Saturday, September 18, 2010

वास्तुशास्त्र : दक्षिण दरवाज : चिंता नको ! भाग २





संजय पाटील 
ऋग्वेदात आता:, आशा:, अपरा:, आष्ठा:, काष्ठा:, व्योम, ककुभ, हरित अशी आठ नावं दिशा या शब्दाला पर्याय म्हणून आली आहेत. मात्र दिश: म्हणजेच दाखवणं या अर्थाचा व हाताशी संबंधित असणारा शब्दच प्रचलित

 राहिला.
दक्षिण म्हणजे क्षीण असं तथाकथित वास्तुतज्ज्ञ सांगत असतात. ते खरं  आहे की या दिशेचा संबंध दक्षिणा
 देण्याशी आहे?. पुराणग्रंथ काय म्हणतात ते आता पाहू. दिशांचा उल्लेख अगदी ऋग्वेदात  असल्याचं मला संशोधनात आढळलंय. दिशांची निर्मिती कशी झाली याबद्दलची माहिती ऋग्वेदाच्या पुरुषसुक्तात  आहे, ती 
अशी- तिन्ही लोकांचा पालक असलेल्या दक्ष प्रजापतीनं (ब्रह्मानं) सृष्टीची निर्मिती करण्याच्या हेतूनं एका
 विराट आदिपुरुषाची निर्मिती केली. देवांनी यज्ञ करून या आदिपुरुषाच्या एकेका अवयवाची आहुती त्यात
 दिली. तेव्हा त्या अवयवांपासून सृष्टीच्या एकेक घटकाची निर्मिती झाली.

।। नाभ्योसीदन्तरिक्षं शीष्र्णो द्यौ समवर्तत
पद्मा भूमिर्दिश श्रोत्रात्तर्था लोकाँ अकल्पयन।।
         (ऋग्वेद १०.९०.१४)
आदिपुरुषाच्या नाभीपासून अन्तरिक्ष, मस्तकापासून द्युलोक, पायांपासून भूमी आणि कानांपासून दिशांची निर्मिती झाली.
ऋग्वेदात आता:, आशा:, अपरा:, आष्ठा:, काष्ठा:, व्योम, ककुभ, हरित अशी आठ नावं दिशा या शब्दाला पर्याय म्हणून आली आहेत. मात्र दिश: म्हणजेच दाखवणं या अर्थाचा व हाताशी संबंधित असणारा शब्दच प्रचलित राहिला.

