Wednesday, February 22, 2012

पॉपकॉर्न खाताय ? जरा सावधान.!


रिकाम्या वेळी तोंड चालवून पोटोबाचे लाड पुरविणारे आणि प्रत्येक मैफिलीची जान असणारे पॉपकॉर्न खाणं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरू शकते. पॉपकॉर्न करताना हळद वापरली जाते, असा आपला समज असेल तर सावध राहा; कारण अवघ्या दीडशे रुपयांत किमान शंभर किलो पॉपकॉर्न पिवळे धम्मक होऊ शकतात इतकी जादू असणारे रंग सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
मक्याचे दाणे फुलवून करण्यात येणारे पॉपकॉनचे चाहते ढिगाने आहेत. संध्याकाळी फिरायला जाताना आणि सुट्टीच्या दिवशी दारावर येणार्‍या पॉपकॉर्नवाल्याने अबालवृद्धांना भुरळ घातली आहे. याचे प्रमाण उपनगरांमध्ये अधिक दिसते. नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेला मुलगा आणि सून यांच्या पश्‍चात नातवंडांचे सर्व हट्ट पूर्ण करण्यासाठी फिरस्त्या विक्रेत्यांकडून खरेदी करतात. त्यांच्याकडे असलेले पॉपकॉर्न खाण्यास धोकादायक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

कसा ओळखावा रंग?
पॉपकॉर्नमध्ये जर रंग टाकला असेल तर तो रंग हाताला पक्का चिटकून राहतो. हात धुतला तरीही तो रंग निघत नाही; पण हळद असेल तर हात धुतल्याबरोबर हळद निघून जाते. हळदीला विशिष्ट वास आहे. त्यावरूनही पॉपकॉर्नसाठी काय वापरले आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

रंग खाणे धोकादायकच!
हळदीचा उपयोग भारतीय स्वयंपाकघरात प्रत्येकवेळी केला जातो. स्वयंपाक करताना कोणत्याही पदार्थाचा विपरित परिणाम होऊ नये, म्हणून याचा वापर केला जातो. पॉपकॉर्न करतानाही हेच अपेक्षित असते; पण हळदी ऐवजी जर रंग टाकला जात असेल, तर ते सर्वांच्या प्रकृतीसाठी गंभीर धोकादायक आहे.
- अनघा तेंडोलकर, आहारतज्ञ

- पॉपकॉर्न पिवळे करण्यासाठी कपड्यांचा रंगाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कांदिवली मुंबई येथे स्थित असलेल्या या कंपनीने मात्र हा रंग खाण्यास अपायकारक असल्याचे म्हटले आहे; पण १५0 रुपयांत तब्बल १00 किलोपेक्षा जास्त पॉपकॉर्न पिवळे करीत असल्यामुळे विक्रेत्यांना यात अधिक मार्जीने मिळत आहे. म्हणूनच आता स्मार्ट मम्मींनी याकडे वेळेत लक्ष देणे आणि घरातील ज्येष्ठांना दक्ष करणे आवश्यक बनले आहे.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

1 comment:

ad