रामायणातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे श्री मारुतीराय. श्रीमद्भगवद्गीतेत उत्तम भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. भक्तोत्तम कोण, याचा पुरावा देण्याची वेळ आली असता मारुतीरायांनी स्वतःची छाती फाडून त्यात श्रीरामांचे वास्तव्य आहे हे दाखविले. ज्या गोष्टीत राम नाही त्याला जगात काही स्थान नाही, ज्या मोत्याच्या कंठ्यात राम नाही त्याचे मला काम नाही. किंबहुना जेथे राम नाही तेथेच "काम' आहे. मारुतीरायांच्या हृदयात रामाचे वास्तव्य सतत असल्यामुळे त्याने कामावर विजय मिळविला व त्यामुळे त्यांना महावीर ब्रह्मचारी हे विशेषण प्राप्त झाले. जे मनात तेच डोळ्यात, जे मनात तेच हातात व जे मनात तेच वागणुकीत असते. एकदा का मनात श्रीराम स्थिरावले की सर्व इंद्रिये विश्राम पावतात म्हणजे त्याच्यातही श्रीरामांचा ठसा उमटतो. समर्थ रामदासांनीही मनाच्या श्लोकात म्हटले आहे, "मुखी राम विश्राम तेथेचि आहे'. साहजिकच त्या ठिकाणी कुठलाही मानसिक ताण नसतो व कुठलाही प्रज्ञापराध नसतो. अशा वेळी केलेली प्रत्येक कृती श्रीरामार्पण होऊन कर्मबंधन निर्माण होत नाही.
ब्रह्मचर्य दोन्ही बाजूंनी समजून घ्यावे लागेल. चैतन्य, जाणीव म्हणजेच ब्रह्म म्हणून जाणिवेला अनुसरून जो वागतो, राहतो, जगतो तो ब्रह्मचारी. सर्व जगताच्या गाभ्याचे एकच सत्य आहे व ते म्हणजे श्रीराम. म्हणून आतून येणारे उत्तर "अहं ब्रह्मा।स्मि' असेच असते. जो स्वतःच्या अंतःप्रेरणेला, संपूर्ण ब्रह्माडातील व्यक्तिगत ब्रह्मचैतन्याला म्हणजेच निसर्गाला व सर्वांभूती असलेल्या परमेश्वराला स्मरून कार्य करतो तो ब्रह्मचारी. दुसरे म्हणजे ज्याने कामावर विजय मिळविला तोही ब्रह्मचारीच.
केवळ स्त्री-पुरुषाच्या मिलनाशी ब्रह्मचर्याचा संबंध नसावा. मेंदूत असलेल्या हृदयग्रंथीच्या ठिकाणी सर्व शक्ती एकवटण्याच्या केलेल्या प्रयत्नालाच ब्रह्मचर्य असे म्हटलेले आहे. मेंदूला व हृदयाला ओजाची पूर्ती होणे आवश्यक असते. मेंदूला वा हृदयाला ओज पुरेशा प्रमाणात न पुरवता शक्ती अधोगामी करून वीर्यरूपाने विसर्जित केली गेली तर ही कृती ब्रह्मचर्याच्या विरोधी समजली जात असावी. म्हणूनच शक्तीचा क्षय वा अपव्यय न करता शक्ती सत्कारणी लावणे, तिला जाणिवेपर्यंत पोचविणे व निसर्गचक्राला धरून चालणे याला ब्रह्मचर्य म्हटलेले असते.
ब्रह्मचर्याचा महिमा मोठा आहे. आयुर्वेदानेसुद्धा सांगितले आहे की त्रिदोष, मल व अग्नी संतुलित असताना शक्तीचे रूपांतरण सप्तधातूत होऊन शेवटी शक्ती वीर्य अवस्थेपर्यंत पोचते. या वीर्याचे सूक्ष्म शक्तीत रूपांतरण होऊन ती शक्ती ओजरूपाने हृदय व मेंदूला मिळते. याच शक्तीमुळे सर्व इंद्रियव्यापार चालतात. या दृष्टीने पाहिले असता ब्रह्मचर्य व वीर्य यांचा कुठेतरी संबंध आहेच. शरीरातील सर्व दोष, धातू, अग्नी, मल हे संतुलित असताना मन प्रसन्न होऊन ते आतील आत्मारामाला संपूर्ण शरण राहू शकते व त्याचवेळी समाधान व शांतीचा अनुभव येतो. म्हणूनच साहजिकच वीर्यनाश हा दोष समजून ती ब्रह्मचर्याच्या आड येणारी एक घटना आहे असा ब्रह्मचर्य शब्दाचा लौकिक अर्थ लावला गेला असला तर नवल नाही.
