Showing posts with label दीपावली. Show all posts
Showing posts with label दीपावली. Show all posts

Tuesday, November 13, 2012

दिवाळीतील फराळ

दिवाळीतील फराळ
डॉ. श्री बालाजी तांबे
पावसाळ्यानंतर हळूहळू प्रदीप्त होऊ लागलेल्या अग्नीला यथायोग्य इंधन मिळावे या दृष्टीने दिवाळीत फराळ करण्याची पद्धत आहे. पचनशक्‍ती उत्तम असलेल्या कालावधीत आयुर्वेदिक रसायनसेवनाचा सर्वोत्कृष्ट उपयोग होत असल्याने दिवाळीत रसायन खाण्याचा शुभारंभ करणेही श्रेयस्कर होय.

भारतीय संस्कृतीमध्ये वर्षभर अनेक प्रकारचे उत्सव येतात, पण सर्वांत मोठा उत्सव- ज्याची लहान-मोठे सर्व जण अगदी आतुरतेने वाट पाहतात, तो म्हणजे दीपावली. पणत्या, आकाशकंदील, नवे कपडे, रांगोळी, किल्ला, फटाके, पाहुण्यांच्या स्वागताची तयारी, आप्तजनांना द्यायच्या भेटी, अशा अनेक प्रकारे दीपावली साजरी केली जाते आणि त्यातही अग्रेसर असतात फराळाचे पदार्थ. हे फराळाचे पदार्थ रुचकर तर असतातच, पण आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्‍त असतात.

ऋतूंचा विचार केला असता पावसाळ्यानंतर दीपावली येते. पावसाळ्यात कमी प्रमाणात मिळणारा सूर्यप्रकाश पुन्हा क्रमाक्रमाने वाढायला वागतो. याचे प्रतिबिंब शरीरातही उठते आणि शरीरातील अग्नीही क्रमाक्रमाने प्रदीप्त होऊ लागतो. याचा आरोग्यप्राप्तीसाठी उपयोग होण्याच्या दृष्टीनेच दिवाळीत विशेष फराळ घेण्याची पद्धत असते.

स यदा नेन्धनं युक्‍तं लभते देहजं तदा । 
रसं हिनस्त्यतो वायुः शीतः शीते प्रकुप्यति ।। 
तस्मात्‌ तुषारमसमये स्निग्धाम्ललवणात्‌ रसान्‌ ।। ...चरक सूत्रस्थान 

प्रदीप्त झालेल्या अग्नीला यथायोग्य इंधन म्हणजे अन्न मिळाले नाही तर तो अग्नी रसधातूला जाळून टाकतो व त्यातूनच वायूचा प्रकोप होतो. असे होऊ नये म्हणून या ऋतूत स्निग्ध, आंबट, खारट पदार्थ खावेत. प्रदीप्त जाठराग्नीमुळे सुधारलेल्या पचनशक्‍तीचा फायदा घेऊन या ऋतूत शरीरपोषक, धातुपोषक पदार्थ करण्याची प्रथा आहे. यात चकली, शेवेसारखे तळलेले, खारट, तिखट पदार्थही असतात. तसेच अनारसा, करंजी, लाडूसारखे शुक्रपोषक रसायन पदार्थही असतात.

रसायन सेवनही करा 
यालाच जोड म्हणून या दिवसांत आयुर्वेदिक रसायनांचे सेवन केले तर ते आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असते. तसे पाहता रसायन पूर्ण वर्षभर खाणे उत्तमच असते; पण पचनशक्‍ती उत्तम असलेल्या कालावधीत रसायन सेवनाचा सर्वोत्कृष्ट उपयोग होत असल्याने दिवाळीत रसायन खाण्याचा शुभारंभ करणे श्रेयस्कर होय. च्यवनप्राश, धात्री रसायन, "सॅन रोझ', "मॅरोसॅन' "संतुलन चैतन्य कल्प', शतावरी कल्प वगैरेसारखी रसायने दिवाळीत व दिवाळीनंतरही अवश्‍य सेवन करावीत अशी होत.

चकली, कडबोळी, लाडू, अनारसा, करंजी वगैरे पदार्थांचा आयुर्वेदाच्या ग्रंथातही उल्लेख सापडतो. हे पदार्थ तयार करण्याची खरी पद्धत, त्या काळी वापरले जाणारे घटक पदार्थ, त्यांचे गुणधर्म अशी सर्व माहिती यात दिलेली आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपणही यांची आयुर्वेदिक माहिती घेऊ या.

चकली (वेष्टनी) 
माषाणां धूमसी हिुलवणार्द्रकसंयुता । 
जलेन निबिडं मर्द्य कार्याः पृथुलवर्तयः ।। 
कृत्वा तासां वर्तुलानि जले संस्वेदयेत्‌ ततः । 
गृह्णीयात्‌ वेष्टनी नाम्ना शुक्रला बलकारिणी ।।...निघण्टु रत्नाकर 

उडदाचे पीठ, हिंग, मीठ, बारीक केलेले आले हे सर्व पदार्थ पाण्यात एकत्र घट्ट मळून नंतर त्याच्या वाती करून वर्तुळे करावीत आणि वाफेवर शिजवावीत.
चकलीचे गुणधर्म - शुक्रकर, बलकर, पचायला जड, कफवर्धक, पाककाली मधुर असतात, पित्त वाढवितात, प्रवास करणाऱ्यांसाठी हितकर व वातशामक.

अनारसे (शालिपूप) 
प्रक्षाल्य तण्डुलान्‌ द्विस्त्रिः शोषयित्वा च पेषयेत्‌ । 
तत्पिष्टं च घृतेनाशु किंचित्‌ चाल्यगुडोदकैः ।। 
मर्दयित्वा च वटकान्‌ कृत्वा ते पोस्तबीजकैः । 
एकतो घोलयित्वा च तान्घृतेन पचेत्ततः ।। 

दोन ते तीन वेळा तांदूळ चांगले धुऊन वाळवावेत. त्यांचे पीठ करून त्यात थोडेसे तूप, गूळ व पाणी घालून मळावे व त्याचे वडे करून एका बाजूने खसखस लावून तुपात तळावे.

शालिपूपास्तु ते सिद्धाः शीता वृष्या रुचिप्रदाः । 
स्निग्धातिसारशमना नाम्ना।ऩारससंज्ञिता ।। ...निघण्टु रत्नाकर 

अनारसे धातुवर्धन करतात, रुची वाढवितात, गुणांनी स्निग्ध असतात, वीर्याने थंड असतात व अतिसारामध्ये हितकर असतात.

कडबोळी (कचकल्ली) 
पाचिता च घृते सैव कचवल्लीति विश्रुता । 
गुरुर्वृष्या पुष्टिकरी बलदा तृप्तिकारिका ।। 
पित्ततेजःकफानां च कारिणी वातनाशिनी ।। 
...निघण्टु रत्नाकर 

हीच तुपामध्ये तळली असता त्याला कचकल्ली (कडबोळी) असे म्हणतात.

कडबोळी पचायला जड, ताकद वाढविणारी, वजन वाढविणारी, तृप्ती देणारी, शुक्रवर्धक अशी असते. अग्नी वाढवते, पित्त-कफदोष वाढविणारी व वातशामक असते.

करंजी (संयाव) 
गोधूमानां सूक्ष्मपिष्टं घृतभृष्टं सितायुतम्‌ । 
चूर्णे तस्मिन्‌ क्षिपेदेलां लवं मरिचानि च ।। 
नारिकेलं सकर्पूरं चारीबीजानि मिश्रयेत्‌ । 
दुग्धेन धूमसीं मर्द्य तस्याः पर्पटिकासु च ।। 
तत्पुरणं तु निक्षिप्य कुर्यान्मुद्राः दृढां सुधीः । 
सर्पीषि प्रचुरे तां तु पचेत्‌ निपुणयुक्‍तितः ।। 
पश्‍चाच्च शर्करापाके निक्षिप्य च समुद्धरेत्‌ ।। 
...निघण्टु रत्नाकर 

गव्हाचा रवा तुपात भाजून त्यात साखर, वेलची, लवंग, मिरी, नारळ, चारोळ्या, थोडा कापूर मिसळून सारण तयार करावे.

दुसरा गव्हाचा बारीक रवा दुधात भिजवावा व चांगला मळावा. त्याच्या छोट्या पापड्या लाटाव्या. आत रव्याचे सारण भरावे. अर्ध्यात वाकवून दोन्ही कडांना मुरड घालावी. तुपात तळून साखरेच्या पाकात बुडवून काढाव्यात. याला संयाव वा करंजी म्हणतात.

धातुवृद्धिकरो वृष्यो हृद्यश्‍च मधुरो गुरुः । 
सारको भग्नसन्धानकारकः पित्तवातहृत्‌ ।। ...निघण्टु रत्नाकर 

हे संयाव (करंज्या) धातुवर्धक, शुक्रधातुवर्धक, हृदयाला हितकर असतात, चवीला गोड, पचायला जड, मलप्रवृत्ती साफ करणारे व मोडलेले हाड सांधण्यास मदत करतात, पित्त व वातदोष कमी करतात.

चिरोटे 
गोधूमधूमसी चाल्य घृतेनाक्‍ता जलेन च । 
यित्वा तु तस्याश्‍च ग्राह्यं पूगप्रमाणकम्‌ ।। 
गोलकं वैल्लयित्वा तु तस्य कुर्याच्च पोलिकाम्‌ । 
द्वितीया च तृतीया च कृत्वा स्थाप्यास्तथोपरि ।। 
एकां गृहीत्वा तस्यां तु घृतं दत्वा द्वितीयकाम्‌ । 
तस्याश्‍चोपरि संस्थाय एवं स्थाप्या तृतीयका ।। 
द्वयंगुलान्‌ खण्डकान्‌ कृत्वा वेल्लयित्वा घृतेपचेत्‌ । 
ते घृते पाचिता नाम्ना चिरोटे इति विश्रुताः ।। 
ते तु शर्करया चाद्या ।...निघण्टु रत्नाकर 

गव्हाचा रव्याला थोडेसे तूप चोळावे, नंतर पाणी घालून मळून कुटून कुटून मऊ करावा. त्याची सुपारीएवढी गोळी करून कागदासारखी पातळ पोळी लाटावी. अशा तीन पोळ्या कराव्या.

एका पोळीवर तूप लावून वरून दुसरी पोळी ठेवावी, त्यावर तूप लावून तिसरी पोळी ठेवावी. हे सर्व तीन पदरी वा चार पदरी दुमडून पट्टी तयार करावी. या पट्टीचे पुन्हा तुकडे पाडावेत. ते पुन्हा पातळ लाटून पुन्हा दुमडावेत व चौकोनी आकाराचे करून तुपात तळून साखरेबरोबर खावेत.

वृष्या बल्यास्तु शुक्रला । 
गुरवः पित्तवातघ्ना श्‍चोक्‍ता पाकविशारदैः ।। ...निघण्टु रत्नाकर 

चिरोटे शुक्रधातूस वाढवितात, ताकद वाढवितात, पचायला जड असतात व पित्त-वाताला शमवतात. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

दीपावलीचा आरोग्य मेन्यू

दीपावलीचा आरोग्य मेन्यू
डॉ. श्री बालाजी तांबे
दीपावलीचा सण व्यवस्थित साजरा व्हावा व कुठलीही भीती न बाळगता जेवणखाण व्यवस्थित व्हावे यासाठी वस्तू खरेदी करत असताना त्यात भेसळ नाही, याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. वस्तूत जास्त कस असला तर त्यासाठी चार पैसे अधिक लागतात, हेही लक्षात ठेवावे. पाककौशल्य दाखविण्याची संधी उत्सवांमुळे मिळते असे समजले तर दीपावलीच्या सणाचा आनंद सर्वांनाच घेता येईल. या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर भेसळीचा व भ्रष्टाचाराचा नरकासुर मरावा व पुन्हा प्राचीन भारतीय परंपरेतील दूध-तूप वगैरे अमृतमय अन्न सेवन करून अग्नितेजाची व कर्मप्रतिष्ठेची श्रद्धा वाढावी व दीपावली व येणारे नूतन वर्ष आरोग्य, मैत्री, समृद्धी, धनसंपदा व उत्कर्ष यांनी परिपूर्ण जावो, हीच प्रार्थना. 

"या वर्षीच्या दीपावलीच्या दिवसात आम्ही पुण्याला आत्याकडे जाणार आहोत, कारण आत्याच्या हातचे चिरोटे व कडबोळी जगात दुसऱ्या कुणालाही जमण्यासारखी नाही. आत्याचं आग्रहाचं आमंत्रण आलं आहे व रिझर्वेशनही झालेलं आहे. आत्याचा छान मोठा वाडा आहे. दिवाळीची मजा येईल,'' असे संवाद ऐकण्याचे दिवस मागे पडलेले दिसतात.

हास्य-थट्टा-मस्करी, संगीत याचबरोबर मसाज, अभ्यंग स्नान, लक्ष्मीपूजन वगैरे करून सगळ्यांबरोबर दिवाळी साजरी केली तर पुढे वर्षभर शक्‍ती पुरते. दीपावलीचा फराळ म्हणजे साध्या बटाटेपोह्यांबरोबर एखादी चकली, एवढा कधीच नसतो. फराळाच्या वेगवेगळ्या पदार्थांनी मोठे ताट भरलेले असते. इडली, डोसा, पोहे अशा एखाद्या गरम गरम पदार्थाबरोबर मध्ये ठेवलेल्या फराळाची ताटामधील चकली, कडबोळी, लोणी, लाडू असे आपल्याला हवे ते घेऊन खाणे ही फराळाची गंमत. पूर्वी अशा प्रकारे भरपूर खाऊन दिवाळी साजरी होत असे, तसेच भाऊबीजेला बहिणीकडे जेवायला गेले तर तिच्या सासरच्या घरात केल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी काही विशेष पदार्थ चाखले जात असत. ""सकाळी अंगाला तेल लावून घ्यायचे आहे, तेव्हा आदल्या दिवशीच ये. नंतर फराळ वगैरे झाला की दुपारी जेवून ओवाळणी करून जा,'' असे बहिणीकडून भाऊरायाला आग्रहाचे आमंत्रण असे.

