अश्विन महिन्यातील द्वादशी म्हणजे गुरुद्वादशी. याच दिवसाला म्हणतात वसुबारस. गोठा साफ करून त्यात हव्या असलेल्या सुधारणा करून, गुरे स्वच्छ करून, गोठ्यात धूप जाळून वसुबारसेच्या दिवशी गोठ्यात सवत्स गाईची पूजा केली जाते. परंतु, अशा रीतीने फक्त एक दिवस गोठा स्वच्छ ठेवला तर काम भागेल का? गुरे म्हणजे कुटुंबातील एक घटक आहे असे समजून त्यांच्याकडे पूर्वीच्या काळी लक्ष दिले जात असे. गुरांना जेथे ठेवत ती जागाही भरपूर मोठी असे. गलिच्छ गोठे क्वचित प्रसंगीच पाहायला मिळत असत. परंतु माणसाचा आळस व लोभ वाढल्याने कमी जागेत अधिक गुरे ठेवली गेल्याने गोठ्यात स्वच्छता राहीनाशी झाली.
ही सर्व चर्चा कशासाठी, तर क्षय हा रोग संसर्जजन्य असून तो गुरांकडून येतो असे समजले जाते. पूर्वीच्या काळी क्षय हा एक जीवघेणा आजार होता, पण गेल्या काही वर्षात क्षयावरच्या रोगांवरचे संशोधन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हा रोग काही अंशी आटोक्यात आलेला आहे.
तरीही भारतात दरवर्षी सुमारे 18 ते 20 लाख लोकांना क्षयाची लागण होते असे म्हणतात. माहीत नसलेल्या गोष्टीला गणितात क्ष किंवा य (क्षय) अशी संज्ञा देतो. परंतु या रोगाची आता पूर्ण माहिती झालेली आहे. त्याला क्ष-य म्हणण्याचे कारण उरलेले दिसत नाही. पूर्वीच्या काळी त्याला बरोबर उलटे म्हणजे यक्ष्मा किंवा राजयक्ष्मा का म्हणत असत हेही कळायला मार्ग नाही. "य' धातूने वायुतत्त्वाचा बोध होतो फुप्फुसात वायूतत्त्वचा संचार कमी झाला की क्षय असे नाव पडले असावे.
या रोगाला राजयक्ष्मा, क्षय, टी.बी. असे काहीही म्हटले तरी हा रोग जीवघेणा व दीर्घकाळ चालणारा खराच. हा रोग म्हणजे फुप्फुसांचा रोग असे सर्वसाधारण समजले जात असले तरी तो शरीरात इतर ठिकाणीही होऊ शकतो. याचा प्रादुर्भाव झाला असता बऱ्याच वेळा छोट्या गाठी येऊ शकतात, लहान आतड्यात, मूत्रपिंडाच्या ठिकाणी, हाडांच्या ठिकाणी, जननेंद्रियांच्या ठिकाणी हा रोग झालेला दिसतो. तो उग्र झाला तर एकाहून अधिक अवयवांना लागण होते व रोग्याकडून इतरांनाही संसर्ग झालेला दिसतो. हा आजार संसर्गजन्य आहे. झालेला रोग बरा करण्यासाठी, रोग साथीने पसरू नये व एकूणच प्रतकारशक्ती वाढवण्यासाठी धूमचिकित्सेचा खूप उपयोग होतो.
सकाळ-संध्याकाळ घरात विशिष्ट द्रव्यांचा धूप (उदा. संतुलन प्युरिफायर धूप) नित्यनियमाने जाळण्याने रोगांचे जंतू पसरू नयेत म्हणून खूप उपयोग होतो. पूर्वी मोठ्या प्रमाणावर यज्ञ, याग वगैरेंद्वारे निर्जंतुकरण व निसर्ग संतुलन साधत असते.
रात्री बरेच दिवस खोकला येत असला, खोकल्याची उबळ आल्यावर सारखे उठून बाहेर थुंकायला जावे लागत असले तर क्षयाची शंका घेतली जात असे. सारखे सारखे उठून बाहेर जायला लागू नये म्हणून ठेवलेली पिकदाणी व्यवस्थित बंद केली नाही, खोकताना अत्यंत काळजी घेतली नाही तर थुंकीवाटे उडालेले क्षयाचे जंतू वातावरणात तरंगत राहतात इतरांना क्षयाची लागण करू शकतात. ज्यांची प्रतकारशक्ती उत्तम आहे त्यांना क्षय होत नाही.
शरीरात प्रतकार करणाऱ्या पेशींचे सैन्य कधीही कमकुवत होता कामा नये हे क्षयरोगाच्या प्रतकारासाठी लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे. मधुमेहाचे रोगी, यकृताचे काम नीट न चालणाऱ्या व्यक्ती, एड्स असलेल्या व्यक्तीची प्रतकारशक्ती कमी होऊ शकत असल्याने त्यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते. तसेच कर्करोगी वा दीर्घकाळपर्यंत कॉर्टिझोनसारखे औषध घेतलेले रोगी यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते असे म्हणतात. गलिच्छ जागी राहणारे, झोपडपट्टीत राहणारे, फूटपाथवर राहणारे, तुरुंगासारख्या कमी जागेत खूप गर्दीत राहणारे या सर्वांना क्षयाची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा अशा गोष्टी टाळणे आवश्यक असते.
