शाळेत लोहाच्या गोळ्या ज्या मुलांना दिल्या गेल्या ती मुले अधिक हुशार झाली, त्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारली, असे वडोदऱ्यातील संशोधनात आढळून आले. आवश्यकता असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना अशा लोहाच्या गोळ्या आपल्याकडे दिल्या जाणार आहेत का?
मुलांनो, लोह घ्या, बुद्धिमान व्हा!
गुजरातमधील वडोदऱ्याच्या डॉ. अदिती सेन व डॉ. शुभदा कानानी यांच्या अभ्यासाचा हा धडा आहे. हा अभ्यास इंडियन पेडिआट्रिक्स मासिकाच्या फेब्रुवारी २००९ अंकात प्रसद्ध झाला आहे.
सर्वाधिक भारतीयांना आहारात लोह रोज कमी मिळते. याने रक्ताची लाली कमी होते. याला आपण पंडुरोग (ऍनिमिया) म्हणतो. आपला मेंदू लहानपणी बनतो, तेव्हा काही रसायने लागतात. त्यात लोहाचे कण असतात. लोह कमी पडले तर मेंदू नीट वाढत नाही. नंतर ही भर भरून काढता येत नाही.
च्या रोजच्या कामाला जी रसायने लागतात त्यातही लोहाचे कण असतात.

मुलांच्या शिकण्यामध्ये, बुद्धिविकासात लोहकण महत्त्वाचे काम करतात. मुलांना लोह दिले तर त्यांचा जास्त बुद्धिविकास होतो, असा धडा डॉ. सेन व डॉ. कानानी यांच्या अभ्यासात आहे. यावरून शिकून आपण लगेच भारतातील सर्व मुलांना हुशार व्हायला मदत करू या.
लोह दिले की रक्तातील लाली देणारे हिमोग्लोबिन वाढते व मुलांची शारीरिक वाढही जास्त चांगली होते. लोह देऊन जादा बौद्धिक वाढही होते का, हे जाणायला हा अभ्यास झाला.
त्यांनी वडोदऱ्यातील चार सारख्या सरकारी मुलींच्या शाळांत वर्षभर हा अभ्यास केला. पाचवी-सहावीच्या मुली होत्या. फेरस सल्फेट १०० मिलिग्रॅम + फोलिक ऍसिड ०.५ मिलिग्रॅम असलेली १ गोळी त्यांनी ३ शाळांतील मुलींना १ वर्ष दिली. एका शाळेत रोज एकदा, एका शाळेत आठवड्याला दोनदा व एका शाळेत आठवड्याला एकदा. चौथ्या शाळेतील मुलींना गोळी दिली नाही, पण अभ्यासात घेतले. ज्यांना लोहाच्या गोळ्या मिळाल्या त्या मुली ज्यांना गोळ्या मिळाल्या नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त हुशार झाल्या. बुद्धिमत्तेसाठी ४ तपासण्या गोळ्या घेण्याआधी व नंतर केल्या. ज्यांनी आठवड्याला एकदा गोळी घेतली त्यांना दोन तपासण्यांत जादा गुण मिळाले व आठवड्याला दोनदा गोळ्या घेणाऱ्या व रोज गोळी घेणाऱ्या मुलींना चारही तपासण्यांत जादा गुण मिळाले.
गोळी घेणाऱ्या सर्व मुलींच्या रक्ताची लाली वाढली. हिमोग्लोबिन वाढले. ज्यांनी रोज गोळी खाल्ली त्यांचे २ ग्रॅमनी वाढले, ज्यांनी आठवड्यातून दोनदा गोळी घेतली त्यांचे 1.6 ग्रॅमनी वाढले. ज्यांना आधी पंडुरोग नव्हता त्यांचीही लाली व हिमोग्लोबिन लोह घेऊन वाढले व बौद्धिक क्षमताही वाढली. परदेशात बाल्टीमोर येथे असेच लोहाच्या गोळ्यांनी मुलांची हुशारी वाढली. इंडोनेशियामध्ये 3 महिने रोज लोहाच्या गोळ्या पंडुरोग असलेल्या मुलांना 3 महिने दिल्या. त्यांची हुशारी खूप वाढली.

वाराणसीच्या ग्रामीण भागात ६ ते ८ वर्षांच्या मुलांना ३ महिने लोह दिले. त्यांची हुशारी खूप वाढली. त्याआधी याच डॉक्टरांनी बडोद्याच्या ९ ते १५ वर्षे वयाच्या मुलांना ३ महिने रोज ६० मिलिग्रॅमची लोहाची, ०.५ मिलिग्रॅम फोलिक ऍसिडची गोळी दिली. हाच धडा आहे, की लोह दिल्याने हुशारी वाढते. चला, आपण आपल्याकडची सर्व मुले चांगली करू या.