हे सर्व दिवस आता मागे पडलेले दिसतात. सध्या तर लोकांनी खाण्याची धास्ती घेतलेली दिसते. ""दिवाळी येते आहे, फराळ वगैरे सांभाळून करा. खूप मेहनत करून उतरवलेले दोन किलो वजन पुन्हा दिवाळीत वाढणार नाही याकडे लक्ष ठेव,'' असे सल्ले हल्ली ऐकू येतात. दिवाळीच्या फराळाची अडचण अशी, की त्यातील सर्व पदार्थ एक तर गोड असतात किंवा तळलेले असतात. हे सर्व पदार्थ आरोग्याला कसे काय झेपणार, अशी शंका अनेकांना असते. हलके हलके गेल्या 50 वर्षांत मनुष्याची पचनशक्‍ती कमी झाल्याचे दिसते. दिवाळीच्या फराळाचे ताट समोर भरून ठेवले की "तोंडं पहा दिवाळीचा फराळ खाणाऱ्यांची' असेच म्हणायची वेळ येऊ लागली.

खा आणि पचवा 
गेली काही वर्षे दिवाळीच्या सुमारास भेसळीचा राक्षस व व्हायरस सगळीकडे पसरलेला दिसतो. डाळ, गूळ, तिखट, तेल, दूध वगैरे पदार्थांमध्ये भेसळ येऊ लागली तर मावा, तूप, दूध वगैरे पदार्थ तर बनावटी स्वरूपात मिळू लागले आणि दिवाळीची पणती तेवण्याऐवजी मंद होत गेली. असे म्हणतात, की उपसा झाला नाही तर विहीर आटते. तसेच पचनशक्‍ती खाण्या-पिण्याच्या सवयीवर टिकून राहते. तेव्हा प्रत्येकाने प्रकृतिपरीक्षण करवून घेऊन मानवणारे पदार्थ योग्य मात्रेत अवश्‍य खावेत. पचन झाले तरच शक्‍ती मिळते. नुसत्या प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅलरी यांचा विचार करून केलेल्या आहारामुळे हलके हलके शक्‍ती कमी होते. चेहरा निस्तेज होऊ लागतो. नटनट्या किंवा सांपत्तिक सुविधा असणाऱ्यांचे एक बरे असते, की त्यांना हव्या त्या वेळी मेक-अपमुळे चेहऱ्यावर तेज आणता येते व चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या डॉक्‍टरांकडे जाऊन काढून टाकता येतात. सर्वसामान्यांनी काय करावे? शरीराचा कायाकल्प करण्यासाठी पंचकर्मासारखा विधी करता येतो, पण ताकदीसाठी त्याने काय करावे? खाण्याने कोलेस्टेरॉल वाढते, आर्टरीज भरतात, वजन वाढते, रक्‍तदाब , मधुमेह असे रोग होण्याची शक्‍यता वाढते, असे एकदा डोक्‍यात बसले की मग समोर आलेला कुठलाही पदार्थ आपला शत्रू आहे, तो खाल्ल्याने आपले नुकसान होणार आहे, असेच मनात येते. त्यामुळे तो पदार्थ खाल्ला जात नाही किंवा खाल्ला तरी पचत नाही. मुख्य म्हणजे दूध, तूप व साखर खाल्ली जात नाही.

खरे पाहता भारतीय संस्कृतीत सणावारांची योजना आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसारच केलेली आहे. कधी काय खावे, कोणी किती खावे, ऋतूनुसार कोठल्या देवतेचे पूजन करावे, कुठल्या देवतेला कुठला नैवेद्य दाखवावा, या सर्व बाबींचा विचार करून सणांचे मेन्यू कार्ड ठरविलेले असते.

दीपावलीच्या फराळातील जिन्नस योग्य प्रकारे केले व योग्य प्रमाणात व योग्य वेळी सेवन केले तर अत्यंत आरोग्यदायी असतात. आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेल्या गोष्टी सेवन केल्या, मग तो साधा वरण-भात असो, तर आरोग्याला खूप मोठा आधार मिळतो.

अन्नयोग साधावा 
आयुर्वेदानुसार अन्नयोग हे मोठे शास्त्र आहे. पदार्थ तयार करताना त्यासाठी वापरलेल्या वस्तूंची शुद्धता, त्यात असलेले वीर्य, पदार्थ बनविताना वापरलेली कृती, संस्कार याबरोबरच पदार्थ बनविताना प्रेमाने दिलेल्या वेळेलाही महत्त्व असते.

नुसते अन्नाच्या बाबतीत नव्हे, तर आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीतही हाच अनुभव येतो. औषधाचा पाठ अवघड असला व त्यासाठी लागणाऱ्या काही वनस्पती खूप महाग व दुर्मिळ असल्या तर सहज उपलब्ध असलेल्या कुठल्यातरी चार वनस्पती गोळा करून पूर्ण संस्कार न करता, पूर्ण वेळ न देता (शॉर्टकटने) उत्पादने बनवल्यास किंवा नुसत्या चूर्णांच्या वा अर्कांच्या गोळ्या पाडल्यास त्यांना आयुर्वेदिक उत्पादने म्हणता येणार नाही. आयुर्वेदिक औषधे ऋषिमुनींनी घालून दिलेल्या पाठानुसारच बनविलेली असणे आवश्‍यक असते. आयुर्वेदात भौतिक, रासायनिक संकल्पनांबरोबरच संस्कारकाल व वातावरणातील शक्‍तीचा परिणाम महत्त्वाचा समजला जातो. म्हणून साधा भातासारखा पदार्थ करताना काळजी घ्यावी लागते. भात करण्यासाठी तांदूळ आधी भाजून घ्यावे, त्यात किती पट पाणी टाकावे, अशा सूचनांबरोबरच कुठल्या प्रकारचा तांदूळ कुणी खावा, याही गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या असतात. म्हणूनच व्यवस्थित केलेला पायस दशरथाच्या राण्यांना मिळाल्यावर श्रीरामप्रभूंसारखे अवतारी शूर पुत्र जन्माला येऊ शकले.

दीपावलीचा सण व्यवस्थित साजरा व्हावा व कुठलीही भीती न बाळगता जेवणखाण व्यवस्थित व्हावे यासाठी वस्तू खरेदी करत असताना त्यात भेसळ नाही याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. वस्तूत जास्त कस असला तर त्यासाठी चार पैसे अधिक लागतात, हेही लक्षात ठेवावे. पाककौशल्य दाखविण्याची संधी उत्सवांमुळे मिळते असे समजले तर दीपावलीच्या सणाचा आनंद सर्वांनाच घेता येईल. या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर भेसळीचा व भ्रष्टाचाराचा नरकासुर मरावा व पुन्हा प्राचीन भारतीय परंपरेतील दूध-तूप वगैरे अमृतमय अन्न सेवन करून अग्नितेजाची व कर्मप्रतिष्ठेची श्रद्धा वाढावी व दीपावली व येणारे नूतन वर्ष आरोग्य, मैत्री, समृद्धी, धनसंपदा व उत्कर्ष यांनी परिपूर्ण जावो, हीच प्रार्थना.

www.balajitambe.com

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, October 26, 2011

आरोग्यप्रकाश

डॉ. श्री बालाजी तांबे
घरात श्री गजाननाचे आगमन होणार म्हणून गणपती उत्सवाच्या वेळी साधारणतः संपूर्ण घर साफ करून घेऊन रंगरंगोटीही केली जाते. ज्यांच्या घरात नवरात्र बसते ते नवरात्रापूर्वी घराचा कानाकोपरा रंगवून घेतात, घर सजवतात. हे दोन्ही धार्मिकतेत मोडणारे उत्सव सोडले तरी दीपावलीचा उत्सव सर्व जातिधर्माचे लोक साजरा करतात. या उत्सवाच्या निमित्ताने घराला डागडुजी, रंगरंगोटी करतात, घरात एखादी नवीन वस्तू घेतली जाते, घर सजविले जाते. घर उठून दिसावे, डोळ्यांत भरावे म्हणून घराच्या बाहेरच्या बाजूला आकाशकंदील टांगले जातात, घराला रोषणाई केली जाते. अगदीच काही नाही तरी घराबाहेर चार - सहा पणत्या तरी पेटवून ठेवल्या जातात.

जीवन हा एक उत्सव आहे असे लक्षात घेतले, तर ज्या वेळी प्राणशक्‍ती विकसित होऊन टाळूच्या जागी ब्रह्मरंध्रामध्ये प्रकाशते, तो जीवनाचा महोत्सव म्हणायचा. दीपावली साजरी करण्यासाठी जशी घराची रंगरंगोटी, आरास केली जाते तसे हा महोत्सव साजरा करताना शरीराकडे लक्ष का दिले जात नाही? शरद ऋतूत पित्त वाढणे प्रकृतीचा नियम आहे. वाढलेले पित्त शरीरातून बाहेर काढण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी विरेचनासारखी योजना आयुर्वेदाने केली आहे. पंचतत्त्वांच्या शुद्धीसाठी, तसेच त्रिदोषांच्या शुद्धीसाठी पंचकर्माची योजना केली, तर मग पंचकर्मासारखे वा विरेचनासारखे आयुर्वेदिक उपचार मनुष्य का करून घेत नाही?

पूर्वी, दीपावलीचा महोत्सव असो, वा घरात यज्ञयाग, लग्न वगैरे मोठा प्रसंग असो, शरीरशुद्धी प्राधान्याने केली जात असे. प्रत्येक व्यक्‍ती त्याच्या शरीररूपी घरात राहते, नंतर हे शरीर चुना-माती-विटांनी बांधलेल्या घरात राहते. नुसतेच माती-विटांच्या घराला चांगले ठेवणे योग्य नाही; पण कालमहिमा असा की, फक्‍त बाह्य आवरणाला व वरवरच्या दिखाव्याला व देखाव्यालाच महत्त्व आल्यानंतर शरीर हे आत्म्याचे खरे घर असल्याचे विस्मरणात गेले असावे. शरीराची नुसतीच शुद्धी करून चालत नाही तर शरीरावर तेज दिसेल, लोक आकर्षित होतील, त्यातून एकमेकांशी चांगले संबंध जुळतील व ती व्यक्‍ती सर्वांना हवीहवीशी वाटेल याचीही आवश्‍यकता असते. मायकेल जॅक्‍सन, एलव्हिस प्रेस्ली, सध्या प्रसिद्ध असलेली पॉप गायिका लेडी गागा; तसेच काही भारतीय चित्रपटांतून दाखविलेल्या नृत्यांमध्ये नृत्य करणाऱ्याच्या पोशाखाला छोटे छोटे विजेचे दिवे लावून नृत्य करणाऱ्याचे शरीर आकर्षक केलेले दिसते. म्हणजे शरीर आकर्षक करून इतरांना दृष्टिसुख देणे आवश्‍यक असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. असे असताना शरीरशुद्धी करून शरीराची कांती व तेज वाढेल अशी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, हे लक्षात घेऊन दीपावलीचा महोत्सव सुरू केलेला असावा.

एक गोष्ट निश्‍चित, की नुसत्या शरीरशुद्धीने येणारे तेज चारी दिशांना फाकण्यास असमर्थ ठरेल, त्यासाठी विशेष आहार व रसायनाची व्यवस्था करावी लागेल. याच उद्देशाने दीपावली महोत्सवात खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. दिवाळीच्या फराळात असणाऱ्या अनारसे, करंजीसारख्या पदार्थांमुळे वीर्यवृद्धी पर्यायाने तेजवृद्धी होतेच.

शरीराबरोबरच मनाचेही आरोग्य उत्तम राहावे या दृष्टिकोनातून शरीराला व मनाला विश्रांती मिळण्याच्या हेतूने या महोत्सवात रोजच्या व्यवसायातून किंवा शालेय शिक्षणातून सुटी घेऊन स्वतःकडे लक्ष देण्याची योजना केलेली दिसते. तसेच, नवीन वस्त्रे धारण करणे, दागदागिने घालणे या गोष्टी शरीराला सजवण्याच्या दृष्टीने योजलेल्या दिसतात. मनाचे आरोग्य हे शांत चित्तवृत्तीबरोबरच प्रेमाविष्कारावर, तसेच इतरांशी जमवून घेण्याच्या व घेण्यापेक्षा देण्याच्या स्वभावावर अवलंबून असते. म्हणून आपल्याकडे पाहुण्यांना काही दिवसांसाठी वा भोजनासाठी आमंत्रित करणे, आपल्या इष्टमित्रांबरोबर सहलीला जाणे वगैरे कार्यक्रम आयोजित केलेले दिसतात. मनाची सर्वात अधिक शुद्धी दातृत्वाने होते व त्यामुळे माणसेही जोडली जातात म्हणून दीपावलीच्या निमित्ताने एकमेकांना भेट देण्याचा पायंडा शास्त्रोक्‍त पायावर उभा आहे असे दिसते.

दीपावली उत्सवाची सुरुवात पशुत्वावर विजय मिळाल्याप्रीत्यर्थ गोमातेच्या पूजनाने होते आणि शास्त्र व आप्तवचन यांना मान देण्यासाठी गुरुद्वादशीच्या पूजनाने होते.

