Thursday, May 1, 2008

आरोग्य सुभाषित

आरोग्य सुभाषित

कालार्थकर्मणां योगा हीनमिथ्या।तिमात्रकाः ।
सम्यग्योगश्‍च विज्ञेयो रोगारोग्यैककारणम्‌ ।।
... वाग्भट .......
शीतोष्णादी काल, कायिक, वाचिक, मानसिक कर्मे यांचा वाजवीपेक्षा कमी वा जास्ती उपयोग करणे हेच रोग निर्माण होण्याचे मुख्य कारण होय आणि यांचा यथार्थ उपयोग करण्यातच आरोग्याचे बीज दडलेले आहे.

आरोग्यसंपन्न जीवनासाठी काय काय करायला पाहिजे, याबद्दल अनेक माध्यमांद्वारे अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण त्यातील किती गोष्टी किती जण किती प्रमाणात आचरणात आणतात हा संशोधनाचा विषय आहे. आजचे जीवन गतिमान झाले आहे, मनापासून काही करायला वेळच नाही अशा अनेक सबबी काढल्या जातात व अनैसर्गिक जीवनशैलीचा वर्षानुवर्षे आधार घेतला जातो, मग त्यातून आनुवंशिक रोग, वंध्यत्व वगैरे काही समस्या उद्‌भवल्या, तर हा वर्षानुवर्षे आपल्याच आहार-आचरणात झालेल्या चुकांचाच हा परिपाक आहे हे सत्य स्वीकारले जात नाही तर नशिबाला दोष लावला जातो.

संकलन - डॉ. वीणा तांबे

No comments:

Post a Comment

ad