- डॉ. श्री बालाजी तांबे
|
केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची चटणी खायची असे नसून, वर्षाच्या सुरवातीला महत्त्वाच्या गोष्टीची आठवण राहावी अशा हिशेबाने कडुनिंबाची चटणी खायला सुचविलेली आहे. कडुनिंबाच्या झाडाची सावली हीसुद्धा शीतल असते. कडुनिंबाच्या झाडाच्या वातावरणात अंगावर उठणारी खाज, त्वचाविकार वगैरे विकारांवर आराम मिळू शकतो. कडुनिंबाच्या सालीचा व फुलांचाही खूप उपयोग होतो.
क डुनिंबाचा वृक्ष हा जणू कल्पवृक्षच आहे. या झाडाच्या पानांची, फळांची, फुलांची चव कडू असली तरी त्याचा उपयोग अत्यंत गोड म्हणजे कल्याणकारी असतो. आरोग्याच्या बाबतीत तर कडुनिंबाला तोड नाही. कडुनिंबाच्याच अंगाखांद्यावर खेळणारी वनस्पती म्हणजे गुळवेल. गुळवेलही अत्यंत कडू असते, परंतु वर्षाच्या सुरवातीला येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी गुळवेलीची आठवण न येता कडुनिंबाची आठवण येण्याचे कारण म्हणजे या ऋतूत गुळवेलीवर पाने नसतात, तर नुसतेच झाडाला लपेटलेले खोड दिसते. कडुनिंबाचेच अपत्य असल्यासारखी गुळवेल ही सर्वोत्तम मानली जाते आणि तिला "अमृता' असेही म्हटले जाते. ज्या कडुनिंबाने गुळवेलीला वाढवले, पोसले तो कडुनिंबही अमृतासमान नसला तरच नवल. दत्तक दिलेली ही गुळवेल एखाद्या दुसऱ्या झाडावर पोसली गेली तर ती तेवढी गुणकारी ठरत नाही. उन्हाळा भरपूर आहे अशा ठिकाणी आणि ज्या ठिकाणी जमिनीत पाणी थांबून राहत नाही अशा ठिकाणी कडुनिंबाची झाडे विपुल प्रमाणात दिसतात व त्या मर्यादेत अशा ठिकाणी गुळवेलही अधिक प्रमाणात असल्याचे दिसते. आयुष्यात जर मधुररसाची प्राप्ती हवी असेल तर वर वर कडू वाटणाऱ्या या दोन वनस्पतींची मदत घेतल्याशिवाय काम भागणार नाही.
म्हणून वर्षांच्या पहिल्याच दिवशी कडुनिंबाची आठवण होते. याचा वृक्ष छान मोठा डेरेदार असतो. "चंदामामा चंदामामा भागलास का, निंबोळीच्या झाडामागे लपलास का?' हे गीत प्रत्येकाने लहानपणी अनेकदा ऐकलेले असते. निंबोळ्या छान पिवळ्याधमक व आकर्षक असतात. त्या कडू असल्या तरी मनुष्यमात्राच्या उपयोगी ठरणाऱ्या असतात.
बहुउपयोगी कडुनिंब सुंठ व आल्याच्या उपयोगाने जसे वेगवेगळ्या प्रकारचे रोग बरे होऊ शकतात, तसेच अनेक रोग कडुनिंबानेही बरे होऊ शकतात. कडुनिंब वीर्याने शीतल असतो, तो कफदोष व पित्तदोषाचे शमन करतो व अग्नीला म्हणजेच हॉर्मोनल सिस्टिमला उपयुक्त असतो. खोकला, ताप, तोंडाला चव नसणे, जंत, त्वचारोग अशा अनेक विकारांमध्ये उपयोगी असणारा हा वृक्ष.
भारतात कडुनिंब सर्वत्र उगवलेला दिसतो, पण अति पाऊस असलेल्या ठिकाणी व जमिनीत पाणी थांबत असलेल्या ठिकाणी कडुनिंब उगवणे व जगवणे अवघड असते. कडुनिंबाच्या लाकडाला तर कीड लागत नाहीच, पण तो जंतावर औषध म्हणूनही मदत करतो. कडुनिंबाचे झाड पर्यावरणाची शुद्धी करून घरात जंतुसंसर्ग थांबविण्यासाठी मदत करते. कडुनिंबाची पाने अंथरुणावर पसरून त्यावर चादर घालून झोपणे उत्तम असते. कडुनिंबाच्या पानांचा काढा स्नानाच्या पाण्यात टाकून स्नान करणे चांगले असते.
एकूणच, कडुनिंबाचे महत्त्व कल्पवृक्षासमान असल्यामुळे वर्षाच्या सुरवातीच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी याच्या पानांची चटणी सेवन करून जणू कडुनिंबाचा सत्कार केला जातो. कडुनिंबाच्या पानांत सैंधव, मिरी, जिरे, ओवा, हिंग, चिंच व गूळ घालून चटणी केली जाते. कडुनिंबाचा रस घेण्याऐवजी या प्रकारे चटणी करून घेणे अधिक चांगले असते. ही चटणी चैत्र, वैशाख या दोन महिन्यांत रोज खाल्ली तर वर्षभर लाभ होऊ शकतो.
शीतल सावली मधुमेह असणाऱ्यांनी हे दोन महिने रोज कडुनिंबाच्या पानांची चटणी खावी. यानंतर गुळवेलीच्या वेलाची बोटाएवढ्या जाडीची व बोटभर लांबीची कांडी जराशी चुरून रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी सेवन करावे (दोन-तीन दिवस परत परत तीच कांडी वापरता येते). हा प्रयोग दोन-तीन महिने केल्यास मधुमेहावर उपचार होतो का याचा अंदाज घेता येतो. अंतःस्रावी ग्रंथीचा त्रास असणाऱ्यांनाही हा प्रयोग करायला हरकत नाही. प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांनी किंवा ज्यांच्या शरीरात पांढऱ्या व लाल पेशींचे गणित चुकते आहे, त्यांनीही हा प्रयोग करायला हरकत नसावी.
भारतासारख्या देशात पोटात जंत होण्याचे प्रमाण खूप असते, त्यांनाही कडुनिंबाच्या चटणीची दोन महिने योजना केल्यावर फायदा व्हावा. कडुनिंबाच्या झाडाची सावली हीसुद्धा शीतल असते. कडुनिंबाच्या झाडाच्या वातावरणात अंगावर उठणारी खाज, त्वचाविकार वगैरे विकारांवर आराम मिळू शकतो. कडुनिंबाच्या सालीचा व फुलांचाही खूप उपयोग होतो. कडवट वाटल्या तरी आम्ही लहानपणी निंबोळ्या खात असू.
अशा प्रकारे एकूणच कडुनिंबाचे महत्त्व सर्व वनस्पतींमध्ये खूप वरच्या स्थानावर दिसून येते. रोज कडुनिंबाची चटणी खाणे जमले नाही, तर कडुनिंबाची पाने व आवळकाठीचे चूर्ण यांचे मिश्रण रोज पाण्याबरोबर घ्यायला हरकत नाही. यामुळेही त्वचारोग, अंगावर खाज सुटणे वगैरेंत उपयोग होऊ शकेल. केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची चटणी खायची असे नसून, वर्षाच्या सुरवातीला महत्त्वाच्या गोष्टीची आठवण राहावी अशा हिशेबाने कडुनिंबाची चटणी खायला सुचविलेली आहे. हे लक्षात घेऊन आपण कडुनिंबाचा उपयोग आपले आयुष्य निरामय व सुखी करण्यासाठी करून घेता येईल.

No comments:
Post a Comment