Sunday, April 27, 2008

हेल्थ फॅक्‍ट्‌स

हेल्थ फॅक्‍ट्‌स - आहारातलं मीठ आणि आपलं आरोग्य

(मंदार कुलकर्णी)
आपल्याला रोज साधारण आठ ते दहा ग्रॅम म्हणजे (दीड ते दोन चमचे) इतके मीठ (स्वयंपाकघरातील पदार्थांपासून बाजारातून आणलेल्या चिप्ससारख्या पदार्थांपर्यंत सर्व मिळून) लागते. मात्र, प्रत्यक्षात आपण साधारण रोज १५ ग्रॅम मीठ खातो. .......
मीठ म्हणजे सोडियम क्‍लोराईड. सोडियम आणि क्‍लोराईड हे दोन्ही घटक शरीराला आवश्‍यक असतात. सोडियम हे मेंदूला संदेश पोचवणं आणि मेंदूपासून शरीरापर्यंत संदेश पोचवणं, शरीरातील द्राव्य घटकांचं योग्य नियंत्रण करणं, स्नायू आकुंचन पावण्यासाठी मदत करणं इत्यादीसाठी आवश्‍यक असतं. क्‍लोराईड हे आपल्या शरीरातील आम्लतेचं संतुलन राखणं, पोटॅशियम शोषून घेणं आणि रक्ताला श्‍वसन ऊतींपासून फुप्फुसांपर्यंत कार्बन डायऑक्‍साईड नेण्यासाठी मदत करणं इत्यादी कामं करतं.

मीठाचं प्रमाण कमी असेल, तर स्नायू कमकुवत होणं, शरीरातली ऊर्जा निघून गेल्यासारखं वाटणं, स्नायूंतून अचानक कळ येणं (मसल क्रॅंप्स) इत्यादी धोके उद्‌भवू शकतात. मीठाचं प्रमाण खूपच कमी असेल, तर ते जिवावरही बेततं.

शरीरासाठी आयोडिन अत्यावश्‍यक असतं; पण ते जास्त पोटात गेलं तरी हानीकारक असतं. मीठ हा घटक आपण खातोच आणि त्याचं प्रमाणही इतर खाद्यघटकांच्या तुलनेत नियंत्रित असतं, त्यामुळे मीठात आयोडिन घातलं जातं. बहुतेक देशांत आयोडिनयुक्त मीठाचीच विक्री होते.

- मंदार कुलकर्णी

No comments:

Post a Comment

ad