व्यसनाच्या आहारी जाणे आणि त्यानंतर व्यसनाच्या आधीन होणे हे मानसिक कमकुवतपणाचे लक्षण आहे. मग ते कुठलेही व्यसन असो.
व्यसन या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट अपरिहार्यपणे करत राहावी लागणे. ती करत असताना विशेष आनंद होतोच असे नाही; पण ती केली नाही तर विलक्षण अस्वस्थता, कासाविशी आणि परिणामी दुःख होतेच होते. व्यसनाच्या आधीन गेलेल्याला त्यापासून वंचित राहिल्यामुळे मानसिक व नंतर शारीरिक त्रास होऊ लागतो. तो टाळण्यासाठी तो सतत व्यसनाच्या गुंगीमध्ये राहतो.
तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट (निकोटिन), दारू (अल्कोहोल) पासून मारिजुआना अर्थात हशीशसारख्या अमली पदार्थांचे व्यसन तरुण वयापासून सुरू होते. सुरवातीला मित्रांच्या संगतीचा परिणाम होऊन एक क्रेझ म्हणून किंवा तथाकथित यशस्वी सिनेतारकांची नक्कल म्हणून ही गोष्ट आयुष्यात शिरते. बेसावधपणात त्याची पाळेमुळे खोलवर रुजतात. खरे तर या सर्व व्यसनी पदार्थांचे सेवन हे आरोग्याला निर्विवादपणे घातक असते.
निसर्गात कुठलाही मनुष्येतर प्राणी या पदार्थाचे सेवन करू शकत नाही. शरीराला या पदार्थांची अजिबात गरज नसते. तरीही हे पदार्थ मनाला चटक लावतात. यांच्या सेवनाने होणाऱ्या विशिष्ट संवेदना सारख्या हव्याहव्याशा वाटू लागतात आणि माणसाचे मन त्यामध्ये अधिकाधिक गुरफटून जाते. व्यसनमुक्त राहण्यासाठी त्यापासून मुळातच लांब राहणे हे फार उत्तम. त्यासाठी लहानपणापासून मनावर झालेले संस्कार, आजूबाजूला नेहमी वावरणाऱ्या लोकांच्या सवयी, स्वास्स्थाविषयीची जागरूकता, भावनिक व्यसनरहित असणे हे सकस मानसिकतेचे लक्षण आहे.

नैतिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक पातळीवरची कारणे त्यामागे असतात. मुळातच व्यसनापासून लांब असलेल्याला व्यसनाधीन न होण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. खरा प्रश्न हा त्यामध्ये अडकलेल्यांचा असतो.
सिगारेट, गुटखा, दारू यापैकी कुठलेही व्यसन असलेल्या व्यक्तीला हे पदार्थ स्वास्थ्याला हानिकारक आहेत हे नक्की माहीत असते. त्याचा अनुभवही अधूनमधून येत असतो. तरीही ती गोष्ट सोडता येत नाही. "कळते पण वळत नाही' अशी स्थिती असते. अनेक जण दारू, सिगारेट सोडण्याचा वारंवार निश्चय करून, आपल्या जिवलगांना व्यसनमुक्त होण्याच्या आणाभाका देऊनही यातून बाहेर पडू शकत नाहीत. एकीकडे व्यसन वाढत जाते आणि त्याचबरोबर दुसरीकडे एखादी गोष्ट सोडू न शकल्याचे शल्य वाढत असते. त्यामुळे मनात खोलवर नैराश्य निर्माण होतं. निराशेच्या या गर्तेतून बाहेर येण्यासाठी मानसिक सामर्थ्याची गरज असते, आत्मविश्वास आणि जिद्दीची गरज असते.
दारूमुक्त होण्याची मनापासून इच्छा असणाऱ्यांना दारूमुक्ती केंद्रामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून मानसिक आधार दिला जातो. तसेच "ऍव्हरजन थेरपी' दिली जाते. त्यामध्ये "डायसल्फिराम'सारखी औषधे दिली जातात. या औषधांचे शरीरात जोपर्यंत अस्तित्व असते तोपर्यंत दारू प्राशन केल्यास प्रचंड शारीरिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे दारूपासून लांब राहण्यास मदत होते.

काही दिवस व्यसनमुक्त राहिल्यानंतर त्यापासून कायमचे मुक्त होण्यासाठी मात्र दीर्घकालीन निर्धारच लागतो. दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन करणारी व्यक्ती एका विशिष्ट क्षणाची वाट पाहत असतात. ज्या क्षणी त्यांना "किक बसते', त्या क्षणी मेंदूवर झालेल्या रासायनिक परिणामांमुळे त्यांचे वास्तवाशी असलेले भान सुटते. आयुष्यातल्या सर्व दुःखांचा काही काळासाठी विसर पडतो.
थोड्या काळासाठी एका आभासित जगतामध्ये मनाचा संचार असतो. त्याचे आकर्षण असल्यामुळेच माणसे दारूच्या आहारी जातात. कालांतराने तो क्षण येण्यासाठी लागणारी दारूची अथवा अमली पदार्थाची मात्रा वाढत जाते आणि शरीरावर त्याचे विघातक परिणाम होतात. कुठल्याही व्यसनातून खऱ्या अर्थाने मुक्त होण्यासाठी सजग आत्मपरीक्षणाची गरज असते. अनेक कलाकार मानसिक ताण कमी करण्यासाठी सिगारेट ओढत असतात.
वस्तुतः सिगारेट हे केवळ निमित्त (आणि स्टाइल) असते. ती ओढत असताना तणाव निर्माण करणारे विचार, भावना थांबतात अशी मनाची धारणा असते. ही धारणाच तणावमुक्तीचे काही क्षण देते; पण याची जाणीव न झाल्यामुळे सिगारेटमुळेच ताण कमी झाल्याचा आभास होतो. वास्तविकपणे सिगारेट पिताना मन दुसरीकडेच असते. आध्यात्मिक परिभाषेत हे सिगारेटचे आलंबन तोडणे गरजेचे असते. संपूर्ण जाणीव निर्माण झाल्याशिवाय सिगारेटचा फोलपणा कळणे अवघड असते. त्यासाठी झेन तत्त्वज्ञानात सांगितल्या जाणाऱ्या पुढील तंत्राचा वापर व्यसन खंडित करू शकतो.
पहिली गोष्ट - सिगारेट सोडण्याचे आश्वासन स्वतःला किंवा दुसऱ्याला देऊ नये. ते पाळता न आल्याने येणाऱ्या नैराश्यातून जास्त व्यसनाधीनता येते.
दुसरी गोष्ट - सिगारेट ओढताना पाचही इंद्रियांनी त्याचा परिपूर्ण आस्वाद घ्यायचा. बोटांना आणि ओठांना होणारा सिगारेटचा स्पर्श, जिभेला कळणारी चव, नाक, घसा आणि तोंडातून येणारा वास, डोळ्यांना दिसणारी धुराची वलये, कानाला ऐकू येणारा भुरक्याचा आणि लायटरचा आवाज संपूर्णपणे अनुभवायचा. त्या वेळी मन इतरत्र भरकटता कामा नये, विचाराधीन होता कामा नये.
तिसरी गोष्ट - सिगारेट ओढण्याची संपूर्ण प्रक्रया एखाद्या क्रियाकर्माप्रमाणे मनोभावे आणि संथपणे करायची. त्यामध्ये कुठेही घाई करायची नाही.
चौथी गोष्ट - प्रत्येक वेळी हाताला चटका बसेपर्यंत १००% सिगारेट ओढायची. थोटके टाकायची नाहीत.
पाचवी गोष्ट - कधीही सिगारेट ओढावीशी वाटली तरी वरील प्रकारेच ओढायची. ज्या दिवशी ओढावीशी वाटणार नाही त्या दिवशी ओढायची नाही; पण भविष्यात ओढणार नाही, अशी प्रतिज्ञाही करायची नाही. संपूर्ण जाणीवेत केलेल्या कृतीने कुठल्याही पदार्थाची आसक्ती हळूहळू कमी होते.

माणूस सिगारेट सोडत नाही तर सिगारेटच माणसाला सोडते. या सोडण्यात सक्ती नसते, सोडण्याचे ओझे नसते. स्वतःच्या अनुभवाने येणाऱ्या परिपक्वतेने ते सहज घडून जाते.
हेच तंत्र इतर पदार्थांनाही लागू पडते. दारूच्या बाबतीतही हे सर्व नियम लागू केले आणि पहिली किक बसल्यावर थांबले, की दारूवरचे प्रेम आटोक्यात राहून कालांतराने त्यापासूनही स्वतंत्र होता येते. मुळात व्यसन ही मानसिक गुलामगिरी आहे. चांगल्या गोष्टीचेही व्यसन जडू शकते.

सतत काम केल्याशिवाय राहू न शकणाऱ्यांना वर्कोहोलिक संबोधले जाते. निवृत्तीनंतर स्वस्थ बसण्याचा त्यांना खूप त्रास होऊ शकतो. टी.व्ही. चे व्यसन तर थोड्या-अधिक प्रमाणात प्रत्येकालाच असते. त्यात ऊर्जेचा आणि वेळेचा भरमसाट अपव्यय होतो. आनंद, स्वस्थता मिळविण्यासाठी सतत काहीतरी करावे लागणे ही खरी समस्या आहे. त्या करण्याने स्वतःचे व इतरांचे नुकसान न होणे सर्वांत महत्त्वाचे आहे.
- डॉ. हिमांशु वझे
No comments:
Post a Comment