डॉ. सिंग पी व डॉ. जी. एस. तनेजा यांचा अभ्यास इंडियन पेडियाट्रिक्समध्ये २००३ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांच्या अभ्यासानुसार ९ महिने ते ३ वर्षे वयोगटातील ४७ टक्के मुलांना पंडुरोग आहे. ७५ टक्के म्हणजे बहुतेक सर्वांनाच पंडुरोग आहे. एक ग्रॅम हिमोग्लोबिन कमी असेल, तर आपली कार्यक्षमता १.५ ते २ टक्क्यांनी कमी होते, असा लेविन या शास्त्रज्ञाचा अभ्यास प्रसिद्ध आहे. भारतीय शाळेतील मुलांचे हिमोग्लोबिन ७ ते ९ ग्रॅम असते. हे वाढवले तर त्यांची कार्यक्षमता, शिक्षणक्षमता, उत्साह, शरीराची वाढ हे सर्वच वाढेल.
बिनखर्चात आहारात लोह कसे वाढवावे?
१) घरी अन्न लोखंडाच्या भांड्यात शिजवावे. लोखंडाच्या भांड्यात भाजी काळी झाली म्हणजे त्यात लोह उतरले. आरशात आई-बाबांनी मुलांसह स्वतःला बघावे. आई-बाबांचे हिमोग्लोबिन १० ते १५ ग्रॅम असेल. दुधात लोह जवळजवळ नसतेच व दुधाशिवाय इतर अन्नातील लोहही तान्हुल्यांना लोह देणे सर्वात महत्त्वाचे.
आपल्यासाठी धडे - लोह कमी पडून मेंदूच्या वाढीत या तान्हुल्यांना जी मर्यादा येते ती नंतर कशानेही कमी होत नाही. मेंदूची सर्वाधिक वाढ आईच्या पोटात, त्यापेक्षा कमी पहिल्या वर्षी, त्यापेक्षा कमी तिसऱ्या वाढदिवसापर्यंत होते.
गर्भवतींना सरकार लोहाची व फोलिक ऍसिडची १ गोळी रोज मोफत देते. पाळी चुकताच मातांनी सरकारी दवाखान्यात नाव नोंदवून त्या गोळ्या मिळवाव्या. सर्व मुला-मुलींनी, हुशार तरुण-तरुणींनी याआधीच सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी. आपल्याला पंडुरोग, रक्त कमी आहे का, रक्ताची लाली कमी आहे का, पंडुरोग आहे का विचारा. असेल तर डॉक्टरांना लोहाची गोळी मागावी. मुलींनी व मुलांनीसुद्धा.
गेली २५ वर्षे आम्ही कुणीही बाळ पहिल्यांदा तपासायला आले की त्यांना टोनोफेरॉन नावाचे मोठ्या माणसांचे औषध लिहून देतो. जेवढ्या किलो वजनाचे बाळ असते तेवढे थेंब टोनोफेरॉन रोज एकदा, असे १ वर्ष आईच्या दुधाआधी किंवा आहाराआधी द्यायला सांगतो. असे अंदाजे लाखभर मुलांना देऊन काही कुणाला त्रास झाला नाही. औषधाने जीभ काळी होते. अन्न खाताना काळेपणा जातो. शी (संडास) ही काळी होते. पण त्यांना पंडुरोग होत नाही. त्यांचा मेंदू हुशार व शरीर छान वाढते. आईलाही अर्धा चमचा औषध रोज घ्यायला सांगतो. सर्व औषधे जादा घेतली तर विषबाधा होते. टोनोफेरॉन लोह औषध चुकूनही जादा देऊ नये.
सरकारी दवाखान्यात लोहाच्या गोळ्या मोठ्यांना व मुलांना मोफत मिळतात. त्या चांगल्या असतात. आजच सरकारी दवाखान्यात मुलांना डॉक्टरांना दाखवून गोळ्या आणून सुरू करा. छोट्यांसाठी औषध मिळते.
मुले सरकारची नाहीत, आपली आहेत, सरकारी दुकानात न मिळाली तर औषध दुकानात लोहाची गोळी- फेरस सल्फेट मागा. आपल्या डॉक्टरांना हा लेख दाखवून मागा. डॉक्टर, औषधी दुकानदार यांच्या मदतीने१००० गोळ्यांचा डबा मागवा. उपलब्ध नसेल तर मागवून घ्यायला सांगा. पाठपुरावा करून मिळवा. या गोळ्या ५० ते १०० रु. १००० अशा मिळतात.
याही न मिळाल्या तर लोह असलेली औषधी दुकानातील औषधे बघा. प्रत्येक गोळीतून किती लोह मिळते बघा. कमीत कमी पैशात लोह देणारी गोळी / औषध निवडा. गोळी गिळू शकणाऱ्या मुलाला बाजारातली लोहाची १ गोळी रोज देता येईल, असे ३ महिने देऊन मुलामुलींना फायदा होईल. शरीरास पुरेसे लोह असेल तर लोहाचा शरीरात प्रवेश आपोआप बंद होतो. जादा लोहाने मुलांना त्रास होणार नाही.
एका वेळी खूप गोळ्या घेणे घातक आहे, म्हणून गोळ्या मुलांजवळ देऊ नये. मुंबई / कोकणात हवेतील ओलाव्याने त्या खराब होऊ नये यासाठी त्या हवाबंद डबीत ठेवाव्या.
जग जिंकणारी मुले घडवू या चला, आपण प्रत्येक जण आजूबाजूच्या सर्व मुलांचे पालक होऊ या. सर्व शाळांत हा लेख दाखवून त्यांचे वाचन करून घेऊ या. गीतेत सांगितले आहे, की आपण आपली २० टक्के कमाई समाजासाठी खर्च करू या. चला, आपण मदत करू या. सरकारी दवाखान्यातून लोह + फोलिक ऍसिडच्या गोळ्या घेऊन सर्व शाळांत सर्व मुलांना देऊ या... आठवड्याला एकदा, जमले तर दोनदा, जमले तर रोज.
सरकारी दवाखान्यात न मिळाले तर ओळखीच्या डॉक्टर, औषध दुकानदाराला सांगून त्यांच्याकडून हे मागवून घेऊ या. या उन्हाळ्यानंतर शाळा उघडल्या की आपण हे करून घेऊ या.
आमदार-खासदार निधी यासाठी वापरायला सांगा. जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिकांमध्ये १० टक्के पैसे मुलांसाठी व महिलांसाठी असतात. गेली सर्व वर्षे हे पैसे कधीही मुलांसाठी वापरलेले नाहीत. आपण आज पोस्टकार्ड टाकून / भेटून लेखी विनंती करा- हे पैसे लोहगोळीसाठी वापरा.
हे काम करणाऱ्यालाच निवडणुकीत निवडून देऊ, असे सांगा.
टीप - लोहाने शी काळी होते. शरीरात जाऊ देत नाही. मुले आई-बाबांएवढी लाल असतील तर आपले अभिनंदन. पण मुले पांढरी असतील तर त्यांना लोह द्या. त्यांचे गाई-म्हशीचे दूध देणे बंद करा. दुधाच्या पैशांचे तेल व चणे-शेंगदाणे आणा. त्यांना दर वेळी जे खातील त्यात दोन-चार चमचे तेल वाढा व खिसे चणे-शेंगदाण्यांनी भरून ठेवा. एक रुपया जादा खर्च न करता शंभर दिवसांत मुले लाल, सशक्त होतील. हे करा व आम्हाला पोस्टकार्डावर अनुभव कळवा व सर्वांना शिकवा. दूध, पेज, चहा या पातळ अन्नानेच मुले व भारत खुरटला आहे. मुलांचे चहा, दूध बंद करा. त्या पैशांचे तेल, चणे, दाणे मुलांना द्या.
हिमोग्लोबिनचा एक कण बनायला एक वाटा लोह व ९९९ वाटे इतर अन्न लागते- जे डाळभात, चणे-दाणे व तेल यातून मिळते. लोह देण्याबरोबर खिशात चणे-दाणे २४ तास मुले १८ वर्षांची होईपर्यंत ठेवणे आवश्यक आहे. चणे-दाणे नसतील तर कच्चे तांदूळ ठेवा. कच्चे तांदूळ आपल्याला १० कोटी वर्षांपासून पचतात; आजही पचतात.
उंदीर, चिमण्या, कोंबड्या व आपली मुले व आपण या सर्वांना कच्चे तांदूळ पचतात. त्याने पोट फुगत नाही, बिघडत नाही. काही त्रास नाही, असा आम्ही दाखला देतो.

- डॉ. हेमंत जोशी
No comments:
Post a Comment