Wednesday, September 10, 2008

रजोनिवृत्तीच्या त्रासावर योगोपचार

रजोनिवृत्तीच्या त्रासावर योगोपचार

(अभिजित मुळ्ये) रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांना जाणवणारे "हॉट फ्लशेस'सारखे त्रास योगोपचारांच्या साह्याने दूर होऊ शकतात, तसेच त्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतांवरही अनुकूल परिणाम दिसून येतो, असे बंगळूरू येथील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. ......."ब्रिटीश जर्नल ऑफ ऑब्स्टॅट्रिक्‍स अँड गायनॅकॉलॉजी' या नितयकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. योगाभ्यासामुळे स्नायूंवरील नियंत्रण वाढते आणि तणावमुक्ती साधता येते. त्याने मानसिक तणावाच्या हानीकारक परिणामांपासून मुक्तता मिळते. हे गृहितक तपासून पाहण्यासाठी या संशोधकांनी ४० ते ५५ या वयोगटातल्या रजोनिवृत्तीला सामोऱ्या जाणाऱ्या १२० स्त्रियांच्या गटाकडून दोन महिने साध्या तणावाच्या योगक्रिया करून घेतल्या. या स्त्रियांना मानसिक तणावमुक्तीसाठी योगाच्या उपयोगावरील व्याख्यानेही ऐकविण्यात आली. याच काळात याच वयोगटातल्या महिलांच्या अन्य एका गटाला आहार आणि मानसिक तणावमुक्ती यावरील व्याख्याने ऐकविण्यात येत होती. दोन महिन्यांच्या काळात योगक्रिया करीत असलेल्या महिलांमध्ये रजोनिवृत्तीशी संबंधित त्रास कमी होण्याचे प्रमाण अधिक होते, असे दिसून आले. स्मरण आणि एकाग्रतेच्या चाचण्यांमध्येही या गटातील स्त्रिया अधिक उजव्या होत्या असे दिसून आले.

No comments:

Post a Comment

ad