Friday, March 20, 2009

सकारात्मक संवादासाठी प्राजित

"मन'' ही देवानं माणसाला दिलेली मोठी देणगी आहे. मन विचार करतं. म्हणून बोलूही शकतं. मनाचा मनाशी सतत संवाद चालू असतो. संवाद सकारात्मक असेल तर मन आनंदी राहू शकतं. पण, संवाद नकारात्मक असेल तर सगळं बिनसतं. समाजात मिसळू नयेसं वाटणं, उदासपणा, नैराश्‍य, काहीच करू नयेसं वाटणं, चिडचिडेपणा वगैरेंसारखे मानसिक रोग मनात ठाण मांडून बसतात. यातून बाहेर येण्यासाठी योग्य दिशेने विचारात बदल करणं आवश्‍यक असतं. हा बदल करत-करत मानसिक आरोग्याकडे वाटचाल करता यावी म्हणून आमचा "प्राजित - स्वमदत गट'' काम करतो. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके या गटाचं संयोजन करतात.
नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात रविवारी सकाळी दहा ते साडेबारा पर्यंत गटाची सभा असते. यामध्ये एक तास डॉ. लुकतुके यांचं मासनिक आरोग्य या विषयावर व्याख्यान असतं. त्यानंतर चहापान, शुभार्थींचं अनुभवकथन, त्यावर डॉक्‍टरांचं मत आणि विश्‍लेषण असतं.
दर मंगळवारी सायंकाळी साडेसात ते पावणेनऊपर्यंत निवाराच्या छोट्या सभागृहात अभ्यासगट चालतो. त्यात मानसिक आरोग्यावरची चांगली पुस्तके वाचून त्यावर चर्चा होते.
दर गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळात व्यक्तिगत अनुभवांची देवाणघेवाण होते. गटातले जाणते शुभार्थी अधिक विवेचन करून स्वतःमध्ये बदल कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन करतात.
ग्रूपमध्ये बोलण्यापेक्षा एखाद्या नवीन शुभार्थीला जाणत्या शुभार्थीशी बोलावेसे वाटले तर तसे व्यक्तिगत मार्गदर्शनही मिळू शकते. वर्षीतून तीन-चार वेळा गटातल्या शुभार्थींच्या नाट्यछटा, गाणी, नकला वगैरेंवर आधारित करमणुकीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे शुभार्थींचा आत्मविश्‍वास वाढून त्यांच्यामधल्या निद्रिस्त गुणांना वाव मिळतो.
हा उपक्रम व्यावसायिक नाही. परंतु, सभागृहाचे भाडे आणि इतर खर्चासाठी काही मासिक वर्गणी शुभार्थींकडून घेतली जाते.
संपर्कासाठी...
विनया जोशी - 9766363405.
अरविंद - 9822759335.
शुभदा - 020-25439284.

- विनया जोशी

No comments:

Post a Comment

ad