दिशा या शब्दाची उत्पत्ती बघितल्यानंतर आता दिशांचं नामकरण कसं झालं ते पाहू. येथे आर्याच्या संस्कृतीचा विचार करणं
 अपरिहार्य आहे. आर्य अग्नीचे उपासक होते. त्यांच्या नित्यकर्मात यज्ञीय कर्माना विशेष महत्त्व होतं. पहाटे शुचिर्भूत झाल्यानंतर
 यज्ञीय कर्माना सुरुवात व्हायची. ते सूर्योपासक असल्यामुळे उगवत्या सूर्याला सन्मुख राहून यज्ञविधी करणं ओघानं आलं. उगवतीची दिशा ही समोरची किंवा पुढची म्हणून तिला प्राची (पूर्व) म्हटलं जाऊ लागलं. पाठच्या दिशेला प्राचीच्या समोरची म्हणून प्रतीची (पश्चिम)
 म्हटलं जाऊ लागलं, तर उजव्या हाताकडच्या दिशेला दक्षिण म्हटलं जाऊ लागलं. कृपया लक्षात घ्या की संस्कृतमध्ये दक्षिण म्हणजे उजव्या हाताची दिशा होय. (दक्षिण म्हणजे क्षीण नव्हे!)
दक्षिणेचा आणखीही एक संदर्भ यज्ञीय कर्माशी जोडला जातो तो असा की, यज्ञविधीतील दक्षिणा नेहमी उजव्या हातानं दिली जाते.
 पूर्वेकडे तोंड करून आर्य यज्ञविधीसाठी बसत आणि उजव्या हातानं दक्षिणा देत. म्हणून उजवीकडची- दक्षिणा देण्याची दिशा म्हणून
 दक्षिण. (दक्षिण म्हणजे क्षीण नव्हे!)
आता काही वाचकांना असा प्रश्न पडला असेल की, उजव्या हाताकडच्या दिशेला दक्षिण म्हणत तर डाव्या हाताच्या दिशेला वाम का
 म्हणत नसत? या शंकेचं समाधान पुन्हा यज्ञीच कर्मातच दडलंय. यज्ञीच विधींचा क्रम नेहमी प्रदक्षिणा मार्गानं (क्लॉकवाइज) जातो. पूर्वेकडून सुरू झालेले यज्ञीय विधी प्रदक्षिणा मार्गानं पुरे होत होत डाव्या हाताला संपत. अर्थात विधीची उत्तरपूजा येथे होई.          म्हणून डाव्या हाताच्या दिशेला म्हटलं जाऊ लागलं उत्तर..
ग्रंथकार काय म्हणतात?
वास्तुविषयक जुन्यात जुना ग्रंथ घ्या. त्यात दक्षिणेकडून मुख्य दरवाजा नसावा, असं कुठेही म्हटलेलं नाही. कोणत्याही मुख्य दिशे
ला दरवाजा ठेवता येतो, असंच ग्रंथकारांनी म्हटलंय. मात्र तो पूर्वेला कुठे असावा, पश्चिमेला कुठे असावा, उत्तर- दक्षिणेला कुठे
असावा याचे नियम त्यांनी दिले आहेत.
सहाव्या शतकात वराहमिहिरांनी लिहिलेल्या ‘बृहत्संहिता’ ग्रंथात प्रवेशद्वाराचं स्थान कुठं असावं आणि ते अन्यत्र ठेवल्यास काय
 वाईट फळं मिळतील याचं सविस्तर वर्णन आहे. ‘विश्वकर्मा प्रकाश’, ‘मानसारम’, ‘मयमतम’, ‘मनुष्यालय चंद्रिका’, ‘अपराजित पृच्छ’
या ग्रंथांतही मुख्य दार व उपदार कुठे ठेवता येतात याबद्दल ठामपणं सांगितलं आहे. ‘समरांगण सूत्रधार’, ‘कामिका आगम’,

 ‘सुप्रभेदागम’, ‘समूर्तागम’, ‘वास्तुविद्या’, ‘वास्तुसौख्यम’ या ग्रंथांत चार दिशांची घरं चातुर्वर्णीयांसाठी कशी लाभप्रद ठरतात याची
 रोचक माहिती आहे. अग्निपुराण व मत्स्यपुराणात दक्षिणेच्या दरवाजाला शुभ म्हटलंय. किंबहुना कोणत्याही ग्रंथानं दक्षिण दिशेचा
 दरवाजा वाईट असल्याचं म्हटलेलं नाही. उलट दक्षिण दिशेचा दरवाजा धन, धान्य, पशू, कुल यांची वृद्धी करणारा आहे, असं त्याचं
 कौतुक केलंय.
आचार्य मयासुरांच्या मयमतम या ग्रंथातील एक श्लोक पाहू.
              गृहतवरमैशं राक्षसे पुष्यदन्ते
              शुभकरमय भल्लाटंशकेशेमहेन्द्र

