Abstract India : A blog where you will find many Health, Ayurveda articles, thanks to Shree Balaji Tambe and Esakal.
Friday, July 9, 2010
बेडरूम फक्त झोपण्यासाठी - भाग ५
बेडरूममधील झोपण्याची दिशा , इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आदींची माहिती आपण मागील चार भागांत पाहिली. या भागात बेडरूमसंदर्भात अन्य गोष्टींची माहिती घेऊ.
रंग
’ नैऋत्येच्या बेडरूमला शक्यतो अर्थ शेड वापराव्यात. (क्रीम, ब्राऊन, यलो वगैरे) गुलाबी रंगही चालू शकेल.
’ पांढरा, हिरवा रंग शक्यतो टाळावा. निळा किंवा निळ्याची कोणतीही शेड नकोच.
’ दोन रंग वापरायचे असतील तर पूर्व व उत्तर भिंतीवर हलक्या शेड वापराव्यात आणि पश्चिम व दक्षिण भिंतीवर गडद शेड वापराव्यात. या भिंतीवर टेक्श्चर पेन्ट वापरायलाही हरकत नाही.
’ बेडरूमच्या खिडक्यांसाठी पडदे गडद रंगाचे
आणि जाड कापडाचे वापरावेत. त्यावर अॅबस्ट्रॅक्ट डिझाईन असावी. फुलाफुलांचे- वेलबुट्टीचे पडदे नकोत.
फ्लोरिंग
’ फ्लोरिंगसाठी व्हिट्रीफाईड, सिरॅमिक टाईल वापराव्यात. टाईलचा रंग अर्थ शेडमध्येच असावा.
’ नैऋत्येच्या बेडरूममध्ये पांढरा मार्बल वापरू नये. त्यामुळे आजारपण येईल. पिवळ्या जैसलमेरचा वापर
फ्लोरिंगसाठी किंवा स्कर्टिगसाठी किंवा विन्डो फ्रेमसाठी करता आला तर सोन्याहून पिवळं.
’ ज्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे अशा जातकांनी येथे वूडन फ्लोरिंग वापरू नये. अन्यथा नातेसंबंध, व्यावसायिक संबंध यात तणाव निर्माण होईल.
’ ग्रेनाईटचा वापर पूर्णत: टाळावा. ग्रेनाईट किरणोत्सारी असल्यानं आरोग्यासाठी चांगला नाही. मोकळ्या वातावरणात या अल्प किरणोत्साराचा त्रास होत नाही. पण बेडरूमच्या बंदिस्त वातावरणात हा अल्प किरणोत्सारही महागाचा ठरतो.
फर्निचर
’ बेडरूममध्ये पलंग योग्य प्रकारे ठेवता येईल याला प्राधान्य द्यावं. झोपतानाची दिशा दक्षिणेकडे राहील अशा प्रकारे तो ठेवावा. ते शक्य नसेल पूर्वेला डोकं राहील अशाप्रकारे तो ठेवावा.
’ पलंगाला सॉलिड हेडपोस्ट असावाच.
’ पलंग टॉयलेटच्या भिंतीला लागून ठेवू नये.
’ पलंग बीमखाली ठेवू नये.
’ खालच्या मजल्याच्या गॅसवर किंवा वरच्या मजल्याचा टॉयलेट यांच्याखाली पलंग येणार नाही याची काळजी घ्यावी.
’ पलंग लाकडाचाच बनवावा. लोखंडी पलंग मुळीच नको.
’ शक्यतो पलंगाला बॉक्स नसावा. अगदीच स्टोरेजचा प्रॉब्लेम असेल तर बॉक्सबेड वापरायला हरकत नाही. पण त्यात फक्त चादरी, अंथरूण वगैरे स्टोअर कराव्यात, रद्दी, पुस्तकं, अडगळीच्या वस्तू बेडखाली स्टोअर करू नयेत.
’ बेडखाली धान्याचा साठा किंवा छुपी तिजोरी चुकूनही ठेवू नये.
’ बिछाना अखंड असावा. दोन बिछाने ठेवू नयेत. दाम्पत्य जीवनात दुरावा निर्माण होण्याचं ते कारण बनू शकतं
’ शक्यतो कापसाचा बिछाना वापरावा. स्पंज आणि स्प्रिंगचा वापर केलेले बिछाने वापरू नयेत.
