Tuesday, June 15, 2010

बेडरूम फक्त झोपण्यासाठी

अमेरिकेच्या एनर्जी डिपार्टमेंटला या धोक्याचा शोध काही वर्षांपूर्वी लागला. त्यानंतर या डिपार्टमेंटने ईएमएफ या नावाने एक विशेष उपक्रम युनायटेड स्टेट्स प्रोटेक्शन एजन्सी या संस्थेच्या सहकार्यानं राबवला. ईएमआरच्या घातक परिणामांचा अभ्यास या उपक्रमांतर्गत करण्यात आला आणि अनेक आजारांचं मूळ या ईएमआरमध्ये दडलंय असा निष्कर्ष काढण्यात आला. हवेत किती प्रदूषण वाढलंय, अशी तक्रार करीत सर्व गाडय़ांना सीएनजी कम्पल्सरी करायला हवं, कारखाने शहरापासून लांब न्यायला हवेत, असले तोडगे आपण तावातावानं सुचवत असतो. प्रदूषण म्हणजे फक्त हवेचं- पाण्याचं प्रदूषण इतकंच आपल्याला माहिती असतं आणि त्याची सर्वसाधारण कारणंही माहीत असतात, पण आपल्या चैनीच्या कल्पना आणखी एक प्रदूषण आपल्याच घरात तयार करतात आणि हे प्रदूषण आपल्याला शनै: शनै: मारत असतं याची गंधवार्ताही नसते.  या प्रदूषणाचं नाव आहे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फिल्ड (ईएमएफ). या भयंकारी ईएमएफ प्रदूषणानं असंख्य घरांचं आरोग्य अक्षरश: पोखरलंय. मी पाच-सहा वर्षांपूर्वी मोबाईल टॉवरमुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दल लिहिलं होतं त्यावेळी काही विद्वानांनी नाक मुरडलं होतं.  पण आजची परिस्थिती पाहा! या विषयात किती अवेअरनेस निर्माण झालाय, ते पाहा.  माननीय मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी लक्ष घातल्याचं वृत्तपत्रातील बातम्यांवरून दिसतंय. कदाचित आजच्या लेखालाही काही विद्वान  नाक मुरडतील.   माझी त्यांना विनंती आहे की,  वेट अ‍ॅन्ड वॉच. कारण मला  खात्री आहे की येत्या  काही वर्षांत ईएमएफ प्रदूषणाबद्दलही अवेअरनेस तयार होईल.
पुष्कळ लोक सांगतात की, आम्ही नियमित योग करतो, व्यायाम करतो, आहाराची पथ्यं पाळतो, पण तरीही सतत आजारी पडतो. खात्रीनं सांगता येतं की, या लोकांच्या आजारपणाचं कारण त्यांच्या बेडरूममध्ये सापडेल आणि ते कारण असेल ईएमएफचं प्रदूषण.
विजेचा प्रवाह वाहत असलेल्या कोणत्याही तारेतून किंवा विजेवर चालणाऱ्या कोणत्याही उपकरणातून इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन्स (ईएमआर) निघत असतात. हे रेडिएशन्स मानवी शरीराला घातक असतात हे जगभरातील संशोधनानं आता सिद्ध झालंय. अमेरिकेच्या एनर्जी डिपार्टमेंटला या धोक्याचा शोध काही वर्षांपूर्वी लागला. त्यानंतर या डिपार्टमेंटने ईएमएफ या नावानं एक विशेष उपक्रम युनायटेड स्टेट्स प्रोटेक्शन एजन्सी या संस्थेच्या सहकार्यानं राबवला. ईएमआरच्या घातक परिणामांचा अभ्यास या उपक्रमांतर्गत करण्यात आला आणि अनेक आजारांचं मूळ ईएमआरमध्ये दडलंय असा निष्कर्ष काढण्यात आला.  जी मुलं उच्च इलेक्ट्रिक फिल्डच्या संपर्कात असतात, त्यांना कॅन्सर होण्याचा धोका असतो हे उत्तर अमेरिका व युरोपमध्ये झालेल्या संशोधनात सिद्ध झालं. स्वीडिश कॅन्सर स्टडीनं या निष्कर्षांवर शिक्कामोर्तब केलं. २५ वर्षांच्या संशोधनानंतर ही संस्था अशा निष्कर्षांला पोहोचली की, ल्युकेमिया झालेली मुलं आणि उच्च इलेक्ट्रिक फिल्ड यांचा थेट संबंध आहे. पेशींची नैसर्गिक वाढ ईएमआर खुंटवतं. वाढत्या वयातील मुलांवर त्याचा थेट परिणाम होतो. टोरान्टो युनिव्हर्सिटीचे ख्यातनाम संशोधक डॉ. मिलर यांच्या संशोधनानुसार ल्युकेमियाच्या प्रसारात इलेक्ट्रिक फिल्डचा वाटा मोठा आहे.

प्रत्येक घरात ईएमआर प्रदूषणाचा धोका आहे. कारण घराघरांत पंखे, एसी, टीव्ही, डेक, मायक्रोवेव्ह, कॉर्डलेस फोन वगैरे आहेत, पण ईएमआरपासून वाचण्यासाठी या सर्व गोष्टी फेकून देण्याची गरज नाही. काही साध्या गोष्टी पाळल्या तरी या धोक्यापासून वाचता येतं. ईएमआरपासून वाचण्यासाठी फक्त एक ओळीचा रामबाण लक्षात ठेवायचा तो म्हणजे उगमापासून विवक्षित अंतरापर्यंतच हे फिल्ड काम करतं. म्हणजेच विजेच्या तारांपासून किंवा उपकरणांपासून तुम्ही विशिष्ट अंतर राखलंत (विशेषत: झोपलेले असताना) की झालं.
ईएमएफ डोळ्यांनी दिसत नाही, त्याचा वास येत नाही, स्पर्श जाणवत नाही, कानांना ऐकू येत नाही, मात्र तो डिटेक्ट करता येतो. त्यासाठी अद्ययावत उपकरणं जर्मनीतील शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. १० मिलिव्होल्टपेक्षा जास्त तीव्रतेचं इलेक्ट्रिक फिल्ड आणि ०.२ मिलिगॉजपेक्षा जास्त तीव्रतेचं मॅग्नेटिक फिल्ड मानवी आरोग्याला घातक आहे, असं प्रमाण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (who) जाहीर केलंय. तुमची विजेची उपकरणं किती तीव्रतेचे फिल्ड कोणत्या अंतरापर्यंत सोडतात हे जर्मनीतील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या उपकरणांनी मोजता येतं. ही सर्व उपकरणं माझ्या संग्रहात आहेत. त्यापैकी काहींचे फोटो सोबत छापले आहेत. पुढील भागात बेडरूममधील ईएमआर प्रदूषणाची आणखी माहिती घेऊ. 



संजय पाटील
---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad