Monday, June 16, 2008

मूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम

मूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम


(अभिजित मुळ्ये)
लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, "चांगल्या' कोलेस्टेरॉलची घटलेली पातळी यांसोबत हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात यांचा वाढीव धोका हे सारे घटक एकत्रितपणे असण्याला "मेटॅबोलिक सिन्ड्रोम' असे म्हटले जाते. अशा व्यक्तींना मूतखडा होण्याचा धोकाही अधिक असतो, असे काही अमेरिकी तज्ज्ञांनी म्हटले आहे. ........
या तज्ज्ञांनी २० वर्षांवरील १४ हजार ८७० अमेरिकी नागरिकांच्या आरोग्यविषयक सरकारी नोंदींचा अभ्यास केला. यापैकी फक्त पाच टक्के जणांमध्ये मूतखड्याचा धोका असल्याचे आधीपासून माहीत होते. "मेटॅबोलिक सिन्ड्रोम' मधील व्याधीसोबत हे प्रमाण तीन ते दहा टक्के एवढे वाढत असल्याचेही दिसून आले. त्यावरून "मेटॅबोलिक सिन्ड्रोम' आणि मूतखडा यांतील परस्परसंबंध लक्षात येतो, असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे. वजन नियंत्रणात ठेवण्याने "मेटॅबोलिक सिन्ड्रोम'मधील अनेक व्याधींवर नियंत्रण राखता येते, म्हणजेच त्याने मूतखड्यासारख्या व्याधीही चार हात दूर राखता येतील, असेही त्यांनी सुचविले आहे. तसेच, मूतखड्याचा त्रास असलेल्या मात्र एरवी निरोगी वाटणाऱ्या व्यक्तींनीही "मेटॅबोलिक सिन्ड्रोम'साठी तपासणी करून घेतली पाहिजे, असे अमेरिकन जर्नल ऑफ किडनी डिसीजेस या नियतकालिकात त्यांनी म्हटले आहे.

- अभिजित मुळ्ये

No comments:

Post a Comment

ad