Friday, October 3, 2008

आरोग्य सुभाषित

आरोग्य सुभाषित

मन-प्रसाद- सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रह- ।
भावसंशुद्धिरित्येतत्‌ तपो मानसमुच्यते ।।
... श्रीमद्‌भगवद्‌गीता १७-१६ .......
मनाची प्रसन्नता, मनाचा शांतभाव, मौन (परमेश्‍वराचे चिंतन करण्याचा स्वभाव), मनाचा निग्रह, अंत-करणाची पवित्रता या सर्वांना मानसिक तप म्हटले जाते.

श्रीमद्‌भगवद्‌गीतेत भगवंतांनी शारीरिक, वाचिक, मानसिक, सात्त्विक, राजसिक, तामसिक असे तपाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. सर्वांशी प्रेममय वागणूक असली, आचरण दुटप्पीपणाचे नसले तरच मन प्रसन्न व सौम्य राहू शकते. मौनाचा अर्थ काही न बोलणे असा मर्यादित नसून आत्मानंदात मग्न झाल्याने बकबक करण्याची गरज नसल्यामुळे आपोआप मौन साधले जाणे असा आहे. अर्थातच याला मनाचा निग्रह आवश्‍यक आहे. याचे पालन केल्याने अंत-करण पवित्र होऊन साधक आपल्या ध्येयाप्रत जातो.

संकलन - डॉ. सौ. वीणा तांबे

No comments:

Post a Comment

ad