शरीर तेजस्वी राहण्यासाठी औषधी वनस्पतींनी बनविलेले उटणे-उद्वर्तन लावून अप्रतिम आयुर्वेदिक तेलाने अभ्यंग मसाज घेण्याची पद्धत सुचविलेली दिसते. दीपावली हा प्रकाशाचा महोत्सव असल्याने शरीराचे तेज प्रकट व्हावे म्हणून दीप घेऊन ओवाळण्याची पद्धत आहे असे दिसते. म्हणून नरकचतुर्दशीच्या दिवशी अर्धे स्नान झाल्यावरपण ओवाळण्याची पद्धत आहे.

आपल्या आसपास असलेल्या जडवस्तू आपल्या जीवनात महत्त्वाच्या आहेत, त्यांच्याशिवाय आपले जीवन सुरळीत चालणार नाही. तसेच शरीर, संपत्ती येथेच सोडून जावे लागत असले, तरी जिवंत असेपर्यंत त्यांचे महत्त्व जाणून घेऊन धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन यांची योजना केलेली दिसते.

पाडव्याच्या दिवशी प्रेमाच्या संबंधासाठी, भाऊबिजेच्या दिवशी नातेसंबंधासाठी आणि या सर्व संबंधांना पावित्र्य मिळावे या हेतूने ओवाळण्याची योजना केलेली दिसते.

शरीरशुद्धी व तेजवृद्धी याने आत्मदीप प्रकट झाला, की एकूणच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रेमाची नाती अधिक दृढ होतात. भाऊ-बहीण हे रक्‍ताच्या नात्याचे अत्यंत पवित्र स्वरूप असून, त्यादृष्टीने बहीण-भावांचे प्रेम व्यक्‍त करण्यासाठी असते भाऊबीज. या दिवशी तेजवृद्धीला अधिक उजाळा मिळण्याच्या दृष्टीने बहीण भावाला ओवाळते व भाऊ बहिणीला भाऊ-बहिणीच्या नात्याचे, स्त्रीत्वाचे, स्त्रीच्या अपेक्षांचे रक्षण करण्याचे वचन देतो.

या दीपमहोत्सवामध्ये शक्‍तीचा प्रभाव अत्युच्च शिखरावर असतो. इतकेच नव्हे तर, न दिसणारी शक्‍ती प्रत्यक्ष दृश्‍यरूप प्रकाशापर्यंत पोचलेली असते. अशा वेळी प्रत्येक अणुरेणूत, जडवस्तूत असलेल्या परमेश्‍वराचे अस्तित्व, वस्तूला असलेल्या भावना आणि एकूण निसर्गचक्राचे गणित समजले, की तुळशीच्या लग्नामागचे रहस्यपण उलगडते. एकूणच हा दीपावली महोत्सव प्रत्येक व्यक्‍तीला आनंदाच्या उच्च शिखरावर तर नेतोच; पण भारतीय परंपरेलासुद्धा अत्युच्च स्थानावर प्रकाशमान करतो.

'फॅमिली डॉक्‍टर'च्या सर्व वाचकांस विक्रम संवत्‌ 2068 हे वर्ष व दीपावली महोत्सव संपूर्ण आरोग्याचा, उत्कर्षाचा, समृद्धीचा, मैत्री-शांती-आनंदपूर्ण जावो.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Monday, October 24, 2011

Friday, November 5, 2010

आरोग्य दीपावली

डॉ. श्री बालाजी तांबे

दीपावली म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा महोत्सव. भारतातील सर्वात महत्त्वाचा व सर्वात मोठा असा हा सण साजरा करण्याबरोबर आरोग्याची जोपासना हा हेतूही असतोच. पावसाळ्यातील दमटपणा, अंधार, मरगळ दूर सारून पुन्हा उत्साहाने वर्षाची सुुरुवात व्हावी यासाठीच जणू दीपावली येते. पावसाळ्यात मंदावलेला अग्नी दीपावलीच्या सुमारास हळूहळू पुन्हा बलवान होण्यास सुरुवात होते.
दीपावली म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा महोत्सव. भारतीय दिनगणनेनुसार दीपावली आश्‍विन महिन्याच्या शेवटी व कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला असते. भारतातील सर्वात महत्त्वाचा व सर्वात मोठा असा हा सण साजरा करण्याबरोबर आरोग्याची जोपासना हा हेतूही असतोच. पावसाळा संपता संपता दीपावली येते. पावसाळ्यातील दमटपणा, अंधार, मरगळ दूर सारून पुन्हा उत्साहाने वर्षाची सुुरुवात व्हावी यासाठीच जणू दीपावली येते. पावसाळ्यात मंदावलेला अग्नी दीपावलीच्या सुमारास हळूहळू पुन्हा बलवान होण्यास सुरुवात होते. पचनात सुधारणा ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने सर्वात अनुकूल असते. सण, उत्सव म्हटला की खाणे-पिणे महत्त्वाचे असतेच. पण दीपावलीच्या या उत्सवात भारतीय संस्कृतीने आहाराबरोबरच शारीरिक, मानसिक आचार-विचार, प्राणी, निसर्ग, देव-देवता, नातेसंबंध, सृजनता अशा सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. या सर्वांचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतो.

निसर्गाशी संतुलित संबंधदीपावलीची सुरुवात होते आश्‍विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी म्हणजे वसुबारसेने. उत्सवाचा पहिला मान दिला जातो तो निसर्गाला, पशुधनाला. सवत्स गाईचे पूजन करून तिला चांगले अन्न देऊन आरोग्यासाठी प्राण्यांची आवश्‍यकता आहे यावर जणू दरवर्षी शिक्कामोर्तब केले जाते. दीपावलीच्या सणात प्राण्यांनाही समाविष्ट करून घेण्याने मनुष्य-निसर्गाचा संबंध संतुलित असल्याचीही ग्वाही मिळते.

वसुबारसेनंतर येते धनत्रयोदशी. आयुर्वेदाची देवता म्हणजेच पर्यायाने आरोग्याची देवता असणाऱ्या धन्वंतरीची पूजा या दिवशी केली जाते. धन्वंतरींनी हातात घेतलेले जलौका व अमृतकलश हे योग्य वेळी शरीरशुद्धी व नियमित रसायन सेवन यांचे द्योतक असतात. शरद ऋतूत शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन, बस्ती वगैरे उपचार करून घेतले आणि दीपावलीपासून प्रकृतीला अनुरूप व संपन्न वीर्यवान औषधांपासून तयार केलेले रसायन सेवनास सुरुवात केली तर ते आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरावे. शरद ऋतूत पित्तदोषाचा प्रकोप होत असतो. या पित्ताला संतुलित करण्यासाठी दीपावली उत्सवाच्या पूजेत साळीच्या लाह्या, धणे यांचा प्रसाद दाखविला जातो व सेवन केला जातो.

अभ्यंगाचे महत्त्वयानंतर येतात नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत असते. अभ्यंग आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा असतो हे आयुर्वेदातील या श्‍लोकावरून समजते.