              धनकुल पशुवृद्धी शंसते तस्य
               भर्तुगृहगतशुभमानं पादमध्यं च भित्ते:
(मयमतम, अध्याय २७, श्लोक १३२)
अर्थात.. गृहप्रवेशासाठी दक्षिणेकडील राक्षस (गृहक्षत), पश्चिमेकडील पुष्यदंत, उत्तरेकडील भल्लाट आणि पूर्वेडील महेंद्र या
 पदांवरील दार धन, कुल, पशू यांची वाढ करणारं असतं. या श्लोकात दक्षिणेकडील गृहक्षत पदात दरवाजा ठेवण्यास सांगितलंय.
मयमतमच्या नवव्या अध्यायात ग्रामरचनेबद्दल विवेचन आहे. त्यातील ५७ वा श्लोक पुढीलप्रमाणे.
।। भल्लाटे च महेन्द्रे राक्षसपादे तु पुष्यदन्तपदे
द्वारायस्थानं जलमार्गाश्चपि चत्वार।।
म्हणजे ग्रामप्रवेशासाठीसुद्धा दक्षिणेकडील गृहक्षत विभागात प्रवेशद्वार सुचविण्यात आलं आहे.
सर्वात जुनं पुराण म्हणून ज्याचा उल्लेख होतो त्या मत्स्यपुराणातील २५५ व्या अध्यायातील हा श्लोक पाहा.
      वासगेहानि सर्वेषां प्रवेशे द्दक्षिणेन तु।
      द्वारेण तु प्रवक्ष्यामि प्रशस्तानीह यानि तु ।।
      पूर्वेणेन्द्रनं जयंतच, द्वारं सर्वत्र शस्यते।
      याम्यं च वितथं चैव दक्षिणेन विदुर्बधा:।।
पश्चिमे पुष्पदन्तं च वारुणंच प्रशस्यते।
उत्तरेण तु भल्लाटं सौम्यं शुभदं भवेत्।।
              (मत्स्यपुराण)
अर्थात.. सर्वाच्या निवासगृहात उजव्या बाजूनं प्रवेश केला पाहिजे. पूर्वेकडील महेन्द्र आणि जयंत या पदावर बांधलेलं दार सर्वासाठी
 प्रशस्त आहे. बुद्धिमान लोक दक्षिण दिशेला याम्य (यम) आणि वितथ विभागात दार योजतात. पश्चिमेला पुष्यदन्त विभागात तर
उत्तरेला भल्लाट आणि सोम या विभागात दार शुभदायक आहे.. म्हणजे मत्स्यपुराणातही दक्षिणेकडचं दार सुचवण्यात आलंय.
‘मानसारम’ हा वास्तुशास्त्रावरील सर्वात मोठा ग्रंथ. तो कुणी लिहिला याचा उल्लेख ग्रंथात नसला तरी महाऋषी अगस्त्य यांनी तो
रचला असावा, असं म्हणतात. या ग्रंथातील ३६ व्या अध्यायातील हा श्लोक पाहा.
महेंद्र पुष्यदन्ते वा मुख्ये वाथ गृहक्षते।
सर्वेषामापि वर्णानां द्वारं कुर्याद विशेषत: ।।३४।।
              (मानसारम)
अर्थात.. महेन्द्र, पुष्यदन्त, मुख्य आणि दक्षिणेकडील गृहक्षत विभागात मुख्य दरवाजा सर्वासाठी चांगला, असं मानसार ऋषी
 सुचवतात.
याच अध्यायातील पहिला श्लोक असा :
           देवानां हम्र्यके सर्वे प्राकारे मण्डपे तथा
           चतुर्दिक्षु चतुद्र्वारं चोपद्वारं यथेष्टकम
अर्थात.. देवालयं, राजवाडे, सभामंडप यांना चार मुख्य दिशांना (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम) चार दरवाजे ठेवता येतात.
अध्याय ३८ मधील १० व्या श्लोकाची ओळ अशी :
          दक्षिणे द्वारशाले तु महाद्वारे गृहक्षते
अर्थात.. मोठं फाटक दक्षिणेकडे गृहक्षत विभागात योजावं.
ग्रंथांचे आणखी दाखले घेऊ पुढील भागात..  
क्रमश:
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad