कुमुदिनी कुलकर्णी
संत्रं हे मूळ दक्षिण चीनमधील फळ आहे. याची चव आंबट-गोड व रसाळ असते. याचा मोसम वर्षातून दोनदा असतो. याच्या रसामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होते, म्हणून तो अशक्त, आजारी व लहान मुलांना देतात. संत्र्याचे खूप औषधी उपयोगही आहेत.
आरोग्यासाठी
आरोग्यासाठी
- सर्व प्रकृतीच्या लोकांनी संत्र्याच्या रसात गरम पाणी टाकून प्यावं.
- संत्र्याच्या रसामुळे पोटातील कृमी, पोटशूळ कमी होऊन हाडं मजबूत होतात.
- श्वासनलिकेच्या सुजेवर संत्र्याचा रस गुणकारी आहे.
- गर्भवती स्त्रीला उलट्यांचा त्रास होत असेल तर आराम वाटण्यासाठी संत्र्याचा रस घ्यावा.
- गॅस निर्माण होऊन जठर आणि लहान आतड्यात बिघाड निर्माण झाल्यास संत्र्याचा रस घ्यावा. जठर व आतड्याचा मार्ग स्वच्छ होतो व पचनशक्ती सुधारते.
- संत्र्यामुळे जठराग्नी प्रज्वलित होतो. भूक लागते.
- 100 ग्रॅम संत्र्यापासून 60 कॅलरी ऊर्जा मिळते.
- संत्र्यामुळे शरीराची झीज लवकर भरून येते.
- संत्रासाल वाळवून त्याची पावडर शिकेकाईमध्ये वापरतात.
- मेंदीत वापरतात. तिला सुगंधी वास येतो.
- संत्र्याच्या ताज्या सालीपासून पार्लरमध्ये ऑरेंज लोशन नावाचं मसाज क्रीम बनवतात.
- संत्र्याची साल वाळवून केलेल्या 1 वाटी संत्रा पावडरमध्ये अर्धी वाटी मसूर डाळीचं पीठ व दोन चमचे ज्येष्ठमध पावडर टाकावी. हे मिश्रण एकत्र करून ठेवावं व अंघोळ करताना उटण्यासारखं लावावं. 10 मिनिटांनी ते धुऊन काढावं. लव कमी होते.
- संत्रा पावडर दुधाच्या सायीत खलून मसाज केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम नाहीसे होऊन चेहरा गोरा व सतेज दिसू लागतो.
- संत्र्याचं सरबत 2 वाट्या संत्र्याचा गर, 2 चमचे खडीसाखर, एक चमचा चाट मसाला हे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून, गाळून, बर्फ टाकून सर्व्ह करावं.
- संत्रा बर्फी :
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment