स्वाईन फ्लूचा प्रतिकार करण्यासाठी घरच्याघरी आणि सहज करता येण्याजोगे उपाय पुण्यातील आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सतीश डुंबरे यांनी सुचविले आहेत.
सध्या फैलावत असलेल्या "स्वाईन फ्लूचा प्रतिकार काही आयुर्वेदिय उपचार व जीवनशैलीद्वारे काही अंशी तरी करता येईल, असे वाटते.
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् ।
आतुरस्य व्याधि परिमोक्ष:।।
हे आयुर्वेद शास्त्राचे प्रयोजन आहे. स्वस्थ, म्हणजे निरोगी व्यक्तिच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि आतूर म्हणजे रोगी व्यक्तिच्या रोगाचा नाश करणे.
या प्रयोजनानील पहिला भाग सद्य:स्थितीत सर्वात महत्त्वाचा आहे. हे कार्य आयुर्वेद कित्येक हजार वर्षांपासून यशस्वीपणे करीत असला तरी सध्या गरज आहे ती श्रद्धा आणि विश्वासाची.
प्रत्येक रोगापासून स्वत:चे संरक्षण करण्याची प्रत्येक शरीराची स्वत:ची एक नैसर्गिक व स्वाभाविक संरक्षक प्रणाली असते. यालाच व्याधिक्षमत्व किंवा रोगप्रतिकारशक्ती म्हणतात. संसंर्गजन्य व्याधींपासून संरक्षण करण्यासाठी उत्तम रोग प्रतिकार क्षमतेची गरज असते.
सध्याच्या "स्वाईन फ्लू' च्या संसर्गजन्य परिस्थितीत ही रोगप्रतिकारशक्ती टिकविणे व वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पुढील आयुर्वेदीय गोष्टी करता येतील
१. सितोपलादी चूर्ण १/२ चमचा + हळद १/२ चमचा+ तुळशीच्या पानांचा रस १ चमचा+ आल्याचा रस १/२ चमचा+ मध १ चमचा असे मिश्रण को मट पाण्याबरोबर सकाळ-सायंकाळ प्रौढांनी घ्यावे. लहान मुलांमध्ये याचे अर्धे प्रमाण घ्यावे.
२. औषधी काढा - तुळशीची पाने ( शक्यतो काळी तुळस) १० + गवती चहा + आल्याचा छोटा तुकडा + १/४ चमचा दालचीनी + २ लवंगा + २ काळी मिरी + २ वेलदोडे + १/२ चमचा हळद + २ कप पाणी. उकळून १ कप उरविणे. हा काढा सकाळ - सायंकाळ दोन वेळा घेणे. प्रत्येक वेळी काढा कोमट हवा व तो ताजाच हवा. शक्यतो १ चमचा मधही काढ्याबरोबर घ्यावा.
३. सूक्ष्म त्रिफळा - २ गोळ्या सकाळ-सायंकाळ प्रौढांनी व अर्धा डोस लहान मुलांनी
४. सूदर्शन घन वटी - २ गोळ्या सकाळ - सायंकाळ प्रौढांनी व अर्धा डोस लहान मुलांनी. शक्यतो ५ ते ७ दिवस
५. चघळण्यासाठी ज्येष्ठमधाचा उपयोग करावा.
६. घरामध्ये सकाळ - सायंकाळ - वेखंड+ गुग्गुळ + धूप + कडूनिंबाची पाने + शेणाची गोवरी यांचा धूप सर्व घरात व घराच्या बाहेरील परिसरात फि रवावा.
७. पौष्टिक परंतु हलका आहार घ्यावा. मांसाहार, मद्यपान, हॉटेलचे, गाडीवरील पदार्थ टाळावेत. भरपूर पाणी प्यावे.
८. दोन मुठी साळीच्या लाह्या + खडीसाखर सकाळ - सायंकाळ पाण्याबरोबर किंवा पाण्यात मिसळून खाव्यात.
९. खजूर, काळ्या मनुका, लिंबू पाणी यांचे सेवन करावे.
१०. वचा तेल (वेखंडाचे तेल) २ ते ३ थेंब नाकपुडीला आतुन लावावे.
११. दिवसा झोपणे टाळावे.
१२. सतत बसून राहू नये. हलका, सोसवेल एवढा शारीरिक व्यायाम प्राणायाम करावा.
१३. गर्दीच्या ठिकाणी उपस्थिती राहणे टाळावे.
१४ पोट साफ ठेवावे. साफ नसल्यास त्रिफळा चूर्ण १ चमचा कोमट पाण्याबरोबर रात्री घ्यावे.
१५ घराबाहेर वावरताना किमान ३ घड्यांचा मोठा हातरुमाल/स्कार्फ नाकाला गुंडाळावा.
यानुसार शक्यतो सर्व प्रकारची काळजी घ्यावी. नुसतीच काळजी करू नये. सततच्य काळजी करण्याने रोगप्रतिकार शक्ती निश्चितच कमी होते.
डॉ. सतीश डुंबरे (एम. डी., कायाचिकित्सा)
प्राध्यापक व विभागप्रमुख,
कायाचिकित्सा विभाग
अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, पुणे ३०
---------------------------------
Hospital List
------------
Mumbai: Sir J J Hospital
Ph:(022) 23735555, 23739031, 23760943, 23768400 / 23731144 / 5555 / 23701393 / 1366
Mumbai: Haffkine Institute
Ph:(022) 24160947, 24160961, 24160962
Chennai: King Institute of Preventive Medicine
Ph:(044) 22501520, 22501521 & 22501522
Chennai: Government General Hospital
Ph:(044) 25305000, 25305723, 25305721, 25330300
Pune: Naidu Hospital
Ph:(020) 26058243
Pune: National Institute of Virology
Ph:(020) 26006290
Kolkata: D Hospital
Ph:(033) 23701252
Coimbatore: Coimbatore Government General Hospital
Ph:(0422) 2301393, 2301394, 2301395, 2301396
Hyderabad: Govt. General and Chest Diseases Hospital
Ph:(040) 23814939
Screening Centres
------------
Mumbai: Kasturba Hospital
Ph:022- 23083901 / 23092458 / 23000889
Mumbai: Bhabha Hospital in Bandra
Ph:26422775 / 26429828 / 26406787
Mumbai: Rajawadi Hospital in Ghatkopar
Ph:022-25094149
Delhi: Malviya Nagar hospital
Ph:011-26689999
Delhi: RML Hospital
Ph:011- 23365525
Chennai: Communicable Disease Hospital
Ph:91-11-24525211, 23404328
Bangalore: Rajiv Gandhi Institute Of Chest Diseases
Ph:91-80-26631923
Pune: Dr. Naidu Infectious Disease Hospital
Ph:09923130909
Nagpur: Govt Medical College and Hospital
Ph:0712-2750730
Kolkatta: Beliaghata Infectious Diseases Hospital
Ph:09433392182
Shaadi on mind? Act now. Register at Shaadi.com Matrimonial
No comments:
Post a Comment