अभ्यन्नित्यं स जराश्रमवातहा ।दृष्टिःप्रसादपुष्ट्यायुः स्वप्नसुत्वकत्व दार्ढ्यकृत्‌ ।।

*  अभ्यंगाने म्हातारपण उशिरा येते, वय वाढले तरी त्यामुळे होणारा त्रास वाचतो.
*  शरीरश्रमांनी आलेला थकवा नष्ट होतो.
*  वातदोष संतुलित राहतो, त्यामुळे वातरोगांना प्रतिबंध होतो.
*  डोळ्यांची शक्‍ती चांगली राहते.
*  शरीरबांधा व्यवस्थित राहतो.
*  दीर्घायुष्याचा लाभ होतो.
*  झोप शांत लागण्यास मदत होते.
*  त्वचेचा वर्ण उजळतो, त्वचा सुकुमार, मऊ, स्निग्ध राहते.
*  त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

अर्थात हे सर्व फायदे मिळण्यासाठी तेलही औषधांचा विधिपूर्वक संस्कार करून तयार केलेले असावे लागते. त्वचेतून आतपर्यंत जिरणारे, फक्‍त त्वचेलाच नाही तर संपूर्ण शरीराला उचित स्निग्धता देण्यास सक्षम असणारे तेल वापरणे श्रेयस्कर असते.

नितळ त्वचेसाठी उटणे
अभ्यंगस्नानात अभ्यंगाबरोबरच उटण्याचाही समावेश असतो. आयुर्वेदात उटणे लावण्यास उद्वर्तन म्हटले जाते.
उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ ।स्थिरीकरणमानां त्वक्‌ प्रसादकरं परम्‌ ।।
उटण्याने अनावश्‍यक, मलरूप कफदोष स्वच्छ होतो. मेदाचे विलयन झाल्याने लठ्ठपणा कमी होतो. त्वचा प्रसन्न अर्थात स्वच्छ, मऊ, नितळ व तेजस्वी होते. अकाली सुरकुत्या पडत नाहीत आणि सर्व अवयव रेखीव व स्थिर दिसतात. तेलात किंवा दुधात उटणे कालवून संपूर्ण अंगाला लावता येते व कोमट पाण्याने स्नान करता येते. उटणे लावण्याने अतिरिक्‍त प्रमाणात येणाऱ्या घामाचे प्रमाण कमी होते अणि उटण्यातील सुगंधी द्रव्यांमुळे मनही प्रसन्न होते. चंदन, अगरु, वाळा, हळद, यासारख्या सुगंधी, कांतिवर्धक द्रव्यांनी युक्‍त उटणे आपल्या व पर्यावरणाच्या आरोग्यासाठीही 100 टक्के सुरक्षित असते. अशा प्रकारच्या अभ्यंगस्नानाने ताजेतवाने वाटते, उत्सवाचा उत्साह येतो, शिवाय पुढील आयुर्वेदोक्‍त फायदेही मिळतात.

दीपनं वृष्यमायुष्यं स्नानमूर्जाबलप्रदम्‌ ।
कण्डु-मल-श्रम-स्वेद-तन्द्रा-तृड्‌-दाहपाप्मजित्‌ ।।
स्नानामुळे शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो. शरीरशक्‍ती, वीर्य यांची वृद्धी होते. दीर्घायुष्याचा लाभ होतो. त्वचेवरील मळ-घाम-कंड यांचा नाश होऊन श्रमाचा परिहार होतो. आळस दूर होतो, घशाला पडणारी कोरड कमी होते, शरीरदाह थांबतो आणि पापांचा नाश होतो. दीपावलीपुरते म्हणायचे झाले तर नरकचतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या तिन्ही दिवशी अभ्यंगस्नान करायचे असते.

मात्र आरोग्याच्या दृष्टीने पुढे येणाऱ्या संपूर्ण हिवाळ्यात अभ्यंगस्नान नियमित करणे अत्युत्तम होय.
पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीला आणि भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला औक्षण करायचे असते. "दीपदर्शन' हे आयुर्वेदाने मंगलकारक, भाग्यवर्धक सांगितले आहे, नात्यांमधली ओढ तेजाने उजळून जावी, अजून पक्‍की व्हावी हाही उद्देश असतोच.

फराळ नव्हे, रसायनसेवन
दीपावलीमध्ये अनारसा, लाडू, करंजी, शंकरपाळे वगैरे फराळाचे पदार्थ नुसत्या चवीसाठी नव्हे तर रसायनांचे फायदे मिळण्यासाटी योजलेले असतात. दीपावलीनंतरही संपूर्ण हिवाळ्यात "मॅरोसॅन', च्यवनप्राशासारखे रसायन नियमित घेणे उत्तम असते. आकाशकंदील बनवणे, किल्ला बनवणे, प्रियजनांना भेटवस्तू देणे या सर्व गोष्टींमुळे मनाची प्रसन्नता वाढते, सृजनतेला वाव मिळतो आणि मनाची मनाचे आरोग्य टिकायलाही मदत मिळते.
अग्नी तत्त्वाची आराधना, जोपासना आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. शरीरातील अग्नी प्रदीप्त असला की पचन व्यवस्थित राहाते, पर्यायाने आरोग्य नीट राहाते. बाह्य जगातील अग्नी व प्रकाश अंधार व शंका यांना दूर करतो. अग्नीजवळ दमटपणा, अतिरिक्‍त ओलावा, जीवजंतूंना थारा मिळत नाही, पर्यायाने रोगराई दूर राहते, मरगळ झटकून उत्साहाचा अनुभव घेता येतो. दीपावली हा अग्नीचा. तेजाचा उत्सव. म्हणूनच दीपावलीला "आरोग्य दीपावली' म्हणणे अतिशय सार्थ होय.

- डॉ. श्री बालाजी तांबे
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

दीपावली : उत्सव आरोग्याचा

नरकचतुर्दशीची योजना पंचकर्माच्या उद्देशानेच केलेली दिसते. म्हणजे शरद ऋतूनंतर येणाऱ्या शिशिर व हेमंत ऋतूत शरीराला तेलाभ्यंगाची खूप आवश्‍यकता असते. याची सुरुवात दीपावलीच्या वेळी केली, शरीरातील सर्व मलभाग व शरीरात संचित झालेला आम शरीराच्या बाहेर टाकून या चार महिन्यात शरीराचे संरक्षण व्यवस्थित केले, तर पुढचे आठ महिने त्रास होत नाही.

पा डव्याच्या दिवशी म्हणजे कार्तिक प्रतिपदेला सुरू होणाऱ्या वर्षात, आरोग्यप्राप्ती व्हावी म्हणून व संपलेल्या वर्षात घेतलेल्या आरोग्याच्या आनंदाचा उत्सव म्हणून अशा दोन कारणांसाठी दीपावली हा उत्सव साजरा केला जातो. वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंतचे दीपावलीतील सर्व दिवस साजरा करण्याची पद्धत आरोग्यासाठीच उपयोगाची आहे असे दिसते.

नव्या संवत्सराची सुरुवात करत असताना आरोग्य तयारी करताना आयुर्वेदाप्रमाणे आरोग्याची व्याख्या विचारात घ्यावी लागेल. त्या व्याख्येनुसार नुसते शारीरिक नव्हे, तर मानसिक व आत्मिक आरोग्य व आनंद मिळविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मनाचे व आत्म्याचे आरोग्य म्हटले की बाह्य जगत, आजूबाजूला असलेली नातेवाईक मंडळी व सर्व समाज यांचा समावेश होतो, तसेच पृथ्वीच्या पाठीवर असलेली सर्व साधनसामुग्री, व्यवसाय-उदीम-व्यवसायाची साधने या सर्वांचा विचार करून दीपावलीचा उत्सव योजलेला दिसतो.

माणसात असलेल्या पशुत्वाला दूर करण्यासाठी व पशुत्वातून मनुष्यत्वाकडे येत असताना सात्त्विक प्रवृत्तीच्या पशूची म्हणजेच गाईची आणि सृष्टिचक्र चालू राहावे म्हणजेच वसुंधरेचा विकास व्हावा या हेतूने वासरू असलेल्या गाईचे पूजन करून ह्या उत्सवाला सुरुवात होते.

श्रीमद्‌भगवद्‌गीतेत सांगितल्यानुसार "वसूनां पावकश्‍चास्मि' म्हणजे अष्टवसूंपैकी अग्नी महत्त्वाचा आहे. एकूणच दीपावली हा अग्नीचा, दिव्यांचा व प्रकाशाचा उत्सव आहे म्हणून दिवाळीच्या दिवसात रोषणाई केली जाते, ठिकठिकाणी उजेड केला जातो, पणत्या लावल्या जातात. यामुळे सर्वप्रथम मनाला उभारी येते आणि आपण गेले वर्ष आनंदात जगलो याची पावती म्हणून दीप लावले जातात.

मातृस्तन्य हे आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. ज्या मुलांना मातेचे दूध भरपूर प्रमाणात व व्यवस्थित मिळते त्यांचे आरोग्य पुढे आयुष्यभर उत्तम राहू शकते. परंतु एखाद्या मुलाला मातेचे दूध मिळणे शक्‍य नसल्यास त्याला गाईचे दूध दिले जाते, एवढे साधर्म्य गाईचे दूध व मातेचे दूध यांच्यात असते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. दुधाशिवाय शरीरधातू पुष्ट होत नाहीत, दुधाशिवाय शरीरात वीर्य तयार होऊ शकत नाही, दुधाशिवाय हाडांना बळकटी मिळत नाही, शिवाय त्वचेचा तजेला, शरीराचा बांधा, केस, डोळे यांचे आरोग्यही दुधाशिवाय मिळू शकत नाही. "दूध पिऊ नये' अशा प्रचारामुळे सध्या नाना प्रकारचे रोग झालेले दिसतात. शरीरातील अग्नी व पर्यायाने शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे . शरीरधारणेसाठी सर्व शरीराचे धातू पुष्ट करून त्रिदोष व मल समत्वात ठेवण्यासाठी दुधाएवढे श्रेष्ठ अन्न नाही. म्हणून जिच्याकडून दूध मिळते त्या गाय-वासराचे पूजन आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सहज लक्षात येईल. याच दुधापासून तयार केलेले दही, लोणी, तूप यांचा वापर करून शरीरातील अग्नी, वीर्य - प्राणशक्‍ती संभाळता येते व जीवनाचा आनंद लुटता येतो.

आपले जीवन एकूण सुखी करायचे असेल तर आपल्याला आवश्‍यक असणारी सर्व साधनसामुग्री व्यवस्थित असावी, तिच्याकडे नीट लक्ष द्यावे. प्रत्येक आठवड्याला चेन साफ करणे, त्यात तेलाचे चार थेंब टाकणे, एखादा भाग खराब झाला असला तर बदलणे अशी काळजी साध्या सायकलसारख्या वाहनाची आपण करतो. अशी काळजी न घेतल्यास ऐन वेळेला सायकलचा उपयोग होत नाही. यावरून आपल्या लक्षात येईल की शरीररूपी यंत्राचीही काळजी घेणे व सर्विसिंग करणे आवश्‍यक असते.

साधनसामुग्री म्हणजे जड वस्तुजात बोलून सांगू शकत नाही की मी पण जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, पण असलेल्या साधनसामुग्रीची आपल्याला नोंद घ्यावीच लागते. हे साधनसामुग्रीरूपी धन आरोग्यधनासाठी उपयोगाचे असते म्हणून या सर्व धनाची पूजा केली जाते. या सर्व साधनसामुग्रीची घेतलेली काळजी हीच त्या धनाची पूजा. धनत्रयोदशीच्या दिवशी केवळ धनाची नव्हे तर आपल्या जीवनाची उंची वाढवण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या साधनसामुग्रीची (इफ्रास्ट्रक्‍चर) पूजा केली जाते, त्यांची देखभाल केली जाते.

अर्थात घरा-दाराची देखभाल एका दिवसात होऊ शकत नाही म्हणून घरे साफ करून घेणे, घरे रंगवून घेणे, आवश्‍यक असलेल्या वस्तू घरात आणणे वगैरे कामे दिवाळीच्या आधीच केली जातात. साधनस्वच्छता म्हणत असताना घराच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारे घाण नसावी. बाहेर अंगणात साठलेले पाणी व घरातील जळमटे अनारोग्याचे कारण ठरत असल्याने ती काढण्याचा विचार करणेही आवश्‍यक असते.

धनत्रयोदशीच्या नंतर नरकचतुर्दशीची योजना पंचकर्माच्या उद्देशानेच केलेली दिसते. म्हणजे शरद ऋतूनंतर येणाऱ्या शिशिर व हेमंत ऋतूत शरीराला तेलाभ्यंगाची खूप आवश्‍यकता असते. याची सुरुवात दीपावलीच्या वेळी केली तर शरीरातील सर्व मलभाग व शरीरात संचित झालेला आम शरीराच्या बाहेर टाकून या चार महिन्यात शरीराचे संरक्षण व्यवस्थित केले तर पुढचे आठ महिने त्रास होत नाही. या दृष्टीने या चार महिन्यांमध्ये अंगाला सुवासिक उटणे, अंगात जिरण्याची क्षमता असणारे तेल लावून अभ्यंग करावा. याची सुरुवात नरकचतुर्दशीच्या दिवशी करण्याची प्रथा दिसते. नरक म्हणजे अंधार, नरक म्हणजे घाण, नरक म्हणजे दुःख. या सगळ्याला कारणीभूत असणारे जंतू -व्हायरस म्हणजे नरकासुराचा वध करण्याचा म्हणजे पर्यायाने शरीराची प्रतिकारशक्‍ती, प्राणशक्‍ती वाढविण्याचा हा उत्सव. स्नानापूर्वी पायाखाली कारंड - विशाला नावाच्या वनस्पतीचे फळ चिरडण्याची प्रथा आहे. याचा उपयोग मेंदूतील व्हायरस, डिप्रेशन, वेड वगैरेंवर उपचार करण्यासाठीही केला जातो.