"ब्रह्मचर्य हेच जीवन' असे श्री शिवानंद स्वामींनी म्हटले आहे. वीर्याच्या एका थेंबाचासुद्धा नाश करू नये असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. हे वाक्य समजून घेत असता "नाश करणे' या संकल्पनेविषयी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. झाडावरून फळे काढणे म्हणजे फळांचा नाश नव्हे. या फळांचा मुरांबा वा भाजी करणे म्हणजे फळांचा नाश नव्हे. फळांपासून बनविलेले अन्न खाणे म्हणजे अन्नाचा नाश होणे, असे आपण म्हणत नाही. अन्नाचे शक्तीत रूपांतरण झाले नाही वा ज्याने अन्न खाल्ले त्याचे जीवन ताणपूर्ण व दुःखमय होऊन जीवन नकोसे झाले तर मात्र अन्नाचा नाश झाला असे म्हणता येईल. या व्याख्येप्रमाणे नैसर्गिक रीतीने व आवश्यक धातू म्हणून सहजतेने वीर्याचा वापर झाल्यास ब्रह्मचर्य मोडले असे समजता येणार नाही.
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळ्या ताकदीची असते त्यामुळे नैसर्गिक व साहजिक म्हणजे काय हे ठरविताना गोंधळ होऊ शकतो. यासाठी वेगवेगळ्या पातळीवरचे जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शक्तीची पूर्ती होऊन उरलेली शक्ती इतर मार्गासाठी वापरली गेली तर त्याला काही समस्या असू नये.
शरीरातील सर्व इंद्रियात व एकूणच सर्व जीवनात जर "राम" शिल्लक ठेवता आला तर "काम" वर्जित ठरविण्याचे कारण नाही. ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्याने मुळात वीर्यवर्धन होईल असा आहार करावा. जिभेवर "राम' असला की खाण्याच्या बाबतीतले जिभेचे चोचले कमी होतात. जे अन्न सकस नाही, ज्या अन्नात वीर्य नाही म्हणजेच ज्या अन्नात राम नाही ते अन्न स्वीकारू नये. तेव्हा योग्य आहार-विहार ठेवून बाह्य जगतात सर्वांभूती बाळगावे प्रेम व अंतरात्म्यापर्यंत पोचण्यासाठी मनातील काम विसर्जित करून शांततेचा अनुभव घेणे आवश्यक ठरते.
ब्रह्मचर्याची उपासना करत असताना अनेक प्रश्न उत्पन्न होतात. मुलगा वा मुलगी वयात आली असता कामशक्ती जोर धरू लागते. अशा वेळी शरीरात तयार होणाऱ्या वीर्यापैकी बाहेरच्या उत्तेजनेमुळे जागेपणी सहजगत्या, मुद्दामहून वा स्वप्नात वीर्य स्खलित होऊ शकते. ही घटना पुरुष किंवा स्त्री या दोघांच्या शरीराच्या बाबतीत घडू शकते. अशा घटनांमुळे शरीरातील शक्ती कमी पडून दैनंदिन व्यवहार करण्यात अडचण उत्पन्न होत नसेल तेव्हा अशी क्रिया साहजिक म्हणावी, पण असे वारंवार घडू लागले तर शरीरातील अग्नीचे संतुलन बिघडून ब्रह्मचर्य पाळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून वीर्यशक्तीचा योग्य वापर योग्य वेळी केला तर ब्रह्मचर्याला बाधा येऊ नये.

सतत झालेला किंवा केलेला वीर्यस्राव चांगला नव्हे. यामुळे पुरुषांना पुढे आयुष्यात लैंगिक समस्या येऊ शकतात. तसेच स्त्रियांच्या बाबतीत नेहमी अंगावर पांढरे जाण्याने पाळीचे, गर्भाशयाचे वा हाडे पोकळ होण्याचे त्रास होऊ शकतात. स्त्री-पुरुष आकर्षण नैसर्गिक आहे व वीर्यउत्तेजना पण साहजिक आहे. त्याला मुद्दाम उत्तेजना दिली तर ते ब्रह्मचर्यपालनाच्या विरुद्ध समजले जावे.
ब्रह्म हे सर्वव्यापी आहे व म्हणून ब्रह्मचाऱ्याने ज्ञानोपासना करावी. त्याबरोबरच सर्वांभूती ब्रह्म पाहण्याच्या संकल्पनेनुसार आपपरभाव न ठेवता सर्वांभूती सारखेच प्रेम अनुभवावे म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन होऊ शकेल. समर्थ श्रीरामदास स्वामींनी "काम' व "राम' याविषयी मनाच्या श्लोकांमध्ये बरेच मार्गदर्शन केलेले दिसते.
राम त्या काम बाधू शकेना
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ।
हरीभक्त तो शक्त कामास मारी
जगी धन्य तो मारुची ब्रह्मचारी ।।
सकाळी उठून प्रथम श्रीरामांचे चिंतन करावे व कामविसर्जनासाठी मुखी सतत राम नाम असावे.
- डॉ. श्री. बालाजी तांबे

This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete