Saturday, June 26, 2010

बेडरूम फक्त झोपण्यासाठी - भाग 3


घराच्या वीजप्रवाहाचं अर्थिग व्यवस्थित आहे याची अधूनमधून इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करा. अनेकदा अर्थिगची वायर तुटलेली असते. इंटेरियरसाठी आपण लाखो रुपये खर्च करतो. वायर कन्सिल्ड करणं, चकाचक स्वीच बसवणं आवर्जून करतो. पण चांगल्या क्वालिटीच्या अर्थिग प्लेट टाकण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात ही वस्तुस्थिती आहे.
बेडरूम आरोग्यदायी करण्यासाठी पुढे दिलेल्या टिप्स पाळाव्यात.१) शक्य होतील तितकी विजेवर चालणारी उपकरणं बेडरूममधून हटवावीत.  टीव्ही,  डेक, स्पीकर्स, कॉम्प्युटर, साईड लॅम्प, आन्सरिंग मशिन, कॉर्डलेस टेलिफोन बेडरूममध्ये ठेवू नयेत. अगदीच इलाज नसेल तर तुमच्या बेडपासून किमान सहा फूट अंतरावर ती राहतील याची काळजी घ्यावी. रात्री झोपताना ही उपकरणं अनप्लग करावीत. फक्त स्वीच ऑफ करून भागणार नाही. स्विच ऑफ केलेल्या उपकरणांतून विजेचा प्रवाह वाहत असतो. टीव्ही अनप्लग केल्यानंतरही धोकादायक असतो असं अमेरिकेतील बाऊ बायोलॉजिस्ट म्हणतात. म्हणून बेडरूममध्ये टीव्ही नकोच.
बेडच्या साईड टेबलवर कॉर्डलेस टेलिफोन ठेवणं ही लेटेस्ट फॅशन आहे. याच्यासारखं भयंकर काहीच नसेल. कॉर्डलेस अतिशय तीव्र स्वरूपाचे रेडिएशन सोडत असतो. साधारण चार फुटांच्या परिसरात ही तीव्रता आरोग्याला विनाशकारी ठरेल इतक्या प्रमाणात असते. रात्रभर तुमच्या डोक्यातून हे रेडिएशन्स अखंडपणे वाहात असतात. जे आरोग्यावर दूरगामी परिणाम करतात.
२) स्प्रिंगचा वापर केलेल्या मॅट्रेस वापरू नयेत. कापसाची गादी वापरावी.
३) धातू आणि मॅग्नेटिक फिल्ड यांचा थेट संबंध आहे. म्हणून धातूचे पलंग वापरू नयेत. ४)बेडरूममधील लोखंडी कपाटं, टाईपरायटर, लोखंडी रॅक कमी करता आल्या तर बरं.  मोटर गॅरेज किंवा लोखंडी सामानाच्या दुकानाच्या वर आपली बेडरूम असू नये असं बाऊ बायोलॉजी हे जर्मन शास्त्रं सांगतं.
५) पाण्याचा बेड वापरू नये.  इलेक्ट्रिक ब्लँकेट नको. मानवी शरीराचं नैसर्गिक व्होल्टेज एक मिलिव्होल्टपेक्षा कमी असतं. इलेक्ट्रिक ब्लँकेटमुळे तुम्ही ७६ हजार मिलिव्होल्टनं घेरले जाता.
६)पलंगाच्या खालून इलेक्ट्रिक वायर जाणार नाहीत याची खात्री करावी.
७) सिन्थेटिक कार्पेट, सिन्थेटिक वॉलपेपर, सिन्थेटिक उशा बेडरूममध्ये नकोत. प्लास्टिकच्या जितक्या वस्तू (लॅम्प शेड, शोपीस, अगदी लहान मुलांची खेळणीसुद्धा) बेडरूममधून हटवता येतील तितक्या हटवाव्यात. अमेरिकेतील एक संशोधक वोल्फगँग मायस यांच्या मतानुसार पॉली या शब्दानं सुरू होणाऱ्या मटेरिअलची (पॉलीमर, पॉलीस्टर, पॉलीथीन वगैरे) कोणतीही वस्तू बेडरूममध्ये ठेवू नये.
८) घराच्या वीजप्रवाहाचं अर्थिग व्यवस्थित आहे याची अधूनमधून इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करा. अनेकदा अर्थिगची वायर तुटलेली असते. इंटेरियरसाठी आपण लाखो रुपये खर्च करतो. वायर कन्सिल्ड करणं, चकाचक स्वीच बसवणं आवर्जून करतो. पण चांगल्या क्वालिटीच्या अर्थिग प्लेट टाकण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात ही वस्तुस्थिती आहे.
प्रगत देशांमध्ये डीमांड स्वीच किंवा कट ऑफ स्वीच नावाचं उपकरण मिळतं. (सोबत फोटो छापला आहे.) हे उपकरण उपकरण वापरात नसताना त्याचा वीजप्रवाह पूर्णत: तोडू शकतं. दुर्दैवानं आपल्याकडे हे स्वीच मिळत नाहीत. शिवाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक पेन्टही त्यांनी तयार केलेयत. या पेन्टचा  वापर बेडरूमच्या भिंतीवर केल्यास  ईएमआर पासून तुमचा नक्की बचाव होईल. जिज्ञासू वाचकांनी  या वेबसाईटला भेट देऊन अधिकची माहिती मिळवावी. किंवा ते स्वीच व   पेन्ट मागवून घेता आलं तर पाहावं.
९) रेडिओअ‍ॅक्टिव्ह स्मोक डिटेक्टर बेडरूममध्ये बसवू नका. त्यामुळे शांत झोप लागत नाही. पंचतारांकित हॉटेलच्या रूममध्ये हा अनुभव येतो. अमेरिकेतील संशोधक डॉ. जॉन ओट यांच्या संशोधनानुसार अशा डिटेक्टरच्या समोर ताजी फुलं ठेवली तरी लगेच सुकतात. नपुंसकत्वाचं ते कारण बनू शकतं.
१०) रात्री खिडक्या उघडय़ा ठेवाव्यात. शुद्ध हवा येण्याचा हा सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय आहे. रात्री  एसी लावून झोपण्याची सवय असणाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर खिडक्या उघडय़ा ठेवाव्यात. दिवस-रात्र खोली बंद ठेवणं चांगलं नाही. तिला मोकळा श्वास घेऊ द्या. बाहेरच्या वातावरणाशी, कॉस्मिक एनर्जीशी तिचं स्पंदन होऊ द्या.
११) बेडरूमच्या भिंतीला लागून बाहेरच्या बाजूनं विजेची उपकरणं असतील तर त्या भिंतीला खेटून पलंग ठेवणं टाळावं. लक्षात ठेवा की ईएमआर रेडिएशन काँक्रिट, विटा, लाकूड, धातू.. कशातूनही आरपार जातात. बेडरूमची एखादी भिंत शेजारच्या फ्लॅटला कॉमन असेल तर अशा भिंतीला खेटून पलंग ठेवणं टाळावं. कारण त्या बाजूला शेजाऱ्यानं कोणती उपकरणं ठेवली असतील ते आपल्याला माहीत नसतं. शिवाय त्या भिंतीत त्यानं इलेक्ट्रिक वायर कन्सिल्ड केलेली असू शकते.
संजय पाटील

---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad