशा प्रमाणात मिळावे, एकंदर स्टॅमिना टिकून राहावा व शरीरबांधा उत्तम राहावा यासाठी हे लाडू हिवाळ्यात ऊब देण्यास उत्कृष्ट असतो.
घटकद्रव्ये
- डिंक 200 ग्रॅम
- खारीक पूड 200 ग्रॅम
- खोबरे 100 ग्रॅम
- खसखस 100 ग्रॅम
- काजू 50 ग्रॅम
- बदाम 50 ग्रॅम
- पिस्ता 50 ग्रॅम
- चारोळी 50 ग्रॅम
- गूळ 300 ग्रॅम
- साखर 200 ग्रॅम
- सुंठ चूर्ण 25 ग्रॅम
- पिंपळी चूर्ण 25 ग्रॅम
- जायफळ चूर्ण 6 ग्रॅम (दोन चमचे)
- केशर चूर्णअर्धा ग्रॅम (पाव चमचा)
- दूध25-30 मि.लि. (अंदाजे पाव कप)
- डिंकाचे फार मोठे खडे असल्यास, हलक्या हाताने कुटून डिंक थोडा बारीक करून घ्यावा. डिंकाचे खडे फार मोठे असल्यास तळताना आतमध्ये कच्चट राहतात व फार बारीक असल्यास जळून जातात.
- काजू, बदाम, पिस्ते, चारोळी यांची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.
- लोखंडाच्या कढईत खसखस भाजून घ्यावी, गार झाल्यावर मिक्सरमध्ये वा खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यावी.
- खोबरे किसून मंद आचेवर भाजूून घ्यावे. गार झाल्यावर हातानेच थोडेसे कुस्करून घ्यावे.
- लोखंडाच्या कढईत तूप गरम करून थोडा थोडा डिंक तळून घ्यावा व गार झाल्यावर हातानेच जरासा कुस्करून घ्यावा.
- त्याच कढईत उरलेल्या तुपावर खारीक पूड भाजून घ्यावी.
- मोठ्या परातीत किंवा पातेल्यात तळलेला डिंक, खारीक, खोबरे, काजू-बदाम-चारोळी-पिस्त्याची भरड, खसखस, सुंठ चूर्ण, पिंपळी चूर्ण, जायफळ चूर्ण एकत्र मिसळावे.
- जाड बुडाच्या पातेल्यात गूळ, साखर व दूध टाकावे व मंद आचेवर ठेवावे. गूळ विरघळल्यानंतर पाकाला बुडबुडे यायला लागले की आचेवरून खाली उतरवून त्यात केशराची पूड टाकावी व केशर नीट मिसळल्याची खात्री करून घ्यावी.
- याप्रमाणे तयार झालेल्या पाकात वरील सर्व मिश्रण हळूहळू टाकून कलथ्याने एकत्र करून, गरम असतानाच लाडू बांधावेत.
जवसाची चटणी
जवस प्रकृतीला उत्तम असतात. जवसाची चटणी करून आहारात समाविष्ट करता येते.
घटकद्रव्ये
जवस, तीळ, शेंगदाणे, किसलेले कोरडे खोबरे (साधारण 5-2-2-2 प्रमाणात).
जवस, तीळ, शेंगदाणे, किसलेले कोरडे खोबरे व लाल सुक्या मिरच्या कढईत वेगवेगळे भाजून घ्यावे. शेंगदाण्याची साले काढून टाकावी. गार झाल्यावर त्यात चवीनुसार मिरची, मीठ, साखर घालून मिक्सरमध्ये चटणी बनवून भरून ठेवावी व आवश्यकतेनुसार वापरावी.