क्षयरोगाचा प्रथम मारा फुप्फुसांवर होत असल्याने अति धूम्रपान वा अति मद्यपान करून फुप्फुसे कमजोर झालेल्यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते. क्षयाचा इलाज करत असणारे परिचारक वा डॉक्टर्स यांनाही लागणीपासून बचावण्यासाठी काळजी घ्यावी लागते.
थोडासा तप व बरोबर खूप दिवस चाललेला खोकला, थुकींचे बेडके पडणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करून योग्य सल्ला न घेतल्यास त्रास होण्याची शक्यता असते. केवळ गरीब वा गलिच्छ वस्तीत राहणाऱ्यांनाच नव्हे तर अनेक श्रीमंत मंडळीही क्षयाला बळी पडल्याचा इतिहास आहे.
सिक ताणामुळे शरीर खालावलेले असले व त्यावरचा मानवरचा अधिकार कमी झालेला असला तरीसुद्धा क्षयाची लागण होऊ शकते. राजयक्ष्मा असे याचे दुसरे नाव आहे म्हणजे हा रोग राजांना होतो असे नव्हे तर तो सर्व रोगांचा राजा असल्यासारखा असल्याने व त्यावर ताबडतोब इलाज करणे अपेक्षित असल्याने त्याला राजयक्ष्मा म्हटले गेले असावे.
क्षयरोगाच्या तपासणीसाठी थुंकीच्या तपासणीबरोबर छातीचा एक्स रे काढणेही आवश्यक असते. भारतासारख्या ठिकाणी क्षयरोगाचा खूप प्रसार झालेला दिसतो. प्रत्येकाला लहानपणीच क्षयावरची लस टोचलेली असल्याने प्रतकारशक्ती असते पण क्षयाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यास ते कुठेतरी कमकुवत ठिकाणी दबा धरून राहतात व वेळप्रसंगी बाहेर येऊन व्यक्तीवर घाला घालतात. म्हणून जंतू शरीरात शिरल्याचे खूप दिवसांपर्यंत कळून येत नाही. त्यामुळे चांगल्या परिस्थितीतील सर्वसामान्यालाही हा रोग होऊ शकतो. तसेच क्षयरोगाचे जंतू अति हुशार असल्याने इलाज सुरू केल्यावर रोग बरा झाल्याची लक्षणे उत्पन्न होतात पण जंतू मात्र दुसरीकडे जाऊन लपून बसतात व वेळप्रसंगी डोके वर काढून रोग वाढवितात. खोकला झालेल्या प्रत्येकाला वा तसेच कफ बाहर पडलेल्या प्रत्येकाला क्षयरोग असतो असे नसते. पण बेडक्यात हलके हलके रक्त दिसायला लागले तर मात्र क्षयाची चिकित्सा करणे नक्की आवश्यक ठरते.
क्षयरोगाच्या औषधांमुळे इतर त्रास झालेले दिसल्यास दिलेली औषधे बदलणे व एकूणच इलाजदपद्धती बदलणे आवश्यक असते. पचनाचा वा अंग दुखण्याचा त्रास दिसल्यास क्षयाचा संशय घेऊन त्यावरचा इलाज सुरू करण्यात येतो पण रुग्णाला आराम न वाटता औषधांचा दुष्परिणाम झालेला दिसतो. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य ते उपचार करणे आवश्यक असते. तसेच क्षयरोग पूर्णपणे बरा झाल्याचे तपासणीत आढळत नाही तोपर्यंत नीट औषधोपचार व पथ्ये पाळणे आवश्यक असते.
क्षयाच्या रोग्याला घरात ठेवूनच उपाययोजना करता येते परंतु त्याच्या थुकींची विल्हेवाट नीट लावणे आवश्यक असते. त्याने वापरलेले कपडे, आजूबाजूची जागा फिनेलसारखे द्रव्य वापरून निर्जंतुक करणे आवश्यक असते. सध्या क्षयावर मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन औषधे सापडलेली असली तरी मुळात क्षयाची लागण होऊ नये यासाठी काळजी घेणे अधिक महत्त्वाचे असते.
क्षयाचा आजार होऊ नये असे वाटत असणाऱ्यांनी स्वच्छतेचा मंत्र पाळणे, प्रकृतीनुरूप योग्य प्रमाणात पौष्टिक व पूरक आहार घेऊन प्रतिकारशक्ती वाढवणे, आहारात दूध, फळे पालेभाज्या वगैरेंचा समावेश करणे, मैथुनात शरीरशक्तीचा अतिव्यय होणार नाही याकडे लक्ष ठेवणे, धूम्रपान, मद्यपान टाळणे आवश्यक असते. आयुर्वेदानुसार डिंकाचे लाडू, "संतुलन मॅरोसॅन', "संतुलन शांतीरोझ'' किंवा "संतुलन आत्मप्राश'सारखे रसायन सेवन करण्याने प्रतिकारशक्ती चांगली राहून क्षयरोगाचा यक्षप्रश्न सोडविता येईल.

- डॉ. श्री. बालाजी तांबे
No comments:
Post a Comment