Showing posts with label आरोग्य सुभाषित. Show all posts
Showing posts with label आरोग्य सुभाषित. Show all posts

Wednesday, December 5, 2012

आरोग्य सुभाषित


आरोग्य सुभाषित
संकलन ः डॉ. सौ. वीणा तांबे 

तेनेष्टा बहवो यज्ञास्तेन दत्ता वसुन्धरा । 
य सदा बह्मचारी स्यात्‌ येन धात्री प्ररोपिता ।। ...वृक्षायुर्वेद 

आवळ्याचे झाड लावून त्याची जोपासना करणाऱ्याला अनेक यज्ञ केल्याचे, भूमिदान केल्याचे तसेच ब्रह्माचा अभ्यास केल्याचे पुण्य मिळते.
आवळ्याच्या झाडाच्या छायेत चेतासंस्थेस फायदा होतो. आवळ्याच्या फळाचे तर अनेक फायदे होतात व शरीरातील शक्‍तिकेंद्रे सशक्‍त होतात. म्हणून अनेक यज्ञ करण्याचे फळ मिळते, असे म्हटले आहे. 


Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Tuesday, October 25, 2011

आरोग्य सुभाषित


शास्त्रानुसारिणी चर्या चित्तज्ञाः पार्श्‍ववर्तिनः। 
बुद्धिरस्खलिताऽर्थेषु परिपूर्ण रसायनम्‌ ।।

प्रकृती व ऋतुमानानुसार आहार-विहार म्हणजे शास्त्राचरण, प्रेम करण्यासाठी व मिळविण्यासाठी मित्रमंडळी, इंद्रियांचे चांगले आरोग्य- ज्यामुळे बुद्धी सारासार विवेक करू शकेल. या गोष्टी म्हणजेच पूर्ण रसायन- जे देते आरोग्य तनाचे व मनाचे!

संकलन - डॉ. सौ. वीणा तांबे

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Friday, October 3, 2008

आरोग्य सुभाषित

आरोग्य सुभाषित

मन-प्रसाद- सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रह- ।
भावसंशुद्धिरित्येतत्‌ तपो मानसमुच्यते ।।
... श्रीमद्‌भगवद्‌गीता १७-१६ .......
मनाची प्रसन्नता, मनाचा शांतभाव, मौन (परमेश्‍वराचे चिंतन करण्याचा स्वभाव), मनाचा निग्रह, अंत-करणाची पवित्रता या सर्वांना मानसिक तप म्हटले जाते.

श्रीमद्‌भगवद्‌गीतेत भगवंतांनी शारीरिक, वाचिक, मानसिक, सात्त्विक, राजसिक, तामसिक असे तपाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. सर्वांशी प्रेममय वागणूक असली, आचरण दुटप्पीपणाचे नसले तरच मन प्रसन्न व सौम्य राहू शकते. मौनाचा अर्थ काही न बोलणे असा मर्यादित नसून आत्मानंदात मग्न झाल्याने बकबक करण्याची गरज नसल्यामुळे आपोआप मौन साधले जाणे असा आहे. अर्थातच याला मनाचा निग्रह आवश्‍यक आहे. याचे पालन केल्याने अंत-करण पवित्र होऊन साधक आपल्या ध्येयाप्रत जातो.

संकलन - डॉ. सौ. वीणा तांबे

Wednesday, May 21, 2008

आरोग्य सुभाषित

आरोग्य सुभाषित

व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ती
रोगाश्‍च शत्रव इति प्रहरन्ति देहम्‌ । .......
आयुः परिस्रवति भिन्नघटादिवाम्भो-
लोकस्तथाप्यहितमाचरतीति चित्रम्‌ ।।

वाघिणीप्रमाणे वृद्धावस्था माणसाला घाबरवत असते, शत्रूप्रमाणे रोग शरीरावर प्रहार करत असतात, चीर पडलेल्या मातीच्या घटातून पाणी झिरपते त्याप्रमाणे आयुष्य क्षणाक्षणाने संपून जात असते, तरीही मनुष्य अहिताच्याच गोष्टी करत असतो, हे केवढे आश्‍चर्य?

"जिवासवे जन्मे मृत्यू' हे तर खरेच, पण आहे तेवढे आयुष्य सुखासमाधानाने जाण्यासाठी प्रयत्नांचीच आवश्‍यकता असते व त्यासाठी तिन्ही स्तरांवर प्रयत्न करावे लागतात. शारीरिक आरोग्य नीट राहण्यासाठी वैयक्‍तिक आहार-आचरणाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व सामाजिक आरोग्यालाही आहे. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाला स्वतःच्या शरीराची जशी काळजी घ्यायला हवी तशीच किंबहुना त्याहून जास्ती काळजी आपल्या परिसराची (स्वच्छता राखणे, प्रदूषणाला आळा घालणे) घेणे आवश्‍यक आहे तरच साथीच्या रोगांचे प्रमाण कमी राहून सर्वांनाच आरोग्य व पर्यायाने सुख मिळेल.

संकलन - डॉ. सौ. वीणा तांबे

Thursday, May 1, 2008

आरोग्य सुभाषित

आरोग्य सुभाषित

कालार्थकर्मणां योगा हीनमिथ्या।तिमात्रकाः ।
सम्यग्योगश्‍च विज्ञेयो रोगारोग्यैककारणम्‌ ।।
... वाग्भट .......
शीतोष्णादी काल, कायिक, वाचिक, मानसिक कर्मे यांचा वाजवीपेक्षा कमी वा जास्ती उपयोग करणे हेच रोग निर्माण होण्याचे मुख्य कारण होय आणि यांचा यथार्थ उपयोग करण्यातच आरोग्याचे बीज दडलेले आहे.

आरोग्यसंपन्न जीवनासाठी काय काय करायला पाहिजे, याबद्दल अनेक माध्यमांद्वारे अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण त्यातील किती गोष्टी किती जण किती प्रमाणात आचरणात आणतात हा संशोधनाचा विषय आहे. आजचे जीवन गतिमान झाले आहे, मनापासून काही करायला वेळच नाही अशा अनेक सबबी काढल्या जातात व अनैसर्गिक जीवनशैलीचा वर्षानुवर्षे आधार घेतला जातो, मग त्यातून आनुवंशिक रोग, वंध्यत्व वगैरे काही समस्या उद्‌भवल्या, तर हा वर्षानुवर्षे आपल्याच आहार-आचरणात झालेल्या चुकांचाच हा परिपाक आहे हे सत्य स्वीकारले जात नाही तर नशिबाला दोष लावला जातो.

संकलन - डॉ. वीणा तांबे

ad