’ बेडरूममध्ये वर्किंग टेबल ठेवणार असाल तर ते पूर्व किंवा उत्तर भिंतीला लागून ठेवावे. म्हणजे तेथे बसणाऱ्याचं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला येईल.
’ वॉर्डरोब पश्चिम किंवा दक्षिण भिंतीला लावावेत.
’ ड्रेसिंग टेबल अशाप्रकारे ठेवावं की झोपलेल्या माणसाची प्रतिमा आरशात पडणार नाही. काही पलंगात हेडपोस्टमध्ये आरसा लावलेला असतो. ही वाईट आयडिया आहे.
चित्रं, मूर्ती, झाडं वगैरे..
’ बेडरूममधील चित्रांची निवड काळजीपूर्वक करावी. उदासवाणी चित्रं लावू नयेत. ज्यातून एकटेपण प्रतीत होतं अशी चित्रं लावू नयेत.
’ धबधब्याची चित्रं लावू नयेत.
’ पती- पत्नींचा एकत्रित फोटो जरूर लावावा.
’ मॅन्डरिन डक, लव्ह बर्ड ठेवावेत. पण जोडीनं. देवादिकांची चित्रं न लावलेली बरी. नैर्ऋत्य प्रभाग हा तमोगुणांचा आहे, तर देव सत्त्व गुणांचे. त्यामुळे नैर्ऋत्येतील बेडरूममध्ये देव्हारा नको.
’ मूल हवं असलेल्या नवदाम्पत्यानं मात्र बाळ श्रीकृष्णाचं मोठं चित्र बेडरूममध्ये जरूर लावावं.
अन्य दिशा
नैर्ऋत्येला मास्टर बेडरूम ठेवणं शक्य नसेल तर दक्षिणेला ठेवलेलीही चालते. अशा आशयाचे श्लोक काही ग्रंथात सापडतात.
शयनं दक्षिणायां च नैर्ऋत्यामायुधाश्रयम् (किरणाख्य तंत्र)
पुव्वे, सीहदुवारं अग्गीइ रसोइ दाहिणेसयणं (गृहप्रकरणम्)
याम्यायां शयनागारं नैर्ऋत्या वस्त्रमंदिरं (सार्थसटिकमुहुर्तमरतड)
या सर्व श्लोकांचा अर्थ असा आहे की मास्टर बेडरूम दक्षिणेत ठेवलेली चालते.
मुलांची बेडरूम
मोठय़ा मुलाची बेडरूम आग्नेयेला किंवा पश्चिमेला चालते.
संदर्भ- सावित्रे च सावित्रे वा पुत्राणां चैव वासकम् (मानसारम्)
वरुणे पुष्पदन्ते वा युवाराजगृहं भवेत्
(मानसारम)
वायव्येचं बेडरूम
हे बेडरूम गेस्ट रूम म्हणून किंवा मुलीचे बेडरूम म्हणून वापरावे. ही वायुतत्त्वाची दिशा आहे. त्यामुळे पाहुण्यांसाठी योग्य आहे. मुलगी ही पित्याच्या घरची पाहुणीच असल्याचं आपल्या समाजात मानतात.
संदर्भ- रुद्ररुद्रजयेवापि कन्यकारालयं भवेत (मानसारम)
पाहुण्यांसाठी पश्चिमेची बेडरूमही चालते.
संदर्भ- मित्रवासं तथा मित्ररेगेलूखलयन्त्रकम् (मयमतम)
ईशान्येचं बेडरूम
हे बेडरूम शालेय वयातील मुलांसाठी वापरावं. हल्ली स्टडी रूम बेडरूममध्येच असल्यानं या बेडरूममध्ये अभ्यास चांगला होईल.
घरात वृद्ध आईवडील असतील आणि त्यांची तब्येत ठीक नसेल तर त्यांना ईशान्येची बेडरूम द्यावी. नवदाम्पत्यानं ही बेडरूम वापरू नये असं म्हणतात, पण त्याला ग्रंथाधार नाही. हे तर्कट आहे. ईशान्य ही अशी दिशा आहे की तेथे कुणाचं कसलं नुकसान होत नाही.--- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment