Abstract India : A blog where you will find many Health, Ayurveda articles, thanks to Shree Balaji Tambe and Esakal.
Showing posts with label ईएमएफचं प्रदूषण. Show all posts
Showing posts with label ईएमएफचं प्रदूषण. Show all posts
Saturday, June 26, 2010
बेडरूम फक्त झोपण्यासाठी - भाग 3
घराच्या वीजप्रवाहाचं अर्थिग व्यवस्थित आहे याची अधूनमधून इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करा. अनेकदा अर्थिगची वायर तुटलेली असते. इंटेरियरसाठी आपण लाखो रुपये खर्च करतो. वायर कन्सिल्ड करणं, चकाचक स्वीच बसवणं आवर्जून करतो. पण चांगल्या क्वालिटीच्या अर्थिग प्लेट टाकण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात ही वस्तुस्थिती आहे.
बेडरूम आरोग्यदायी करण्यासाठी पुढे दिलेल्या टिप्स पाळाव्यात.१) शक्य होतील तितकी विजेवर चालणारी उपकरणं बेडरूममधून हटवावीत. टीव्ही, डेक, स्पीकर्स, कॉम्प्युटर, साईड लॅम्प, आन्सरिंग मशिन, कॉर्डलेस टेलिफोन बेडरूममध्ये ठेवू नयेत. अगदीच इलाज नसेल तर तुमच्या बेडपासून किमान सहा फूट अंतरावर ती राहतील याची काळजी घ्यावी. रात्री झोपताना ही उपकरणं अनप्लग करावीत. फक्त स्वीच ऑफ करून भागणार नाही. स्विच ऑफ केलेल्या उपकरणांतून विजेचा प्रवाह वाहत असतो. टीव्ही अनप्लग केल्यानंतरही धोकादायक असतो असं अमेरिकेतील बाऊ बायोलॉजिस्ट म्हणतात. म्हणून बेडरूममध्ये टीव्ही नकोच.
बेडच्या साईड टेबलवर कॉर्डलेस टेलिफोन ठेवणं ही लेटेस्ट फॅशन आहे. याच्यासारखं भयंकर काहीच नसेल. कॉर्डलेस अतिशय तीव्र स्वरूपाचे रेडिएशन सोडत असतो. साधारण चार फुटांच्या परिसरात ही तीव्रता आरोग्याला विनाशकारी ठरेल इतक्या प्रमाणात असते. रात्रभर तुमच्या डोक्यातून हे रेडिएशन्स अखंडपणे वाहात असतात. जे आरोग्यावर दूरगामी परिणाम करतात.
२) स्प्रिंगचा वापर केलेल्या मॅट्रेस वापरू नयेत. कापसाची गादी वापरावी.
३) धातू आणि मॅग्नेटिक फिल्ड यांचा थेट संबंध आहे. म्हणून धातूचे पलंग वापरू नयेत. ४)बेडरूममधील लोखंडी कपाटं, टाईपरायटर, लोखंडी रॅक कमी करता आल्या तर बरं. मोटर गॅरेज किंवा लोखंडी सामानाच्या दुकानाच्या वर आपली बेडरूम असू नये असं बाऊ बायोलॉजी हे जर्मन शास्त्रं सांगतं.
५) पाण्याचा बेड वापरू नये. इलेक्ट्रिक ब्लँकेट नको. मानवी शरीराचं नैसर्गिक व्होल्टेज एक मिलिव्होल्टपेक्षा कमी असतं. इलेक्ट्रिक ब्लँकेटमुळे तुम्ही ७६ हजार मिलिव्होल्टनं घेरले जाता.
६)पलंगाच्या खालून इलेक्ट्रिक वायर जाणार नाहीत याची खात्री करावी.
७) सिन्थेटिक कार्पेट, सिन्थेटिक वॉलपेपर, सिन्थेटिक उशा बेडरूममध्ये नकोत. प्लास्टिकच्या जितक्या वस्तू (लॅम्प शेड, शोपीस, अगदी लहान मुलांची खेळणीसुद्धा) बेडरूममधून हटवता येतील तितक्या हटवाव्यात. अमेरिकेतील एक संशोधक वोल्फगँग मायस यांच्या मतानुसार पॉली या शब्दानं सुरू होणाऱ्या मटेरिअलची (पॉलीमर, पॉलीस्टर, पॉलीथीन वगैरे) कोणतीही वस्तू बेडरूममध्ये ठेवू नये.
८) घराच्या वीजप्रवाहाचं अर्थिग व्यवस्थित आहे याची अधूनमधून इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करा. अनेकदा अर्थिगची वायर तुटलेली असते. इंटेरियरसाठी आपण लाखो रुपये खर्च करतो. वायर कन्सिल्ड करणं, चकाचक स्वीच बसवणं आवर्जून करतो. पण चांगल्या क्वालिटीच्या अर्थिग प्लेट टाकण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात ही वस्तुस्थिती आहे.
प्रगत देशांमध्ये डीमांड स्वीच किंवा कट ऑफ स्वीच नावाचं उपकरण मिळतं. (सोबत फोटो छापला आहे.) हे उपकरण उपकरण वापरात नसताना त्याचा वीजप्रवाह पूर्णत: तोडू शकतं. दुर्दैवानं आपल्याकडे हे स्वीच मिळत नाहीत. शिवाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक पेन्टही त्यांनी तयार केलेयत. या पेन्टचा वापर बेडरूमच्या भिंतीवर केल्यास ईएमआर पासून तुमचा नक्की बचाव होईल. जिज्ञासू वाचकांनी या वेबसाईटला भेट देऊन अधिकची माहिती मिळवावी. किंवा ते स्वीच व पेन्ट मागवून घेता आलं तर पाहावं.
९) रेडिओअॅक्टिव्ह स्मोक डिटेक्टर बेडरूममध्ये बसवू नका. त्यामुळे शांत झोप लागत नाही. पंचतारांकित हॉटेलच्या रूममध्ये हा अनुभव येतो. अमेरिकेतील संशोधक डॉ. जॉन ओट यांच्या संशोधनानुसार अशा डिटेक्टरच्या समोर ताजी फुलं ठेवली तरी लगेच सुकतात. नपुंसकत्वाचं ते कारण बनू शकतं.
१०) रात्री खिडक्या उघडय़ा ठेवाव्यात. शुद्ध हवा येण्याचा हा सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय आहे. रात्री एसी लावून झोपण्याची सवय असणाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर खिडक्या उघडय़ा ठेवाव्यात. दिवस-रात्र खोली बंद ठेवणं चांगलं नाही. तिला मोकळा श्वास घेऊ द्या. बाहेरच्या वातावरणाशी, कॉस्मिक एनर्जीशी तिचं स्पंदन होऊ द्या.
११) बेडरूमच्या भिंतीला लागून बाहेरच्या बाजूनं विजेची उपकरणं असतील तर त्या भिंतीला खेटून पलंग ठेवणं टाळावं. लक्षात ठेवा की ईएमआर रेडिएशन काँक्रिट, विटा, लाकूड, धातू.. कशातूनही आरपार जातात. बेडरूमची एखादी भिंत शेजारच्या फ्लॅटला कॉमन असेल तर अशा भिंतीला खेटून पलंग ठेवणं टाळावं. कारण त्या बाजूला शेजाऱ्यानं कोणती उपकरणं ठेवली असतील ते आपल्याला माहीत नसतं. शिवाय त्या भिंतीत त्यानं इलेक्ट्रिक वायर कन्सिल्ड केलेली असू शकते.
संजय पाटील
---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
Tuesday, June 15, 2010
बेडरूम फक्त झोपण्यासाठी
अमेरिकेच्या एनर्जी डिपार्टमेंटला या धोक्याचा शोध काही वर्षांपूर्वी लागला. त्यानंतर या डिपार्टमेंटने ईएमएफ या नावाने एक विशेष उपक्रम युनायटेड स्टेट्स प्रोटेक्शन एजन्सी या संस्थेच्या सहकार्यानं राबवला. ईएमआरच्या घातक परिणामांचा अभ्यास या उपक्रमांतर्गत करण्यात आला आणि अनेक आजारांचं मूळ या ईएमआरमध्ये दडलंय असा निष्कर्ष काढण्यात आला. हवेत किती प्रदूषण वाढलंय, अशी तक्रार करीत सर्व गाडय़ांना सीएनजी कम्पल्सरी करायला हवं, कारखाने शहरापासून लांब न्यायला हवेत, असले तोडगे आपण तावातावानं सुचवत असतो. प्रदूषण म्हणजे फक्त हवेचं- पाण्याचं प्रदूषण इतकंच आपल्याला माहिती असतं आणि त्याची सर्वसाधारण कारणंही माहीत असतात, पण आपल्या चैनीच्या कल्पना आणखी एक प्रदूषण आपल्याच घरात तयार करतात आणि हे प्रदूषण आपल्याला शनै: शनै: मारत असतं याची गंधवार्ताही नसते. या प्रदूषणाचं नाव आहे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फिल्ड (ईएमएफ). या भयंकारी ईएमएफ प्रदूषणानं असंख्य घरांचं आरोग्य अक्षरश: पोखरलंय. मी पाच-सहा वर्षांपूर्वी मोबाईल टॉवरमुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दल लिहिलं होतं त्यावेळी काही विद्वानांनी नाक मुरडलं होतं. पण आजची परिस्थिती पाहा! या विषयात किती अवेअरनेस निर्माण झालाय, ते पाहा. माननीय मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी लक्ष घातल्याचं वृत्तपत्रातील बातम्यांवरून दिसतंय. कदाचित आजच्या लेखालाही काही विद्वान नाक मुरडतील. माझी त्यांना विनंती आहे की, वेट अॅन्ड वॉच. कारण मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत ईएमएफ प्रदूषणाबद्दलही अवेअरनेस तयार होईल.
पुष्कळ लोक सांगतात की, आम्ही नियमित योग करतो, व्यायाम करतो, आहाराची पथ्यं पाळतो, पण तरीही सतत आजारी पडतो. खात्रीनं सांगता येतं की, या लोकांच्या आजारपणाचं कारण त्यांच्या बेडरूममध्ये सापडेल आणि ते कारण असेल ईएमएफचं प्रदूषण.
विजेचा प्रवाह वाहत असलेल्या कोणत्याही तारेतून किंवा विजेवर चालणाऱ्या कोणत्याही उपकरणातून इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन्स (ईएमआर) निघत असतात. हे रेडिएशन्स मानवी शरीराला घातक असतात हे जगभरातील संशोधनानं आता सिद्ध झालंय. अमेरिकेच्या एनर्जी डिपार्टमेंटला या धोक्याचा शोध काही वर्षांपूर्वी लागला. त्यानंतर या डिपार्टमेंटने ईएमएफ या नावानं एक विशेष उपक्रम युनायटेड स्टेट्स प्रोटेक्शन एजन्सी या संस्थेच्या सहकार्यानं राबवला. ईएमआरच्या घातक परिणामांचा अभ्यास या उपक्रमांतर्गत करण्यात आला आणि अनेक आजारांचं मूळ ईएमआरमध्ये दडलंय असा निष्कर्ष काढण्यात आला. जी मुलं उच्च इलेक्ट्रिक फिल्डच्या संपर्कात असतात, त्यांना कॅन्सर होण्याचा धोका असतो हे उत्तर अमेरिका व युरोपमध्ये झालेल्या संशोधनात सिद्ध झालं. स्वीडिश कॅन्सर स्टडीनं या निष्कर्षांवर शिक्कामोर्तब केलं. २५ वर्षांच्या संशोधनानंतर ही संस्था अशा निष्कर्षांला पोहोचली की, ल्युकेमिया झालेली मुलं आणि उच्च इलेक्ट्रिक फिल्ड यांचा थेट संबंध आहे. पेशींची नैसर्गिक वाढ ईएमआर खुंटवतं. वाढत्या वयातील मुलांवर त्याचा थेट परिणाम होतो. टोरान्टो युनिव्हर्सिटीचे ख्यातनाम संशोधक डॉ. मिलर यांच्या संशोधनानुसार ल्युकेमियाच्या प्रसारात इलेक्ट्रिक फिल्डचा वाटा मोठा आहे.
प्रत्येक घरात ईएमआर प्रदूषणाचा धोका आहे. कारण घराघरांत पंखे, एसी, टीव्ही, डेक, मायक्रोवेव्ह, कॉर्डलेस फोन वगैरे आहेत, पण ईएमआरपासून वाचण्यासाठी या सर्व गोष्टी फेकून देण्याची गरज नाही. काही साध्या गोष्टी पाळल्या तरी या धोक्यापासून वाचता येतं. ईएमआरपासून वाचण्यासाठी फक्त एक ओळीचा रामबाण लक्षात ठेवायचा तो म्हणजे उगमापासून विवक्षित अंतरापर्यंतच हे फिल्ड काम करतं. म्हणजेच विजेच्या तारांपासून किंवा उपकरणांपासून तुम्ही विशिष्ट अंतर राखलंत (विशेषत: झोपलेले असताना) की झालं.
ईएमएफ डोळ्यांनी दिसत नाही, त्याचा वास येत नाही, स्पर्श जाणवत नाही, कानांना ऐकू येत नाही, मात्र तो डिटेक्ट करता येतो. त्यासाठी अद्ययावत उपकरणं जर्मनीतील शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. १० मिलिव्होल्टपेक्षा जास्त तीव्रतेचं इलेक्ट्रिक फिल्ड आणि ०.२ मिलिगॉजपेक्षा जास्त तीव्रतेचं मॅग्नेटिक फिल्ड मानवी आरोग्याला घातक आहे, असं प्रमाण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (who) जाहीर केलंय. तुमची विजेची उपकरणं किती तीव्रतेचे फिल्ड कोणत्या अंतरापर्यंत सोडतात हे जर्मनीतील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या उपकरणांनी मोजता येतं. ही सर्व उपकरणं माझ्या संग्रहात आहेत. त्यापैकी काहींचे फोटो सोबत छापले आहेत. पुढील भागात बेडरूममधील ईएमआर प्रदूषणाची आणखी माहिती घेऊ.

Subscribe to:
Posts (Atom)