नागवेलीच्या पानांचा विडा बनवला जातो. विड्याची पाने उष्ण, पाचक, मुखशुद्धीकर, स्वर सुधारणारी असतात. त्यांचा त्रयोदशगुणी विडा बनवला तर तो पचनास मदत करतो, हिवाळ्यात ऊब देण्यास उत्कृष्ट असतो. चुना, सुपारी, काथ, लवंग, जायपत्री, जायफळ, बदाम, वेलची, कापूर, केशर, कस्तुरी, कंकोळ, ओल्या नारळाचा कीस ही द्रव्ये टाकून बनवलेला त्रयोदशगुणी विडा जेवणानंतर खाण्यास उत्तम असतो.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love
ऊब आहाराची - 2
डॉ. श्री बालाजी तांबे

आ युर्वेद शास्त्राचा एक नियम आहे, की सम गुणांनी वृद्धी होते आणि विरुद्ध गुणांनी क्षय होतो. जसे मनुष्यप्रकृतीचे वात, पित्त, कफ असे स्वभाव असतात, तसेच प्रत्येक वस्तूचेसुद्धा वात, पित्त, कफ असे स्वभाव असतात. मनुष्याच्या प्रकृतीचे उष्ण प्रकृती, शीत प्रकृती असे प्रकार असतात, तसेच वस्तूंमध्ये उष्ण वीर्य, शीत वीर्याच्या वस्तू असतात. त्यामुळेच शरीरात उष्णता वाढावी असे वाटत असेल तर कोणत्या गोष्टींचे सेवन करावे, याचे नियोजन करता येते.
भारतीय परंपरेतील सर्व सण-उत्सव, त्या उत्सवांच्या देवता, त्या सणाच्या देवतांना प्रसादरूपात अर्पण करायच्या वस्तू व पक्वान्ने या सर्वांचा हिशेब ऋतुमानाप्रमाणे व प्रकृतिमानाप्रमाणे केलेला असतो. थंडीच्या दिवसांत सूर्यध्यान व्हावे या हेतूने सूर्याकडे पाहणे, पतंग उडवणे किंवा सूर्यप्रकाशात बसणे हे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच तिळगूळ खाणे व गुळाची पोळी खाणे हे सणाशी संबंधित ठेवलेले आपण पाहतो. शरद पौर्णिमेला रात्री प्यावयाचे दूध असो, श्रावण महिन्यातील गोपालकाला असो, रामनवमीचा सुंठवडा असो- या सर्वांचा संबंध शरीराच्या तापमानाशी, आरोग्याशी जोडलेला दिसतो.
शीत गुणधर्माच्या वस्तूंमध्ये दुधाचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. त्याचा रंग पांढरा असतो. वस्तू जसजशा उष्ण वीर्याच्या होत जातील तसतशा त्या लाल रंगाकडे झुकू लागतात. वात प्रकृतीच्या वस्तू निळ्या, काळ्या, गडद रंगाच्या असतात. जांभळ्या वा बैंगनी रंगाचे वांगे वातकारक आहे, असे वेगळे सांगावे लागत नाही. गडद हिरव्या रंगाचे वाटाणेही वातवृद्धी करतात. शीत गुणाच्या वस्तू मऊसर असतात व त्यात जलतत्त्वाचे प्रमाण अधिक असते.
वात गुणाच्या वस्तू कठीण, पोकळ व रसभाव कमी असलेल्या असतात. सिमला मिरची पोकळ असते व त्यातील बिया खुळखुळ वाजू शकतात, तिच्यावर आकाशतत्त्वाचा व वायुतत्त्वाचा प्रभाव अधिक असतो. लाल रंगाचे टोमॅटो, बीट, चिंच वगैरे द्रव्ये उष्ण स्वभावाची व पित्तकर असतात. गडद रंगाचा गहू पित्तकर असला तरी त्याचे पीठ केल्यावर त्याचा पित्तगुण कमी होतो व कफभाव वाढतो. गव्हापासून बनविलेला मैदा अतिसूक्ष्म असल्याने तो अधिक जागा व्यापतो, म्हणजे तो आकाशतत्त्वाशी जवळीक करतो, त्यामुळे वात वाढवतो. घडीच्या पोळीला पापुद्रे असणे इष्ट असले तरी ते पापुद्रे एकमेकांच्या जवळ असतात, जेणेकरून पोळी शरीराला पुष्ट करेल, पण वात वाढवणार नाही. रुमाली रोटी मैद्याची बनवलेली असते व ती बनवताना आकाशाकडे फेकून, तिला गती देऊन पातळ केलेली असल्याने ती पचायला जड असून वातकारक असते, हे सहज लक्षात येते. एखादे आंबट फळ उष्णता वाढविणारे व पित्तकर असू शकते, पण तेच फळ वाफवून शिजवल्यावर त्यात रसतत्त्व वाढल्यामुळे व मऊ झाल्यामुळे त्याचा पित्त गुण कमी होऊ शकतो. वस्तूचा स्वभाव व त्यांची पाककृती यांची विशेष योजना करून "आयुर्वेदिक अन्नयोगा'ची योजना केलेली असते. यामुळे पदार्थ पचनाला सोपे- हलके होतात.
"ऊब आहाराची" या विषयाचा विचार करत असताना आयुर्वेदिक अन्नयोगाचा विचार करून पदार्थ तयार केले तर थंडीला तोंड देणे सोपे होऊ शकते. त्याउलट चव व नावीन्य या नावाखाली कुठल्यातरी चार-पाच वस्तू एकत्र करून तयार केलेली पाककृती वाढताना आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विशेष मेहनत घेण्यावर भर दिल्यास त्या वस्तू अन्नयोग संकल्पनेपासून दूर जाऊ शकतात.
आलेपाक, हळिवाचे लाडू, डिंकाचे लाडू, केळ्यावर मध घालून तयार केलेले पक्वान्न, केळ्यावर मध, लिंबू व साखर घालून तयार केलेले पक्वान्न, सुक्या मेव्यात तूप व इतर द्रव्ये घालून तयार केलेले पक्वान्न वगैरे अन्नयोगात सुचविलेल्या पाककृती पाहिल्या तर आरोग्याचा किती सुंदर विचार केलेला आहे, हे समजते.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love
Labels:
आलेपाक,
आहारशास्त्र - अन्नयोग,
ऊब,
ऊर्जा,
ऋतू,
तिळगूळ,
थंडी,
सण-उत्सव,
सूर्यध्यान
Tuesday, December 27, 2011
हिवाळ्यातील ऊब आहार -1
डॉ. श्री बालाजी तांबे

आहाराची योग्य योजना केली तर जीवनाचा खरा आनंद घेता येतो, सर्व इंद्रिये आपापली कामे प्रसन्नपणे करतात, सर्व धातू संपन्न होतात, बुद्धी, स्मृती, ओज, शक्ती वाढतात, तसेच वर्ण उजळतो. हिवाळ्यात शरीरात ऊब राखायची असेल तर आहारात उष्ण वीर्याच्या द्रव्यांचा समावेश करायला हवा.
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा होत. यामध्ये अन्नाचा उल्लेख पहिला केला जातो. कारण प्राण टिकून राहण्यासाठी अन्न सर्वांत महत्त्वाचे असते.
न ह्याहारादृते प्राणिनां प्राणाधिष्ठानं किञ्चिदप्युपलभामहे ।
...काश्यप खिलस्थान
आहाराशिवाय प्राणिमात्रांचे प्राण अजिबात स्थिर राहत नाहीत. आहाराची योग्य योजना केली तर जीवनाचा खरा आनंद घेता येतो, सर्व इंद्रिये आपापली कामे प्रसन्नपणे करतात, सर्व धातू संपन्न होतात, बुद्धी, स्मृती, ओज, शक्ती वाढतात, तसेच वर्ण उजळतो. याउलट आहारयोजना व्यवस्थित केली नाही, तर अनेक प्रकारची दुःखे, अनारोग्य सहन करावे लागते.
ऋतूनुसार आहार हवा
"आहारयोजना' हा खूप विस्तृत विषय आहे. यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऋतूनुसार आहार घेणे. ऋतू बदलतात म्हणजे हवामानात बदल होतो. बदलत्या हवामानानुसार जीवनशैलीत बदल होणे स्वाभाविक असते.
उदा. - उन्हाळ्यात पंखा, एसीची गरज असते; पावसाळ्यात छत्री, रेनकोट बाहेर येतात; हिवाळ्यात स्वेटर, शाल, मफलर वापरावे लागतात. मात्र, बदलत्या ऋतूनुसार आहारात बदल करणे आवश्यक असते, ही संकल्पना फारशी पाळली जात नाही. हिवाळ्यात शरीराला ऊबदार ठेवण्यासाठी आहार कसा असावा याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.
आयुर्वेदात प्रत्येक द्रव्याचे "वीर्य' सांगितलेले आहे. वीर्य शब्दाचे संदर्भानुसार अनेक अर्थ होत असले तरी द्रव्याचे वीर्य म्हणजे द्रव्याचा स्वभाव. हा स्वभाव दोन प्रकारचा असू शकतो. उष्ण किंवा थंड. अर्थातच हिवाळ्यात ऊब राखायची असेल तर आहारात उष्ण वीर्याच्या द्रव्यांचा समावेश करायला हवा.
उष्ण वीर्याचे अन्न सेवावे
हिवाळ्यामध्ये बाह्य वातावरण थंड होते, ज्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो. म्हणूनच हिवाळ्यात पचन चांगले होते, भूक जास्ती लागते, असा अनुभव येतो. प्रदीप्त झालेल्या अग्नीमुळे शरीर ऊबदार राहण्यास मदत मिळतेच, पण हिवाळ्यात उष्ण स्वभावाचे अन्न सेवन करणे अधिक फायदेशीर असते. उष्ण वीर्याचे अन्न सेवन करण्याचे आणखीही फायदे असतात.
- शरीरातील वात-कफ दोषांचे संतुलन होते.
- आहाराचे पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते.
- शरीर ऊबदार राहिल्याने हात-पाय आखडणे, गोळा येणे, दुखणे, मुंग्या येणे वगैरे त्रासांना प्रतिबंध होतो.
- अग्नी प्रदीप्त झाल्याने आमद्रव्ये, विषद्रव्ये पचायला मदत मिळते. शरीरातील अभिसरण सुधारले, की ही द्रव्ये शरीराबाहेर निघून जाण्यासही मदत मिळते.
गरम - ताजे अन्न
ऊब देणाऱ्या, अग्नीला मदत करणाऱ्या आहारात उष्ण वीर्याच्या अन्नाचा समावेश होतो, तसेच अन्न गरम व ताजे असताना सेवन करणेही महत्त्वाचे असते.
उष्णं हि भुक्तं स्वदते श्लेष्माणं च जयत्यपि ।
वातानुलोम्यं कुरुते क्षिप्रमेव च जीर्यते ।।
अन्नाभिलाषं लघुताम् अग्निदीप्तिं च देहिनाम् ।।
...काश्यप खिलस्थान
अन्न गरम असतानाच खाण्याने,
- अधिक रुचकर लागते.
- कफदोषाला जिंकते.
- वाताचे अनुलोमन करते.
- लवकर पचते.
- शरीराला हलकेपणा देते.
- अग्नी प्रदीप्त करते.
आणि अर्थातच शरीराला ऊबदार ठेवण्यास मदत करते.
वास्तविक सर्वच ऋतूंत गरम अन्न खाणेच सयुक्तिक असते; पण हिवाळ्यात व पावसाळ्यात आवर्जून ताजे व गरम अन्न खाण्यावर भर द्यायला हवा.

हिवाळ्यात काय खावे?
- ऊब देणारी, उष्ण वीर्याची आहारद्रव्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. धान्यामध्ये बाजरी उष्ण वीर्याची असते, त्यामुळे आहारात बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी यांचा अंतर्भाव करता येतो. मात्र, बाजरीतील उष्णता बाधू नये म्हणून बरोबरीने तूप, लोणी घेणे आवश्यक असते.
- नेहमीच्या धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी यांचे सेवन करता येतेच; मात्र, हिवाळ्यात साध्या भाताऐवजी मसालेभात, फोडणीची खिचडी यांचे प्रमाण वाढवता येते. गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, हळद वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून ठेपले बनवता येतात. ज्वारी-बाजरीची मिश्र भाकरी रुचकर लागते व अधिक चांगल्या प्रकारे पचते.
- दूध, लोणी, ताक, तूप हे रोजच्या खाण्यात असावेत, असे पदार्थ हिवाळ्यातही खाण्यास उत्तम असतात. हिवाळ्यात ऊब मिळावी म्हणून दुधात सुंठ, केशर वगैरे घालता येते. लोण्यामध्ये काळी मिरी, आले, थोडासा लसूण, कोथिंबीर घातली तर ते अतिशय रुचकर लागते आणि शरीराला स्निग्धता व ऊब दोन्ही देऊ शकते. ताकातही आले-पुदिन्याचा रस टाकला, कधी तरी तूप-जिरे-हिंगाची फोडणी दिली तर हिवाळ्यात ऊब टिकण्यास मदत मिळते.
- कडधान्यांमध्ये मटकी, तूर, उडीद, कुळीथ, वाल हे इतर कडधान्यांच्या मानाने उष्ण असतात. प्रकृती आणि पचनशक्तीचा विचार करून यांचाही आहारात समावेश करता येतो.
- ऊब टिकवण्यासाठी, ऊब देण्यासाठी मसाल्याचे पदार्थ उत्तम असतात. हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मासाल्याचे पदार्थ हिवाळ्यात वापरणे उत्तम असते. भाज्या बनवताना या द्रव्यांची व्यवस्थित योजना केली, तर त्या रुचकर होतात, सहज पचतात आणि ऊब देतात.
- भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, परवर, कर्टोली, गाजर, मुळा वगैरे भाज्या उष्ण गुणाच्या असतात; मात्र इतर पथ्याच्या भाज्याही मसाल्याचे पदार्थ टाकून रुचकर बनवल्या तर ऊब टिकविण्यास मदत करतात.
- बदाम, काजू, चारोळी, पिस्ता, अक्रोड हा सुका मेवाही ऊब देण्यास उत्तम असतो. हिवाळ्यामध्ये पचनशक्ती उत्तम असताना हे पदार्थ खाताही येतात. प्रकृतीचा विचार करून यांचे प्रमाण ठरवावे लागते.
- ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असणे, तिळाची चिक्की खाणे, सकाळी सुंठ-गूळ-तुपाची गोळी खाणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अहळिवाचा लाडू खाणे, जेवणानंतर ओवा-तीळ-बाळंतशोपा वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे, भोजनानंतर त्रयोदशगुणी विडा खाणे वगैरे साध्या उपायांनीही हिवाळ्यात ऊब मिळण्यास खूप चांगली मदत मिळते.
- हिवाळ्यात प्यायचे पाणी गरम वा कोमट असणे उत्तम होय. जेवताना गरम पाणी पिण्याने अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. तसेच एरवीसुद्धा गरम पाणी पिण्याने ऊब मिळण्यास मदत मिळते.
सेवावी रसायने
ऊब ही शक्तिसापेक्ष असते. रक्ताभिसरण नीट होत असले, प्राणशक्ती पुरेशा प्रमाणात मिळत असली की शरीरावश्यक ऊब टिकून राहते. हिवाळ्यात पचनशक्ती सुधारत असल्याने शक्ती कमावण्याची मोठी संधी निसर्ग देत असतो. म्हणूनच आयुर्वेदाने हिवाळ्यात "रसायन सेवन' सुचवले आहे. च्यवनप्राश, धात्री रसायन, मॅरोसॅन, आत्मप्राश, ब्राह्मरसायन, अमृतप्राश वगैरे उत्तमोत्तम रसायने सेवन करावीत. ही रसायने शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित बनवली असली, त्यात टाकायची केशर, वेलची, कस्तुरी, सोन्या-चांदीचा वर्ख वगैरे द्रव्ये खरी, शुद्ध, उत्तम प्रतीची असली तर त्यामुळे शक्ती वाढते, प्राणशक्ती व जीवनशक्तीची पूर्ती होते, अर्थातच शरीराला आतून ऊब मिळते.
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा होत. यामध्ये अन्नाचा उल्लेख पहिला केला जातो. कारण प्राण टिकून राहण्यासाठी अन्न सर्वांत महत्त्वाचे असते.
न ह्याहारादृते प्राणिनां प्राणाधिष्ठानं किञ्चिदप्युपलभामहे ।
...काश्यप खिलस्थान
आहाराशिवाय प्राणिमात्रांचे प्राण अजिबात स्थिर राहत नाहीत. आहाराची योग्य योजना केली तर जीवनाचा खरा आनंद घेता येतो, सर्व इंद्रिये आपापली कामे प्रसन्नपणे करतात, सर्व धातू संपन्न होतात, बुद्धी, स्मृती, ओज, शक्ती वाढतात, तसेच वर्ण उजळतो. याउलट आहारयोजना व्यवस्थित केली नाही, तर अनेक प्रकारची दुःखे, अनारोग्य सहन करावे लागते.
ऋतूनुसार आहार हवा
"आहारयोजना' हा खूप विस्तृत विषय आहे. यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऋतूनुसार आहार घेणे. ऋतू बदलतात म्हणजे हवामानात बदल होतो. बदलत्या हवामानानुसार जीवनशैलीत बदल होणे स्वाभाविक असते.
उदा. - उन्हाळ्यात पंखा, एसीची गरज असते; पावसाळ्यात छत्री, रेनकोट बाहेर येतात; हिवाळ्यात स्वेटर, शाल, मफलर वापरावे लागतात. मात्र, बदलत्या ऋतूनुसार आहारात बदल करणे आवश्यक असते, ही संकल्पना फारशी पाळली जात नाही. हिवाळ्यात शरीराला ऊबदार ठेवण्यासाठी आहार कसा असावा याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.
आयुर्वेदात प्रत्येक द्रव्याचे "वीर्य' सांगितलेले आहे. वीर्य शब्दाचे संदर्भानुसार अनेक अर्थ होत असले तरी द्रव्याचे वीर्य म्हणजे द्रव्याचा स्वभाव. हा स्वभाव दोन प्रकारचा असू शकतो. उष्ण किंवा थंड. अर्थातच हिवाळ्यात ऊब राखायची असेल तर आहारात उष्ण वीर्याच्या द्रव्यांचा समावेश करायला हवा.
उष्ण वीर्याचे अन्न सेवावे
हिवाळ्यामध्ये बाह्य वातावरण थंड होते, ज्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो. म्हणूनच हिवाळ्यात पचन चांगले होते, भूक जास्ती लागते, असा अनुभव येतो. प्रदीप्त झालेल्या अग्नीमुळे शरीर ऊबदार राहण्यास मदत मिळतेच, पण हिवाळ्यात उष्ण स्वभावाचे अन्न सेवन करणे अधिक फायदेशीर असते. उष्ण वीर्याचे अन्न सेवन करण्याचे आणखीही फायदे असतात.
- शरीरातील वात-कफ दोषांचे संतुलन होते.
- आहाराचे पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते.
- शरीर ऊबदार राहिल्याने हात-पाय आखडणे, गोळा येणे, दुखणे, मुंग्या येणे वगैरे त्रासांना प्रतिबंध होतो.
- अग्नी प्रदीप्त झाल्याने आमद्रव्ये, विषद्रव्ये पचायला मदत मिळते. शरीरातील अभिसरण सुधारले, की ही द्रव्ये शरीराबाहेर निघून जाण्यासही मदत मिळते.
गरम - ताजे अन्न
ऊब देणाऱ्या, अग्नीला मदत करणाऱ्या आहारात उष्ण वीर्याच्या अन्नाचा समावेश होतो, तसेच अन्न गरम व ताजे असताना सेवन करणेही महत्त्वाचे असते.
उष्णं हि भुक्तं स्वदते श्लेष्माणं च जयत्यपि ।
वातानुलोम्यं कुरुते क्षिप्रमेव च जीर्यते ।।
अन्नाभिलाषं लघुताम् अग्निदीप्तिं च देहिनाम् ।।
...काश्यप खिलस्थान
अन्न गरम असतानाच खाण्याने,
- अधिक रुचकर लागते.
- कफदोषाला जिंकते.
- वाताचे अनुलोमन करते.
- लवकर पचते.
- शरीराला हलकेपणा देते.
- अग्नी प्रदीप्त करते.
आणि अर्थातच शरीराला ऊबदार ठेवण्यास मदत करते.
वास्तविक सर्वच ऋतूंत गरम अन्न खाणेच सयुक्तिक असते; पण हिवाळ्यात व पावसाळ्यात आवर्जून ताजे व गरम अन्न खाण्यावर भर द्यायला हवा.

हिवाळ्यात काय खावे?
- ऊब देणारी, उष्ण वीर्याची आहारद्रव्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. धान्यामध्ये बाजरी उष्ण वीर्याची असते, त्यामुळे आहारात बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी यांचा अंतर्भाव करता येतो. मात्र, बाजरीतील उष्णता बाधू नये म्हणून बरोबरीने तूप, लोणी घेणे आवश्यक असते.
- नेहमीच्या धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी यांचे सेवन करता येतेच; मात्र, हिवाळ्यात साध्या भाताऐवजी मसालेभात, फोडणीची खिचडी यांचे प्रमाण वाढवता येते. गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, हळद वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून ठेपले बनवता येतात. ज्वारी-बाजरीची मिश्र भाकरी रुचकर लागते व अधिक चांगल्या प्रकारे पचते.
- दूध, लोणी, ताक, तूप हे रोजच्या खाण्यात असावेत, असे पदार्थ हिवाळ्यातही खाण्यास उत्तम असतात. हिवाळ्यात ऊब मिळावी म्हणून दुधात सुंठ, केशर वगैरे घालता येते. लोण्यामध्ये काळी मिरी, आले, थोडासा लसूण, कोथिंबीर घातली तर ते अतिशय रुचकर लागते आणि शरीराला स्निग्धता व ऊब दोन्ही देऊ शकते. ताकातही आले-पुदिन्याचा रस टाकला, कधी तरी तूप-जिरे-हिंगाची फोडणी दिली तर हिवाळ्यात ऊब टिकण्यास मदत मिळते.
- कडधान्यांमध्ये मटकी, तूर, उडीद, कुळीथ, वाल हे इतर कडधान्यांच्या मानाने उष्ण असतात. प्रकृती आणि पचनशक्तीचा विचार करून यांचाही आहारात समावेश करता येतो.
- ऊब टिकवण्यासाठी, ऊब देण्यासाठी मसाल्याचे पदार्थ उत्तम असतात. हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मासाल्याचे पदार्थ हिवाळ्यात वापरणे उत्तम असते. भाज्या बनवताना या द्रव्यांची व्यवस्थित योजना केली, तर त्या रुचकर होतात, सहज पचतात आणि ऊब देतात.
- भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, परवर, कर्टोली, गाजर, मुळा वगैरे भाज्या उष्ण गुणाच्या असतात; मात्र इतर पथ्याच्या भाज्याही मसाल्याचे पदार्थ टाकून रुचकर बनवल्या तर ऊब टिकविण्यास मदत करतात.
- बदाम, काजू, चारोळी, पिस्ता, अक्रोड हा सुका मेवाही ऊब देण्यास उत्तम असतो. हिवाळ्यामध्ये पचनशक्ती उत्तम असताना हे पदार्थ खाताही येतात. प्रकृतीचा विचार करून यांचे प्रमाण ठरवावे लागते.
- ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असणे, तिळाची चिक्की खाणे, सकाळी सुंठ-गूळ-तुपाची गोळी खाणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अहळिवाचा लाडू खाणे, जेवणानंतर ओवा-तीळ-बाळंतशोपा वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे, भोजनानंतर त्रयोदशगुणी विडा खाणे वगैरे साध्या उपायांनीही हिवाळ्यात ऊब मिळण्यास खूप चांगली मदत मिळते.
- हिवाळ्यात प्यायचे पाणी गरम वा कोमट असणे उत्तम होय. जेवताना गरम पाणी पिण्याने अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. तसेच एरवीसुद्धा गरम पाणी पिण्याने ऊब मिळण्यास मदत मिळते.
सेवावी रसायने

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love
Subscribe to:
Posts (Atom)