हे फळ पायाने फोडल्याने शरीराला व मेंदूला काही फायदा होत असावा. दुष्ट शक्‍तींचा नाश करण्याचे प्रतीक म्हणून हे फळ पायांखाली चिरडण्याचा विधी सांगितलेला दिसतो. सूर्योदयापूर्वी सर्व ठिकाणी दिवे लावून अंधाराचे साम्राज्य संपवण्याची योजना दिसते. सूर्य उगवल्यावर सर्व ठिकाणी प्रकाश पसरतोच, पण अंधार-नरक संपवण्याचा आपण केलेला प्रयत्न म्हणून सूर्योदयापूर्वी सर्व ठिकाणी दिवे लावले जातात. याच बरोबरीने सकाळच्या वेळी आवाज करणारे फटाके फोडले जातात. दहा हजार फटाक्‍यांच्या माळा लावून प्रदूषण वाढवणे, लोकांच्या कानाला त्रास होईल एवढे मोठे फटाके वाजवणे अभिप्रेत नाही. पण काही प्रमाणात फटाके वाजवणे चांगले असते.

पावसाळ्याच्या नंतर वातावरणात जमलेले कीटक, सर्प यांना दूर करण्यासाठी या आवाजाचा उपयोग होतो. एखाद्याला बोलविताना टाळी वाजवून लक्ष वेधले जाते, तसेच एका विशिष्ट तऱ्हेने लक्ष खेचून घेण्याची शक्‍ती आवाजात असल्यामुळे या आवाजाचा उपयोग होतो.अशा रीतीने या उत्सवात फटाके व रोषणाई यांचे आरोग्यासाठी महत्त्व आहे. फुलबाज्यांमुळे मन प्रसन्न होणे, आतील चेतनाशक्‍ती सर्व शरीरभर पसरण्याचा अनुभव येणे, जमिनीवर पेटणाऱ्या चक्रांकडे पाहताना शरीरातील मूलाधाराच्या ठिकाणी असलेल्या कुंडलिनी जागृतीची आठवण होत असते. भुईनळे कारंजासारखे वर जाताना पाहून कुंडलिनीचे ब्रह्मरंध्राकडे ऊर्ध्वगामी होणे वगैरे फायदे होताना दिसतात. या दिवशी साहजिकच नवीन कपडे घालणे, देवदर्शन करून मन प्रसन्न ठेवणे, शरीराची धारणा होईल, शरीराचे धातू वाढतील, शरीरात ताकद येईल असे चांगले फराळाचे पदार्थ खाणे ह्या गोष्टीही केलेल्या दिसतात.

यानंतर असते लक्ष्मीपूजन. लक्ष्मी म्हणजे समृद्धी. आपल्याला आरोग्य मिळालेले आहे, आरोग्यामुळेच आपण जीवनाचा आनंद घेत आहोत, चांगली बुद्धी झाल्याने आपण आपल्याला मिळालेली संपत्ती चांगल्या कामासाठी वापरत आहोत, आपले नशीब चांगले आहे यासाठी कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा हा दिवस. लक्ष्मी व विष्णू ह्या पती-पत्नींच्या आशीर्वादानेच संपत्ती मिळते व नशीब उघडते. विष्णू म्हणजे शरीरात चालणाऱ्या चेतनेचे चलनवलन म्हणजे इंद्रियांकडून शरीरात येणाऱ्या व मेंदूतून इंद्रियांकडे बाहेर जाणाऱ्या संवेदना असे आहे विष्णूचे स्वरूप. त्यासाठी असलेली शक्‍ती व लागणारी व्यवस्था हे लक्ष्मीचे स्वरूप. संवेदनाच जर व्यवस्थित नसल्या तर कुठलेच काम नीट होत नाही. हात कापत असला तर लिहिणार कसे? फूल पाहिल्यावर मनात परमेश्‍वराच्या चमत्काराची संवेदना जाणता आली नाही, डोळ्यात पाहिल्यावर प्रेमाचा भाव उत्पन्न झाला नाही तर जीवन पुढे चालणार कसे? तेव्हा समृद्धीसाठी लक्ष्मीचे पूजन केले जाते. ईमाने इतबारे, कष्ट करून, नैतिकता पाळून मिळविलेल्या लक्ष्मीचीच पूजा होऊ शकते, अलक्ष्मीची पूजा होऊ शकत नाही. तेव्हा एक प्रकारे भ्रष्टाचार व अनैतिकतेने मिळविलेल्या संपत्तीसंबंधी घृणा उत्पन्न व्हावी अशी योजना येथे दिसते. कार्य करण्यासाठी आवश्‍यक असणा आरोग्य असण्यासाठी आहार-विहार, औषधोपचारांबरोबरच योग्य पूर्वकर्माची व नशिबाची साथ लागते.

असे सर्व झाल्यानंतर प्रतिपदेला - पाडव्याला मेंदूत चमकलेले कोटी कोटी दिवे अनुभवण्याचा पाडव्याचा दिवस. या दिवशी कुंडलिनी ब्रह्मरंध्रापर्यंत येऊन तेथे प्रकाश पसरतो. सत्प्रेरणा, समाजाचे बांधिलकीचे भान, आपल्यापेक्षा उपेक्षित व दुर्लक्षित असणाऱ्यांना मदत करण्याची भावना, आपल्या नातेवाईकांना प्रेम व भेटी द्यायची भावना बाळगून एकूणच जीवन आनंदात जावे या दृष्टीने हा दिवस साजरा केला जातो.

यानंतरचा दिवस असतो भाऊबीजेचा. बहीण-भावाचे नाते हे स्त्री-पुरुषामधील सर्वात पवित्र नाते. भाऊ बहिणीकडे स्त्री या दृष्टीने पाहात नाही व बहीण भावाकडे पुरुष या दृष्टीने पाहात नाही. स्त्री-पुरुष ही शक्‍ती वेगळी असली तरी त्यांच्यातील प्रेमाचा भाव पाहिला जातो, बहिणीला आपुलकी दाखवून "मी तुझ्या पाठीशी आहे' असे आश्‍वासन दिले जाते. एकूणच आपल्या नात्याचा विस्तार प्रेमाने व शुद्ध बुद्धीने वाढविण्याचा दिवस म्हणजे भाऊबीजेचा दिवस.
एकूणच दीपावली हा नुसता करमणुकीचा, परंपरेचा, कर्माकांडातील, देवतांचे पूजन करण्याचा उत्सव आहे असे नाही तर तो एक आरोग्याचा उत्सव आहे. हा उत्सव साजरा करून आपण आरोग्यवान होऊ या, म्हणजे नूतन वर्ष आपल्या सर्वांना आरोग्य, सुखसमृद्धीचे जाऊन, दीर्घायुष्य मिळून आपल्याला जीवनाचा आनंद लुटता येईल. दीपावलीच्या शुभेच्छा.

- डॉ. श्री बालाजी तांबे
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad