Sunday, February 27, 2011

लठ्ठपणा व वंध्यत्व


---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog


आपल्या शरीरात असणाऱ्या ऊर्जेचा क्रय आणि विक्रयशी जवळचा संबंध असतो. अतिरिक्त साठलेली चरबी ही बिघडलेल्या मेटाबोलिजमचा परिणाम आहे. त्यातूनच मेटाबोलिजमशी संबंधित अनेक विकार जन्माला येतात. जसे, मधुमेह, उच्च रक्तदाब, वंध्यत्व इत्यादी. सुदैवाने शास्त्रोक्त पद्धतीने घेतलेल्या उपचार पद्धतीमुळे मेटाबोलिजम संपूर्ण नॉर्मल होऊ शकते आणि वरील व्याधी टाळता येतात. 
डॉ. जयश्री तोडकर
लॅप्रोस्कोपिक आणि बॅरिऍट्रिक सर्जन, पुणे.
वं ध्यत्व, अर्थातच इन्फर्टिलिटी ही वैवाहिक जीवनात तणावग्रस्त करणारी मोठी समस्या होऊ लागली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये या विषयातील उपचार पद्धती खूप विकसित झालेल्या आहेत, तरीसुद्धा या समस्येचे स्वरूप दिवसेंदिवस उग्र झालेले दिसते. यासाठी स्त्री किंवा पुरुष किंवा दोघांनाही उपचाराची गरज भासू शकते. ही केवळ शारीरिक समस्या नसून, तिला सामाजिक स्वरूपही आहे. स्त्री अथवा पुरुष यांच्या प्रजनन क्षमतेवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. कामाचा ताण, एकमेकांसाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून न देणे, या गोष्टींवर नियंत्रण आणणे शक्‍य असते. गायनाकॉलॉजिस्ट किंवा ऍण्ड्रोलॉजिस्ट यांच्याकडून प्राथमिक तपासण्या व उपचार झाल्यानंतर अनेक वेळा रुग्णांना प्रथम वजन आटोक्‍यात आणा, हा सल्ला दिला जातो. अतिरिक्त वजनाचा व प्रजनन क्षमतेचा एकमेकांशी काय संबंध, या विषयावर आपण सविस्तर चर्चा करू या.

अतिरिक्त लठ्ठपणामुळे स्त्री अथवा पुरुष यांच्यामधील हार्मोन्स अनियंत्रित होऊन सशक्त बीजांड तयार होण्यासाठी अडथळा निर्माण होतो. आशियाई स्त्रियांच्या कंबरेचा घेर (भारतीय) 80 सेंटिमीटर व पुरुषांच्या कंबरेचा घेर 90 सेंटिमीटर असेल तर ते लठ्ठपणाने ग्रासले आहेत, असे आपण म्हणू शकतो. लठ्ठपणा मोजण्याचे शास्त्रीय प्रमाण अर्थातच बॉडी मास्क इंडेक्‍स म्हणजे व्यक्तीचे किलोग्रॅममधील वजन आणि मीटर स्केलमधील उंची यांचे गुणोत्तर होय. सामान्य बीएमआय 25 च्या पुढे नसावे.

 वेगवेगळ्या वयोगटांत लठ्ठपणाची एक आजार म्हणून येणारी लक्षणे पुढीलप्रमाणे -1. वयात आलेल्या मुलींना नियमित मासिक पाळी न येणे.
2. अनावश्‍यक ठिकाणी केसांची वाढ होणे. जसे की, चेहरा, छाती, हनुवटी, ओठांच्या वर इत्यादी.

खूप वेळा या सर्व गोष्टींचे निदान पॉलिसिस्टीक ओवॅरिन डिसीज म्हणून होते आणि याचा अतिरिक्त चरबीशी निकटचा संबंध आहे. वाढत जाणाऱ्या वजनामुळे या अनियमिततेमध्ये फक्त भरच पडत जाते. स्त्रियांमध्ये हार्मोन्सचे प्रमाण व संतुलन बिघडते. परिणामी, गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्याचप्रमाणे प्रयत्नपूर्वक जरी गर्भधारणा झाली तरी नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यामध्ये अतिरिक्त लठ्ठपणा हा विविध कारणांनी धोकादायक ठरू शकतो. ती कारणे पुढीलप्रमाणे -
1. गरोदरपणामध्ये झालेला मधुमेह,
2. उच्च रक्तदाब

जागतिक संशोधनाच्या अहवालानुसार, शास्त्रोक्त पद्धतीने उपचार घेतल्यानंतर पुढच्या गर्भधारणेमध्ये उच्च रक्तदाबाचा विकार आणि त्या अनुषंगाने येणारे संभाव्य धोके हे संपूर्णपणे टाळता येऊ शकतात.

फक्त स्त्रियांमध्येच नव्हे, तर पुरुषांमध्येसुद्धा अतिरिक्त वजन हे तितकेच वंध्यत्वाला कारणीभूत ठरू शकते. वाढता कंबरेचा घेर, स्त्रियांसारखी होणारी स्तनांची वाढ यामुळे त्यांच्यात केवळ गंडच निर्माण होत नाही, तर ते शरीरातील वाढत्या फिमेल्स हार्मोन्स आणि कमी होत जाणाऱ्या मेल हार्मोन्सचे एक लक्षण असू शकते. स्त्री अथवा पुरुष- दोघांमध्ये अतिलठ्ठपणामुळे बदललेले हार्मोन्स हा मेटाबोलिजम (चयापचय) चा एक विकार आहे. या विकाराबाबत समजून घेणे आवश्‍यक आहे.

आपल्या शरीरात असणाऱ्या ऊर्जेचा क्रय आणि विक्रयशी जवळचा संबंध असतो. अतिरिक्त साठलेली चरबी ही बिघडलेल्या मेटाबोलिजमचा परिणाम आहे. त्यातूनच मेटाबोलिजमशी संबंधित अनेक विकार जन्माला येतात. जसे, मधुमेह, उच्च रक्तदाब, वंध्यत्व इत्यादी. सुदैवाने शास्त्रोक्त पद्धतीने घेतलेल्या उपचार पद्धतीमुळे मेटाबोलिजम संपूर्ण नॉर्मल होऊ शकते आणि वरील व्याधी टाळता तर येतातच, परंतु आलेल्या व्याधींपासूनही र्ीपान 11 वरून
संपूर्ण मुक्तता मिळविता येणे शक्‍य आहे. हार्मोन्समधील बिघडलेल्या संतुलनामुळे अति लठ्ठ व्यक्तींना फक्त आहाराचे नियंत्रण, व्यायामाचा अंतर्भाव यामुळे परिणामकारकरीत्या वजन घटविता येणे ही अतिशय अवघड गोष्ट ठरते, परंतु त्यासाठी निराश होण्याचे कारण नाही. बेरिऍट्रिक सर्जरी हा हार्मोन्समधील संतुलन परत आणण्याचा खात्रीशीर उपाय आहे. या उपचारानंतर अतिरिक्त वजनात घट तर होतेच, परंतु येथे सांगितलेली सर्व लक्षणे संपूर्णपणे नॉर्मल होतात. नियमित पाळी येणे, सशक्त बीजांड तयार होणे आणि बाह्य उपचारांची मदत न घेता नैसर्गिक गर्भधारणा होणे, हे फायदे होतात.
दुर्बिणीतून शस्त्रक्रिया असल्यामुळे शस्त्रक्रिया बिनटाक्‍याची होऊ शकते. हॉस्पिटलमध्ये दीड किंवा दोन दिवस राहावे लागते आणि डिसचार्जनंतर एक ते दोन दिवसांत तुमची दिनचर्या पूर्ववत सुरू होऊ शकते. शस्त्रक्रियेनंतर शक्‍यतो आठ ते दहा महिने रुग्णाला गर्भनिरोधक वापरण्याचा सल्ला दिला जातो. नंतर नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होऊन सुदृढ बाळ जन्माला येऊ शकते.

वंध्यत्वाच्या उपचारासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया
1. गॅस्ट्रिक बॅण्डिंग - यामध्ये जठराच्या भोवती एक बांगडीसारखी चकती बसविली जाते आणि आवश्‍यकतेनुसार ती घट्ट किंवा सैल करता येते.

2. स्लिव्ह गॅस्ट्रेक्‍टमी - यामध्ये आपोआपच भुकेवर नियंत्रण येते आणि विनासायास वजन नियंत्रणात येते. यात जठराला हॉकी स्टिकसारखा आकार दिला जातो.

3. गॅस्ट्रिक बलून - यामध्ये एंडोस्कोपीद्वारा एक फुगा पोटात सोडला जातो. ज्यामध्ये भूक आपोआपच मंद होते आणि वजन घटण्यास मदत होते. परंतु सहा महिन्यानंतर फुगा काढून टाकावा लागतो. कोणत्याही पद्धतीने उपचार केल्यास साधारण एक वर्षामध्ये 20 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत अतिरिक्त वजन कमी होऊ शकते. त्यानंतर गर्भधारणा होऊन बाळाची योग्य पद्धतीने वाढ होते. अशा पद्धतीने अनेक रुग्णांवर आम्ही उपचार केले आहेत. अनेक वर्षांची बाळ होण्याची आस पूर्ण झाल्यानंतर आई जेव्हा आपले बाळ कुशीत घेते, तेव्हा तिला झालेले आत्मिक समाधान जगातील कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त मोलाचे असते.

No comments:

Post a Comment

ad