Sunday, July 19, 2009

मूत्राघात

मूत्राघाता (किडनी फेल्युअर)चे प्रमाण वाढल्याचे अलीकडे आढळते. मूत्रपिंड निकामी होण्याची प्राथमिक लक्षणे विचारात घेऊ. प्रथमतः हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे, की मूत्राघात प्रामुख्याने दोन प्रकारांत आढळतात.
(१) क्रॉनिक रिनल फेल्युअर, (२) ऍक्‍यूट रिनल फेल्युअर.
(१) क्रॉनिक रिनल फेल्युअरमध्ये धीमेपणाने रोगवृद्धी होत असते. हळूहळू शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी व्हायला लागते. याचे कारण असे, की रक्तातील एक अतिमहत्त्वाचा घटक अल्क्‍युमिन हा लघवीवाटे जात असतो. अलीकडच्या काळात आपल्या जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी घराघरातून आजीबाई असे. तिच्याजवळ परंपरेने चालत आलेला घरगुती औषधांचा बटवा असे. ती आपल्या नातवंडांची रोग लक्षणे विचारात घेऊन तिच्या दृष्टीने योग्य व आवश्‍यक औषधे योग्य त्या अनुपानांतून देत असे व आपल्या नातवंडांना सुदृढ व आरोग्यवान ठेवण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे बऱ्याचदा घरातून सुदृढ बालके असत. आजच्या जमान्यात बरीच नातवंडे आजीच्या संपर्कात नसतात. त्यामुळे आजी आपल्या नातवंडांची आरोग्यविषयक काळजी घेऊ शकत नाही.
आणखी आजच्या जमान्यातला महत्त्वाचा फरक म्हणजे घराघरातून जमिनीऐवजी लाद्यांचे प्रमाण वाढले आहे. आजकाल स्वच्छतेच्या नावाखाली लाद्या पुसल्या जातात. लाद्या पुसणे, त्या स्वच्छ करणे, ही अत्यंत आवश्‍यक गोष्ट आहे यात काही शंका नाही; परंतु घरातील लाद्यांमुळे आपण एक वेगळ्या प्रकारचे संकट आपल्यावर ओढवून घेतले आहे; कसे ते पाहा- आपल्या घरातील लहान मुलांनी लघवी केली की ती आपण लगेच पुसून टाकतो. पण घरात जमीन असल्यास ते मूत्र जमिनीत जिरते. काही वेळाने ती जागा पांढुरकी दिसू लागली की समजावे, त्या बाळाला लघवीतून खर (पांडूर, अल्क्‍युमिन) पडत आहे. या आजारावर पूर्वीच्या काळी आजीबाई आपल्या बटव्यातून योग्य औषधे काढून ती उगाळून आपल्या नातवंडांना चाटवत असे. आणि त्या आजारातून बरे करत असे. परंतु आता लहान मुलांच्या लघवीतून खर पडते ते बरेच दिवस कळत नाही. हळूहळू त्या बाळाचे रक्तनिर्मितीचे कार्य थांबते. त्याची मूत्रपिंडे निकामी होतात. तपासणी केल्यावर हे कळून येते. दोन-तीन महिन्यांच्या बालकातसुद्धा हा दोष आढळतो. अशी बालकेसुद्धा योग्य आयुर्वेदिक औषधानी चांगल्या तऱ्हेने बरी करता येतात.
जसे बालकात मूत्राघात होतात, तसेच कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना मूत्राघात होऊ शकतो. त्याला कारणेही खूप आहेत. या ठिकाणी आपण मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या घटकाचा विचार करू. (१) मूत्र मार्गात काही अडथळे निर्माण होतात, मूत्रमार्गात सूज येणे, पुळ्या किंवा गळू होणे, त्यामुळे मूत्रपिंडात योग्य प्रमाणात रक्त शुद्धीसाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे रक्तातील विषारी द्रव्यांचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे स्वाभाविकच मूत्रनिर्मितीचे प्रमाण कमी व्हायला लागते. तसेच लघवीतून पांडूर जायला लागतो. रुग्णांत रक्त क्षीणता व्हायला लागते. क्वचित काही रुग्णात नत्रयुक्त खाद्यान्नाचे नीट पचन होत नाही. त्यामुळे रक्तातील -बीयू एनचे प्रमाण वाढते. यकृत नीट कार्य करीत नाही. हेही एक मूत्राघाताचे कारण असते. यावर आयुर्वेदात उत्तम इलाज आहेत. योग्य पथ्य, योग्य वेळी व योग्य औषधांचे सेवन केल्यास मूत्राघात हा आजार मुळातून बरा होतो.
म. स. केळकर, अलिबाग, रायगड.

No comments:

Post a Comment

ad