आरोग्याची काळजी लग्न ठरल्यावर नव्हे, तर "उपवर' वयापासूनच घ्यायला हवी. मुलगा-मुलगी या दोघांचेही आरोग्य जितके चांगले, तितके लग्नानंतरचे सहजीवन सोपे असणार, हे वेगळे सांगायची गरज नाही. आज आपण हरतालिकेच्या निमित्ताने "उपवर' वयातील मुलीने आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याची माहिती घेणार आहोत.
उपवर म्हणजे विवाहयोग्य, लग्नासाठी तयार. लग्न ठरले, की लग्नाची तयारी, धावपळ हे सगळे जोरात सुरू होते. लग्नाचा समारंभ सुखरूप पार पडावा म्हणून घरातील प्रत्येक जण आपापल्या परीने झटत असतो; मात्र या सगळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, त्यातही स्वतः नवऱ्या मुलीने तर आरोग्यासाठी खूपच दक्ष राहणे आवश्यक असते.
अर्थात आरोग्याची काळजी लग्न ठरल्यावरच नाही तर "उपवर' वयापासूनच घ्यायला हवी. मुलगा-मुलगी या दोघांचेही आरोग्य जितके चांगले, तितके लग्नानंतरचे सहजीवन सोपे असणार, हे वेगळे सांगायची गरज नाही. आज आपण हरतालिकेच्या निमित्ताने "उपवर' वयातील मुलीने आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याची माहिती घेणार आहोत.
"उपवर' वयात मुलीला सौंदर्य सर्वांत अधिक हवेहवेसे वाटणे स्वाभाविक आहे. पण खऱ्या सौंदर्याला आरोग्याची जोड असणे आवश्यक असते. मेक-अपच्या साह्याने त्वचेवर उसना उजळपणा आणता आला, तरी उपवर वयात आणि लग्नानंतरही त्वचेची सतेजता, लवचिकता, घट्टपणा, मृदुता या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. एखाद्या दिवशी केसांची स्टाइल करता आली तर एरवी रेशमी, निरोगी केसच खरी साथ देणार असतात. डोळे, नखे, ओठ या सर्वच गोष्टी सजवता आल्या तरी मुळात निरोगी असाव्याच लागतात. त्यासाठी "उपवर' वयापासून स्वतःकडे लक्ष देणे भाग असते.
सौंदर्यासाठी महत्त्वाच्या अशा शरीर अवयवांच्या आरोग्याची जोपासना कशी करावी, हे थोडक्यात याप्रमाणे सांगता येईल. मुलगा व मुलगी या दोघांनाही पुढील उपचारांचा फायदा होईल.
1. त्वचा - आयुर्वेदाने त्वचेला हितकर अशी "वर्ण्य' द्रव्ये सांगितलेली आहेत. अनंतमूळ, हळद, चंदन, कोरफड, नागरमोथा, पद्मकाष्ठ, कोष्ठ वगैरे वनस्पती त्वचेची कोमलता व मृदुता कायम ठेवतात, शिवाय त्वचेचे पोषण करून त्वचा उजळण्यास, घट्ट राहण्यास व निरोगी राहण्यास मदत करतात. प्रकृतीनुसार जशी स्निग्ध, कोरडी किंवा मिश्र स्वरूपात त्वचा असेल, त्यानुसार या वर्ण्य द्रव्यांची निवड करून विशेष पॅक किंवा उटणी, उदा. "सॅन वात फेस पॅक', "सॅन पित्त फेस पॅक', "सॅन मसाज पावडर' लेप बनवता येतात व त्यांचा नियमित वापर करण्याने त्वचेचे सौंदर्य तसेच आरोग्यही कायम राहू शकते.
त्वचा वातदोषाचे स्थान आहे व त्वचेच्या सौंदर्यासाठी, आरोग्यासाठी हा वातदोष संतुलित राहणे आवश्यक असते. अभ्यंग हा उपचार यासाठी उत्तम असल्याने नियमित अभ्यंग करण्याने त्वचा सतेज, कोमल, दृढ व निरोगी राहते.
2. केस - वर्ण्य द्रव्यांप्रमाणेच आयुर्वेदाने केसांना हितकर असणारी "केश्य' द्रव्ये सांगितलेली आहेत. ही द्रव्ये केस धुण्यासाठी तसेच डोक्यावर लेप करण्यासाठी वापरता येतात. उदा. शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरे द्रव्ये केसांची हानी न करता त्यांना स्वच्छ करणारी असतात. कोरफड, मेंदी, जास्वंदसारख्या वनस्पतींमुळे केस मऊ, रेशमी होण्यास मदत मिळते. आयुर्वेदामध्ये केस लांब होण्यासाठी, केस पांढरे होऊ नयेत यासाठी विशिष्ट लेप सांगितले आहेत. केसांचे सौंदर्य तसेच आरोग्य टिकविण्यासाठी केसांचे धूपन करण्याचीही पद्धत आहे.
केस हाडांशी संबंधित असतात व हाडांवर वातदोषाचा प्रभाव असतो. वातदोष बिघडवण्यात, तसेच डोक्यात उष्णता वाढल्यास केसांच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे डोक्याला केश्य द्रव्यांनी सिद्ध केलेले व शीतल गुणधर्माचे तेल लावणे चांगले असते. "संतुलन व्हिलेज हेअर तेला'सारखे तेल नियमित लावण्याने केसांचे पोषणही होते.
3. डोळे - डोळ्यांच्या सौंदर्यासाठी करावयाच्या बाह्य उपचारांमध्ये महत्त्वाचे म्हणजे काजळ. याने डोळे स्वच्छ होतात, जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो व डोळ्यांचे आरोग्य टिकून राहते. मोतीभस्म, त्रिफळा घृत वगैरेंनी युक्त "सॅन अंजना'सारखे काजळ असले, तर त्यामुळे डोळ्यांवरचा ताण दूर होऊन डोळे तेजस्वी राहण्यासाठी मदत मिळते. आठवड्यातून एक - दोन वेळा त्रिफळा, लोध्र वगैरे नेत्रशुद्धिकर द्रव्यांनी सिद्ध पाण्याने डोळे धुतल्याने सुंदर व निरोगी राहण्यास मदत मिळते.
4. नखे - नखे काळजीपूर्वक कापणे आवश्यक असतेच, पण नखांच्या शेजारची त्वचा घट्ट व स्निग्ध राहणे आवश्यक असते. वाढलेले वय सर्वप्रथम हाताच्या बोटांवर समजते असे म्हणतात. नखे व आजूबाजूची त्वचा नीट राहण्यासाठी आठवड्यातून एक-दोन वेळा कोरफडीचा ताजा गर लावता येतो. लिंबाचा रस व मध यांचे मिश्रण काही वेळ लावून ठेवण्यानेही नखे, बोटे चांगली राहतात.
5. शरीरबांधा - बांधा सुडौल असणे हेही सौंदर्याचे एक लक्षण होय. बांधा प्रकृतीनुसार ठरत असला तरी तो सुबद्ध राहण्यासाठी प्रयत्न करता येतात. बाह्य उपचारांचा विचार करता अंगाला नियमितपणे तेल लावणे व उद्वर्तन (उटणे) लावणे हे बांध्याची सुबकता राखण्यास सहायक असते.
सौंदर्य व आरोग्यासाठी बाह्य उपचारांप्रमाणेच दोष-धातू-मलांच्या संतुलनासाठी काही विशेष औषधांचे व रसायनांचे सेवन करता येते.
नितळ, सतेज, त्वचेसाठी रक्तधातू शुद्ध व संपन्न असावा लागतो. त्यासाठी "वर्ण्य' औषधांचे सेवन करणेही हितावह असते. त्या दृष्टीने "संतुलन अनंत कल्प', "सॅन रोझ'सारखे रक्तवर्धक रसायन घेण्याचा उपयोग होताना दिसतो. केसांच्या आरोग्यासाठी हाडांची मजबूती आवश्यक असते. त्यासाठी प्रवाळपंचामृत, शौक्तिक भस्म, "कॅल्सिसॅन' "हेअर सॅन' वगैरे योग उपयुक्त असतात. नियमित दूध पिणे हेसुद्धा हाडांसाठी व पर्यायाने केसांसाठी उपयुक्त असते. डोक्यामध्ये कोंडा होणे, केसांची टोके दुभंगणे, केस निर्जीव भासणे, नखे तुटणे वगैरे त्रासांवर या प्रकारे आतून ताकद देण्याचा अधिक चांगला उपयोग होतो. सुबक बांध्यासाठी "शतावरी कल्प' घेणेही हितावह असते.
आचरणाचा विचार करता वेळेवर व पुरेशी झोप घेणे, नियमित वेळेला जेवणे, केस-डोळे-त्वचा यांना तीव्र ऊन फार वेळ लागू न देणे, दुपारी न झोपणे, मल-मूत्र वगैरे नैसर्गिक वेग बळेच धरून न ठेवणे या गोष्टी सांभाळणे जसे आरोग्यासाठी हितकर असते, तसेच सौंदर्यासाठीही हितकर असते.
स्त्रीच्या वा मुलीच्या सौंदर्यावर, आरोग्यावर तिच्या स्त्रीत्वाचा, संप्रेरकांच्या संतुलनाचा मोठा प्रभाव असतो. उपवर वयात तर संप्रेरके अतिशय संवेदनशील असतात. मानसिक, भावनिक बदलांचा या संप्रेरकांवर फार खोलवर परिणाम होत असतो. म्हणूनच उपवर वयात पाळी व्यवस्थित येण्याकडे खूप लक्ष द्यायला हवे. पाळीत अनियमितता असणे, पाळीच्या वेळी पोट दुखणे, पाठ-कंबर दुखणे वगैरे त्रास होत असले तरी बऱ्याचदा "लग्नानंतर सगळे ठीक होईल' अशी आशा बाळगली जाते. पण असे दुर्लक्ष करणे ही मुलीच्या आरोग्यासाठी, बऱ्याचदा प्रजननक्षमतेसाठीही खूप घातक ठरू शकते. म्हणून पाळी सुरू झाल्यापासून पाळीला कारणीभूत असणाऱ्या रसधातू-रक्तधातूच्या पोषणासाठी, संपन्नतेसाठी प्रयत्न करायला हवेत.
उपवर वयात मन भावनाप्रधान असते, म्हणावे तेवढे परिपक्व झालेले नसते. या वयात स्त्री-पुरुषात आकर्षण निर्माण होणे हेसुद्धा नैसर्गिक असते, पण अति मानसिक उत्तेजना किंवा निसर्गाच्या विरुद्ध, परंपरेने चालत आलेल्या अनुशासनाच्या विरुद्ध जाऊन चुकीचे काही तरी करण्याने आरोग्य व सौंदर्य या दोघांवर दुष्परिणाम होऊ शकतात.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:
Post a Comment