सध्या प्रचलित असलेल्या बहुतांश आजारांचे मूळ हे दुषित वातावरणात आहे. लोकसंख्येच्या वाढीबरोबरच अस्वच्छतेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळेच रोगराईतही वाढ झाली.
पूर्वी आपल्याकडे विश्वाच्या सुख-शांती आणि कल्याणासाठी विविध यज्ञ केले जात. आज या यज्ञांविषयी उपेक्षेने बोलले जात असले तरी नासासारख्या जगन्मान्य संशोधन संस्थेने यज्ञांबाबत संशोधन केले आहे. त्या संशोधनानुसार यज्ञामुळे त्या परिसरातील हवेतील विषाणू व जिवाणू नष्ट होऊन वातावरणशुद्धी होते. यज्ञामध्ये धूप, वनस्पती, औषधी इ.ची किती प्रमाणात आहुती दिली. यावर यज्ञाचे कार्यक्षेत्र किती मोठे असेल ते ठरते. अशा प्रकारचे “भेषज यज्ञ” (प्राण्यांची आहुती नसलेले) मोठ-मोठ्या देवस्थानांनी आपापल्या शहरात केले तर वातावरणाची शुद्धी होऊ शकते.
अशा
यज्ञांमध्ये देवदार, वड, पिंपळ, चंदन, टाळ, गुग्गुळ, तुळस, हाततुळस, बेल अशा वनस्पतींची आहुती तुपाबरोबर दिली जाते. पूर्वीच्या काळी अग्निहोत्रालाही बरंच महत्त्व होतं. आज त्याकडेही कुचेष्टेने बघितलं जातंय. एकूणच हिंदू संस्कृतीत आणि त्या अनुषंगाने प्रचलित प्रथा-परंपरा यांच्याकडे आपणच दुर्लक्ष करायला लागलो आहोत. आपल्याला हे माहीत आहे का? १. पृथ्वीवरील ओझोनचा थर शाबूत ठेवण्याची किमया फक्त यज्ञानेच शक्य आहे. यज्ञामध्ये ओझोनची निर्मिती होते. २. गाईच्या शेणाने सारवलेल्या भिंती, रेडिएशनची किरणे थोपवू शकतात. ३. गाईच्या तुपाचा दिवा जेथे तेवत असतो, तेथे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण दहापट वाढलेले असते. ४. अन्य देशातील वनस्पती जमिनीत लावल्यास, त्या एतद्देशीय वनस्पतींना मारक ठरू शकतात. ५. गाईच्या तुपाच्या आहुतीने निर्माण होणारे एसिटिलीन, हवेला शुद्ध करुन प्रदूषण दूर करते. ६. अग्निहोत्रीतील सुगंधी हवनाचे वायू फुफ्फुसात गेल्याने शरीराला रक्तसंचार शुद्ध व सुगम होतो. तसेच मेंदूतील अल्फा तरंग (जागृतावस्था व ज्ञानावस्था वाढवणारे) वाढतात. ७. पोषक आहारावर वाढलेल्या गाईच्या शेणासारखी किटाणूनाशक शक्ती अन्य कशातच नाही. (न्यूयॉर्क टाइम्स) प्राचीन भारतात “गाय” हे सर्वोत्तम धन मानले आहे. ज्याच्याकडे सर्वात जास्त गाई तो सगळ्यात श्रीमंत गणला जाई. कारण गाईपासून मिळणार्या पाचही पदार्थांमध्ये (पंचगण्यामध्ये) माणसाचे सर्वांगीण कल्याण करणारे गुणधर्म आहेत. १. गाईचे दूध शक्ती, बुद्धी व रोगप्रतिकारक्षमता वाढवणारे आहे. २. गाईचे लोणी हे बुद्धिवर्धक, डोळ्यांना हितकारक व रोगप्रतिकारक्षमता वाढवणारे आहे. ३. गाईचे तूप ही श्रेष्ठ रसायन, रोगप्रतिकारक्षमता वाढवणारे आहे. ४. तुपाचा दिवा हा
|
अगदी योग्य !!! छान निर्मळ वाटल लेख वाचून ....
ReplyDelete