Tuesday, August 24, 2010

लसूण सर्वांसाठी

लसणाचे आहारातील महत्त्व वादातीत आहे. विशेषतः हृदयासाठी तर लसूण म्हणजे संजीवनच. लसूण हा अमृतासमान असून त्यामध्ये एकच असा विशिष्ट रस नसतो. रसोन, लसन, गार्लिक, ऍलियम सॅटिव्हिरा अशा नावांनी प्रसिद्ध असलेल्या लसणामध्ये आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी असे घटक आढळून येतात.

उत्पत्ती

लसणाची उत्पत्ती अमृतातून झाल्याचे मानले जाते. या संदर्भात एक दंतकथा आहे. जेव्हा गरुड इंद्राकडून अमृत पळवून नेत होता, तेव्हा पृथ्वीवर पडलेल्या त्याच्या थेंबातून लसणाची निर्मिती झाली. कटू, तिक्त, कशाय, मधुर, लवण हे पाच रस लसणामध्ये आहेत. लसणामध्ये फक्त आम्ल रस नसतो. पूर्वी इजिप्तमधील लोक जखमा बऱ्या करण्यासाठी, संसर्गांवर लसूण वापरत असत, ही माहिती उपलब्ध आहे. लसणाला "ग्रेट प्रोटेक्‍टर' असे म्हटले जाते. लसूण सर्वत्र सहज उपलब्ध असतो आणि तो एक उत्तम रसायन मानला जातो. लसणाची लागवड त्याच्या कळ्या लावून केली जाते. भारतात पुणे, सातारा, धारवाड इत्यादी ठिकाणी लसूण पिकतो. पांढरा आणि लाल अशा लसणाच्या दोन जाती आढळतात. दोन्हींचे गुणधर्म साधारणपणे सारखेच आहेत.

वापर
लसणाचा वापर रोजच्या आहारात विशेषतः थंडीमध्ये व पावसाळ्यात करावा. लसणाचे तेलही बनवले जाते. ते लकवा व वातविकारात गुणकारी ठरते. आपल्या रोजच्या आहारात लसूण अवश्‍य वापरावा. त्यामुळे चांगली चव येतेच; पण शरीरबलही वाढते.

साठवण
लसूण शक्‍यतो 18 अंश सेल्सिअस वरील तापमानात ठेवावा. जागा कोरडी असावी कारण ओलसर जागेत मोड येतात. लसूण शक्‍यतो ताजा सोलूनच वापरावा. सोलून ठेवल्यास व्यवस्थित हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवावा.

गुणकारी
* लसूण हा उत्तम पाचक समजला जातो.
* लसणाच्या सेवनाने बुद्धी, स्मृती व नेत्रबल वाढते.
* आयुर्वेदाप्रमाणे सप्तधातूंचे पोषण होऊन शरीरबल वाढते.
* लसूण हा स्निग्ध, गरम, पाचक व मधुर समजला जातो.
* उत्तम कृमिनाशक आणि उत्तेजक आहे.

पोषणमूल्ये
* लसणात शंभरहून अधिक रसायने आहेत, असे संशोधनात आढळून आले आहे.
काही प्रमाणात अ, ब आणि क जीवनसत्त्वे आढळून येतात.
* लसूण हा कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस या खनिजांचा स्रोत आहे.
* लसणामध्ये ऍलिल सल्फाईड असते, ते फायटोकेमिकल म्हणून कार्य करते. अजोन हे फायटोकेमिकल लसणात आढळते, ते रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करते. त्यामुळे रक्तात गुठळ्या निर्माण होत नाहीत.
* लसूण हृदयासाठी अत्यंत उपयुक्त असतो.
* लसणामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात, त्यामुळे अंजायना टळू शकतो.
* लसणात सॅपोनीन असते, ते कर्करोगाविरुद्ध लढण्याची क्षमता वाढवते.
* ऍलिसिन या प्रतिजैविकामुळे लसणाला उग्र वास येतो. ऍलिसिनमुळे ङऊङ कोलेस्टेरॉल कमी होते. ऍलिसिनच्या गुणधर्मामुळे लसणाला "मिरॅकल फूड' म्हणतात.
* मधुमेहातही लसूण गुणकारी असतो. त्यामुळे रक्‍तातील साखरेचे प्रमाण काही अंशी नियमित होण्यास मदत होते.
* इन्शुलिनच्या निर्मितीलाही चालना मिळते.
* त्यासाठी रोज तीन ते चार पाकळ्या लसूण खावा.

लसूण सर्वांसाठी
* लसूण हा सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांनी खावा.
* तो गर्भवती स्त्रीलाही आवश्‍यक आहे.
* मिरे व लसूण चटणी अवश्‍य खावी. त्यामुळे चव येते.
* अन्नाचे व्यवस्थित पचन होते, तब्येत छान राहते.
* अशक्त लोकांनीही आहारात लसूण अवश्‍य वापरावा.
* स्त्रियांच्या आरोग्यासाठी लसूण आवश्‍यक समजला जातो.

लसूण अतिशय उष्ण असतो. त्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा. लसूण उष्ण ऋतूत खाऊ नये. शक्यतो फेब्रुवारी ते जून पर्यंत टाळावा.
लसूण हा वातशामक आहे.पोटात gas होत असेल तर लसूण खाण्याने नाहीशे होतात.लसूण,कडुलिंब व निर्गुडीचा पाला एकत्र वाटून तो तिळाचे तेला मध्ये ,त्यातील पाण्याचा अंश निघून जाई पर्यंत उकळावा. हे तेल सांधेदुखीवर चांगले असते.
लसून अत्यंत उष्ण असल्याने लसणाचा कांदा रात्रभर दह्यात बुडवून ठेवून सकाळी ते दही टाकून द्यावे व लसणाच्या पाकळ्या गाईच्या तुपात परतून एक दोन पाकळ्या सकाळी खाव्या. हे एक बुद्धीवर्धक व स्मृती वर्धक औषध आहे. दह्या चे व तुपाचे संस्कार झाल्याने लसणाचे दोष जातात व तो सुपाच्य बनतो.
लसूण हा धातू जास्त उत्पन्न करणारा सुध्धा आहे, म्हणून ब्रम्हचर्य शाबूत राहण्यासाठी चातुर्मासात त्याला खाणे टाळावे. असे शास्त्र म्हणते.

लसूण-टोमॅटो चटणीसाहित्य :
पाच-सहा पाकळ्या लसूण, दोन मध्यम टोमॅटो, दोन मिरच्या बारीक चिरून, फोडणीसाठी हळद, हिंग, मीठ, साखर, मोहरी, तिखट, दोन चमचे तेल.
कृती :
प्रथम टोमॅटो धुऊन बारीक चिरून घ्यावा. लसूण बारीक चिरून घ्यावा. छोट्या कढईत तेल तापवून त्यामध्ये हिंग, मोहरी, लसूण, टोमॅटो घालावा. व्यवस्थित शिजू द्यावे. चवीनुसार तिखट, मीठ, साखर घालावी. पाणी राहू देऊ नये.


---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad